Sunday, 15 February 2026

ठाणे नगरीतील नामवंत कलाकार अक्षय जाधव ह्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारा ने गौरवण्यात आले !!

ठाणे नगरीतील नामवंत कलाकार अक्षय जाधव ह्यांना महाराष्ट्र राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कारा ने गौरवण्यात आले !!

ठाणे, प्रतिनिधी : Talent कट्टा आणि नालंदा विद्यापिठ (महाराष्ट्र राज्य ) च्या वतीने ७ फेब्रुवारी २०२६ पुणे पत्रकार भवन येथे आद. अक्षय जाधव ह्यांना नृत्य संगीत क्षेत्रतील अभूतपूर्व कामगिरी बदल राज्यस्तरीय सन्मानाने गौरवण्यात आले.अगदी लहान पणा पासून नृत्याची आवड असणाऱ्या अक्षय ह्याना हा प्रवास फार खडतर होता. तब्बल १५ वर्ष त्यांनी नृत्य सादर करत असून शिकवत सुद्धा आहेत. परस्थिती ला हरता त्यांनी जिद्द कायम ठेवली त्या मुळे लोकसंगीत लोक कला ह्यात त्याना असंख्य पुरस्कार सुद्धा मिळाली. आपली महाराष्ट्रीय कलानृत्य अंतराष्ट्रीय पातळी वर पोहचवण्या साठी ते मेहनत करीत आहे. संपूर्ण कुटुंबा सोबत त्यांनी हा सन्मान स्वीकारला.माध्यमा समोर बोलत असताना त्यांनी सांगितले आजचा हा सन्मान माझ्या परिश्रमांना मिळालेली मानाची पावती आहे."

"हा सन्मान माझा एकट्याचा नसून, ज्यांच्या पाठिंब्यामुळे मी इथवर पोहोचलो, त्या प्रत्येक हाताचा हा गौरव आहे. 

सन्मानार्थ कार्यक्रमात माजी सैनिक डॉ. रंजेंद्र वालीया, अभिनेत्री आर्या घारे,लेखिका अर्चना देसाई, शास्त्रज्ञ डॉ नीता जोशी, प्रा. संदीप सांगळे व अध्यक्ष मा. नितीन धवने- पाटील हे देखील उपस्थित होते.

सौजन्य - साईनाथ खरात 

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!  ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध का...