Saturday, 14 February 2026

चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे वृद्धपकाळाने निधन

चिरनेर येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय गोंधळी यांचे वृद्धपकाळाने निधन

उरण दि १४, (विठ्ठल ममताबादे) :
उरण तालुक्यातील चिरनेर - कातळपाडा येथील रहिवासी येथील ज्येष्ठ पत्रकार धनंजय चिंतामण गोंधळी (८५) यांचे शनिवारी  वृद्धपकाळाने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर चिरनेर येथील मुक्तीधाम स्मशानभूमीत विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींसह ग्रामस्थ व नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.त्यांनी चिरनेर येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या सेकंडरी  स्कूलचे चेअरमन म्हणून निस्वार्थीपणे काम केले आहे.त्यांचे पत्रकारितेतील लेखन सकस व वास्तवदर्शी होते. 

विविध व्यक्तिमत्त्वांची व्यक्ती चित्रे त्यांच्या लेखणीतून उतरली असून, विविध वृत्तपत्रातून वेगवेगळ्या विषयावर त्यांनी समिक्षा लेख लिहिले आहेत. कवितेचे सौंदर्य उलगडणाऱ्या धनंजय गोंधळी यांनी अस्वादक समीक्षेचा वस्तुपाठ प्रस्थापित केला होता. त्यांनी ग्रामीण पत्रकार म्हणून  कृषीवल मधून, आपल्या लेखनाला सुरुवात केली होती.पत्रकार म्हणून सामाजिक चळवळीला त्यांनी विशेष योगदान दिले होते. त्यांनी उरण टाइम्स हे  साप्ताहिक सुरू केले होते.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, दोन सासुरवासीण मुली, सुना, जावई, नातवंडे, पंतवंडे असा आप्त परिवार आहे.

No comments:

Post a Comment

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !!

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !! परिवहन आयुक्...