Sunday, 15 February 2026

जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात संपन्न !!

जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्साहात संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          ईशान्य मुंबईत प्रसिद्ध असलेले घाटकोपर पश्चिम येथील जंगलेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा. जंगलेश्वर मंडळाचे भक्त मंडळाचे अध्यक्ष कैलास पप्पू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक १४ ते १६ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसीय महाशिवरात्र उत्सव विविध धार्मिक विधी, जपसह मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे. महाशिवरात्री निमित्त पूर्ण परिसर मंदिर सुंदर हार फुलांनी आणि आकर्षक विधुत रोषणाईने सजले होते. घाटकोपर पूर्व उपनगरातील जंगलेश्वर महादेव मंदिर हे भक्त पावणारे असे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. जंगलेश्वर भक्त गणेशोत्सव ५८ वे वर्ष साजरे करण्यात आले या महोत्सवाचे प्रमुख कैलाश सदाशिव सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली धार्मिक व षोडोषोपचार पूजा विधी, होम हवन, अखंड जप असा विविध कार्यक्रम झाले. शनिवारी श्री सत्यनारायणाची महापूजा आणि सायंकाळी महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून याचा हजारो भाविक भक्तांनी लाभ घेतील.

महाशिवरात्रीच्या उत्सवानिमीत्त सिनेकलाकार, विविध राजकीय पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते जंग्लेश्वर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी हजेरी लावली. यावेळी स्थानिक आमदार दिलीप लांडे मामा, भाजप नगरसेवक प्रकाश मोरे, धर्मेश गिरी, मनसे नेते दशरथ शिर्के, सनी शिर्के, भाजपा नगरसेविका अश्विनी मते, आरपीआय चे दादू भोसले, शाखाप्रमुख शांताराम ठुकरूल आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या दरम्यान उपस्थिती मान्यवरांचा मंडळाचे अध्यक्ष कैलाश उर्फ पप्पू सुर्वे आणि संचालक कमलेश सुर्वे यांनी सन्मान केला. मंडळाचे कार्यकर्ते शेखर सावंत, भरत शिंदे, संजय सावंत, किशोर सुतार, व्यावसायिक रमेश तारी, भाऊ शिंपी, सुनील सावंत,  बापू गायकवाड, भरत देसाई, संतोष लाड आदीसह अनेक कार्यकर्ते उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत होते.

No comments:

Post a Comment

पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या हिराबाई सोनावणे यांचे निधन

पडघ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक आठवणी जपणाऱ्या हिराबाई सोनावणे यांचे निधन  ** पाणी सत्याग्रह आणि समतानगरमधील भेटीच्या आठवणींची ...