Wednesday, 11 February 2026

नेपाळच्या पत्रकारांची 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट !!

नेपाळच्या पत्रकारांची 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट !!

** नेपाळचे क्रीडा पत्रकार पडले महेंद्रशेठ घरत यांच्या प्रेमात! 

उरण दि ११, (विठ्ठल ममताबादे) : नेपाळचे पत्रकार आयसीसी टी २० वर्ल्ड कप क्रिकेट सामन्यांचे वार्तांकन करण्यासाठी भारतात आले आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची ख्याती माहिती आहे. त्यांनी दोन वेळा कैलास मानसरोवर यात्रा केल्याने, तसेच नेपाळमधील एका शाळेला साह्य केल्याने महेंद्रशेठ घरत यांची महती नेपाळमध्येही झाली आहे. त्यामुळे २० पत्रकार बांधवांनी भारतात आल्यावर महेंद्रशेठ घरत यांची मंगळवारी (ता. १०) 'सुखकर्ता'वर सदिच्छा भेट घेतली. यावेळी महेंद्रशेठ घरत यांनी नेपाळच्या क्रीडा पत्रकारांशी संवाद साधला, त्यांचा यथोचित सन्मान केला. यावेळी ते म्हणाले, "मी पत्रकारांवर विशेष प्रेम करतो, आपण भारतात क्रिकेट सामन्यांच्या वार्तांकनासाठी आल्याने मलाही आनंद झाला आहे. कारण मीही क्रिकेटचा प्रचंड चाहता आहे. भारत-पाकिस्तान सामना जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी मी आवर्जून प्रत्यक्ष 'याचि देही याचि डोळा' पाहायला जातो. मी आजही मनमुराद क्रिकेट खेळतो. आपण नेपाळहून आमच्याकडे आल्याने 'अतिथी देवो भवं' या नात्याने आपला आदर-सन्मान करणे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे 'सुखकर्ता'वर आपले मनापासून स्वागत करतो. आपण ज्या ज्या वेळी भारतात याल, तेव्हा आम्ही आपल्या सेवेशी सदैव असू."

यावेळी महेंद्रशेठ घरत यांना प्रत्यक्ष पाहून आणि त्यांच्या कामाचा आवाका पाहून नेपाळचे पत्रकारही त्यांच्या प्रेमात पडले. यावेळी महेंद्रशेठ घरत यांच्याशी पत्रकारांनी दिलखुलास संवाद साधला, मनमोकळ्या गप्पा मारल्या. आपण 'माणूस' म्हणून ग्रेट आहात. आम्ही सातासमुद्रापार राहतो, पण भारतात आल्यावर आम्हाला आपण कुटुंबासारखे प्रेम दिलेत, हे प्रेम आम्ही कधीही विसरणार नाही. आपण ज्यावेळी यापुढे कधीही नेपाळमध्ये याल तेव्हा आम्ही तुमच्यासोबत असू, तुम्हालाही आम्ही सर्व सहकार्य करू," अशा भावना नेपाळच्या पत्रकारांनी शेलघर येथील 'सुखकर्ता' बंगल्यावर व्यक्त केल्या.

No comments:

Post a Comment

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !!

पहिल्याच प्रयत्नात अक्षय म्हात्रे यांना चाणजे पंचायत समितीच्या निवडणुकीत १६२० मतं !! ** सध्याच्या भ्रष्ट व्यवस्थे विषयी अक्षय म्हात्रे यांनी...