Monday, 23 February 2026

यु. ई. एस. स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक व संस्थेतर्फे‌१० वीच्या विदयार्थ्यांना शुभेच्छा !!

यु. ई. एस. स्कूल ॲण्ड ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षक व संस्थेतर्फे‌१० वीच्या विदयार्थ्यांना शुभेच्छा !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : अभ्यासाच्या, परीक्षेच्या ओझ्याने दबलेल्या विदयार्थ्यांच्या मनावरील भार कमी करण्यासाठी व परिक्षेची भिती दूर करुन मनात आत्मविश्वासाचं सुगंध भरुन, हसतमुख चेहऱ्याने मुक्तपणे परिक्षेला सामोरे जाण्याच्या हेतुने यु. ई. एस. संस्थेचे उपाध्यक्ष  मिलिंद पाडगांवकर, खजिनदार ॲड. अपूर्वा ठाकूर, सिनिअर कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या, समन्वयक, सिनिअर कॉलेजच्या विभाग प्रमुख तसेच माध्यमिक, प्राथमिक व पूर्व प्राथमिक विभागातील पर्यवेक्षिका व शिक्षकांच्या हस्ते प्रत्येक विदयार्थ्याला गुलाबाचं फूल देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यु. ई. एस. स्कूल व संस्थेतर्फे १० वीच्या परिक्षेला बसणाऱ्या प्रत्येक विदयार्थ्यांला देण्यात येणाऱ्या गुलाबाच्या फुलामुळे, विदयार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा ताण कमी होऊन टवटवीतपणा दिसत होता. ज्यामुळे सर्व शिक्षक, विदयार्थी व पालकांचे चेहरे प्रफुल्लीत झाले होते व सर्वत्र सकारात्मक उर्जेचा प्रवाह सळसळत होता. 

यंदा यु. ई. एस. स्कूल ॲण्ड कॉलेजमध्ये दिनांक २० फेब्रुवारी २०२६  रोजी झालेल्या परिक्षेसाठी एकूण ०६ ब्लॉकमध्ये मराठी मिडीयम शाळेतील १०० तर उर्दू मिडीयम शाळेतील ३० असे एकूण १३० विदयार्थी परिक्षा देण्यासाठी आले होते. 

दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी एकूण १५ ब्लॉकमध्ये उरण मधील यु. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, जी. ई. आय इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, रोटरी इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, सेंटमेरी हायस्कूल उरण, द्रोणागिरी  इंग्लिश व मराठी मिडीयम हायस्कूल करंजा, सिटीझन हायस्कूल उरण, सेंटमेरी स्कूल जेएनपी, न्यु. इंग्लिश स्कूल मोरा, इक्रा इंग्लिश मिडीयम स्कूल उरण, असे इंग्लिश मिडीयम शाळेतील ३२३ तर उर्दू मिडीयम शाळेतील ३० असे एकूण ३५३ विदयार्थी परिक्षा देत आहेत.

No comments:

Post a Comment

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंजूर झाल्याबद्दल आभार सभा संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ९२ विनाअनुदानित शाळांना अनुदान मंज...