Tuesday, 21 July 2026

आषाढी यात्रेसाठी दादर - पंढरपूर दरम्यान 2 विशेष गाड्या* *मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय !!

आषाढी यात्रेसाठी दादर - पंढरपूर दरम्यान 2 विशेष गाड्या*  
*मध्य रेल्वे प्रशासनाचा निर्णय !!

*मुंबई, दि. 21 जुलै 2026*

आषाढी यात्रेसाठी मुंबईहून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन आषाढी विशेष गाड्या धावणार आहेत.

*गाड्यांचे वेळापत्रक*  
*दादर - पंढरपूर विशेष गाडी क्रमांक 01045*  
ही गाडी 24 जुलै रोजी दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी दादर येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजून 15 मिनिटांनी पंढरपूरला पोहोचेल.

*पंढरपूर - दादर विशेष गाडी क्रमांक 01046*  
परतीची गाडी 26 जुलै रोजी रात्री 12 वाजून 15 मिनिटांनी पंढरपूर येथून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11 वाजून 45 मिनिटांनी दादरला पोहोचेल.

*मार्गातील थांबे आणि रचना*  
या विशेष गाड्यांना ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड आणि कुर्डुवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.

गाडीची संरचना: 2 वातानुकूलित तृतीय श्रेणी, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 द्वितीय आसन डबे तसेच गार्ड्स ब्रेक व्हॅन असेल, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

No comments:

Post a Comment

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदी जगदीश ठाकूर !!

शिवसेना प्रणित जय महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या मावळ लोकसभा क्षेत्राच्या उपाध्यक्ष पदी जगदीश ठाकूर !! उरण दि २१, (व...