Wednesday, 11 February 2026

भिवंडीतील कोपर गावात महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिवपुराण"अमृत कथा सप्ताह. !!

भिवंडीतील कोपर गावात महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिवपुराण"अमृत कथा सप्ताह. !!

भिवंडी,दिं, १२,अरुण पाटील (कोपर). :

भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथील श्री क्षेत्र "कोपरेश्वर"मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त "श्री महाशिव पुराण "अमृत कथा सप्ताहाचे आयोजन कोपर गावचे सरपंच श्री .हेमंत सूर्यकांत घरत, श्री. जगत्गुरु तुकाराम महाराज वारकरी सांप्रदाय,स्वाध्याय परिवार,समर्थ दास परिवार,,आध्यात्मिक परिवार,व समस्त ग्रामस्थ मंडळ ,कोपर यांच्या वतीने गुरुवार  दिं,१२/२/२०२६ ते रविवार‌ दिं,१५/२/२०२६ पर्यंत आयोजित केले आहे. 

दिवस पहिला माघ कृ.१०, वार गुरुवार ,दिं, १२/२/२०२६ रोजी सकाळी ६ वा. सरपंच सौ/श्री.सुषमा हेमंत सूर्यकांत घरत यांच्या तर्फे अभिषेक घालण्यात आला आहे तर संध्याकाळी हरिपाठ व रात्री महा प्रसाद ठेवण्यात आला आहे. 

दिवस दुसरा माघ कृ.११, वार शुक्रवार दिं, १३/२/२०२६ रोजी सकाळी ५/ते ६ दरम्यान  काकड आरती होणार आहे.व सकाळी ६ वा.अभिषेक होणार आहे.तसेच संध्याकाळी ५ वा.ते ७ वाजे दरम्यान श्री. कोपरेश्वर प्रासादिक भजनी मंडळ,कोपर श्री.रंजन बुवा पाटील,श्री.चिंतामण बुवा घरत,श्री.गुरुनाथ बुवा,श्री.नरेश बुवा , मृदंगमणी: ह. भ. प.कमलाकर बुवा नाईक व इतर भजन  मंडळ यांच्या तर्फे हरी भजन होणार आहे.तर ७ ते ९.३० वा.श्री. "श्री.महाशिवपुराण" अमृत कथा व रात्री महाप्रसाद होणार आहे. 

दिवस तिसरा माघ कृ.१२, वार शनिवार,  दिं,१४/२/२०२६ रोजी सकाळी ५ ते ६ वा. काकड आरती,व सकाळी ६ वा. सौ /श्री. विमल कबीर पाटील , सौ/श्री.केशव शिवराम पाटील, सौ/श्री.संदीप गोरखनाथ पाटील, यांचा अभिषेक होणार आहे.तर संध्याकाळी हरी भजन,व रात्री ७ ते ९.३० वा.रात्री "श्री.महाशिव पुराण"अमृत कथा होणार आहे.व रात्री महाप्रसाद .

दिवस चौथा,माघ कृ.१३,महाशिवरात्री वार ,रविवार दिं,१५/२/२०२६ राजी सकाळी काकड आरती,भजन,वाकली ९ ते ११ वा. "श्री. महाशिवपुराण "अमृत कथा सांगता सोहळा होणार आहे. या कार्यक्रमात  कथा प्रवक्ते म्हणून श्री.क्षेत्र श्रीरामपूर येथील ह.भ. प. शिव भक्त श्री. रामदास शास्त्री महाराज हे आपल्याला लाभणार आहे. 

या कार्यक्रमासाठी मा. श्री.कपिलजी मोरेश्वर पाटील (मा.केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री), मा. श्री. देवेशजी पुरुषोत्तम पाटील, (महा. प्रदेश उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा, मा.सदस्य जिल्हा परिषद ठाणे) व मा. श्री. डि. के. म्हात्रे (महा.प्रदेश उपाध्यक्ष मनसे) हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत. 

या धार्मिक कार्यक्रमासाठी सर्वांनी हजर राहण्याची विनंती कोपर गावचे सरपंच श्री.हेमंत सूर्यकांत घरत, ग्रामविकास अधिकारी श्री. आशीष चव्हाण व ग्रामस्थांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !! ** सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थे विषयी अक्षय म्हात्रे यांनी...