Tuesday, 17 February 2026

पालघर जिल्ह्यातील ता.डहाणू येथे आदिवासी महिलांसाठी मध मिशन कार्यक्रम अंतर्गत वैज्ञानिक पध्दतीने मधमाशी प्रशिक्षण शिबिर संपन्न !!

पालघर जिल्ह्यातील ता.डहाणू येथे आदिवासी महिलांसाठी मध मिशन कार्यक्रम अंतर्गत वैज्ञानिक पध्दतीने मधमाशी प्रशिक्षण शिबिर संपन्न !!

** स्वाभिमानी पक्ष, डब्ल्यू.एच.आर.एफ.आणि खादी ग्रामोद्योग विलेज इंडस्ट्रियल कमिशन भारत सरकार यांचे लाभले सहकार्य 

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष सन्मा.मा.खासदार राजू शेट्टी यांच्या आदेशाने व मुंबई प्रदेशाध्यक्ष मोहन वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी पक्ष, डब्ल्यू.एच.आर.एफ.आणि खादी ग्रामोद्योग विलेज इंडस्ट्रियल कमिशन भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर जिल्ह्यातील ता.डहाणू येथील रंकोळ या ठिकाणी दि.१५/०२/२०२६ रोजी आदिवासी महिलांसाठी मध मिशन कार्यक्रम अंतर्गत वैज्ञानिक पध्दतीने मधमाशी प्रशिक्षण शिबिर पार पडले.या  शिबिरास स्थानिक आदिवासी महिलांनी त्याचा मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली.याप्रसंगी खादी ग्रामोद्योग आयोगाचे सहाय्यक संचालक ईश्वरचंद्र जी.कृषी अधिकारी व प्रशिक्षक प्रशांत गावडे, रंकोळच्या सरपंच सौ.वनिता करमोडा, उपसरपंच मुलचंद बोलाढा, विशेष सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते सिक्कीम करमोडा, किरण बोडके, अरविंद गुरव, क्रिस्टिनो स्वामीनाथन, महेश व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

दुधनी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !!

दुधनी शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात !! भिवंडी प्रतिनिधी ( मिलिंद जाधव) :  भिवंडी तालुक्यातील कुसापूर केंद्रातील जिल्हा पर...