Sunday, 8 February 2026

खानदेश मित्र मंडळ उरण तर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण !!

खानदेश मित्र मंडळ उरण तर्फे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण !!


उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री राजकारणातील 'दादा' अजितदादा पवार यांचे बारामतीत विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याने महाराष्ट्रातील जनतेवर शोककळा पसरली आहे. दिलखुलास व्यक्तिमत्व असलेल्या अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाबाबत खानदेश मित्र मंडळ उरणच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी शोक व्यक्त केला आहे. उरण शहरातील विमला तलाव गार्डनमध्ये खानदेश मित्र मंडळ उरणच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

यावेळी दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अजित दादा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विविध मान्यवरांनी आपल्या भाषणातून अजितदादा यांचे कार्य व विचार अजरामर राहतील, देश समाज त्यांना कधीच विसरणार नाही अशा भावना व्यक्त केल्या. यावेळी खानदेश मित्र मंडळ उरणचे कार्याध्यक्ष सुनील चौधरी,उपाध्यक्ष कैलास भामरे, खजिनदार वामनराव राठोड, सल्लागार संजय पाटील, सभासद भरत पाटील, सभासद रविंद्र पाटील, लता सूर्यवंशी, दत्तू महाले सुनील झोपे, संदीप पाटील, भरत चव्हाण, दिनेश पाटील आदी सभासद उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !!

खाजगी शिकवणी नियमन मसुदा : शासनाकडून अखेर १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; ११,४१० कायदेशीर हरकतींची नोंद !! *कोल्हापूर, दि. ७ सप्टेंबर...