Saturday, 14 February 2026

हरविलेली दिड तोळ्याची चैन केली परत ; कु.शिवस्वरूप भागिनाथ कराड याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक !!

हरविलेली दिड तोळ्याची चैन केली परत ; कु.शिवस्वरूप भागिनाथ कराड याच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक !!

** ठाकूर कुटुंबियांनी मानले आभार

उरण दि १४(विठ्ठल ममताबादे )
दिनांक १३/०२/२०२६ रोजी नवी मुंबई मधील नेरुळच्या मिनाताई ठाकरे हॉस्पिटलमध्ये उलवे येथील श्रीमती. बयवबाई अरुण ठाकुर (बामणडोंगरी) यांची दिड तोळ्याची सोन्याची चैन हरवली होती. तेथेच दवाखान्यात आलेल्या कु.शिवस्वरूप भागिनाथ कराड रा.जुईनगर (वय वर्षे १०) या शाळकरी मुलाला सापडली. शिवस्वरूपच्या आईवडिलांनी ती चैन लगेचच नेरुळ पोलिस स्टेशन येथे जमा केली होती. आज नेरुळ पोलिसांच्या सहकार्याने श्रीमती बयवबाई अरुण ठाकुर यांना त्यांची चैन परत मिळाली. 

आज कु. शिवस्वरूप कराडचा नेरुळ पोलिस स्टेशन येथे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय कांबळे  आणि श्रीमती.बयवबाई ठाकुर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.आजच्या धक्का धक्कीच्या व जीवघेण्या स्पर्धेच्या युगात एकीकडे माणुसकी हरवत चालली आहे तर दुसरीकडे इमानदारीचे अनेक उत्तम व आदर्श उदाहरण पाहायला मिळत आहे.मूर्ती लहान किर्ती महान या उक्तीला शोभेल असे कु.शिवस्वरूप भागिनाथ कराड याचे कार्य असून कु. शिवस्वरूप च्या प्रामाणिकपणाचे व त्याच्या आई वडिलांनी दिलेल्या चांगल्या संस्कारा बद्दल आई वडिलांचे सर्वत्र कौतुक होत आहे

No comments:

Post a Comment

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !!

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !! परिवहन आयुक्...