Saturday, 14 March 2026

पत्रकार व समाजसेवक लक्ष्मीकांत पोपळे यांची नागरी संरक्षण दलाच्या बेलापूर डिव्हिजन वार्डनपदी नियुक्ती !!

पत्रकार व समाजसेवक लक्ष्मीकांत पोपळे यांची नागरी संरक्षण दलाच्या बेलापूर डिव्हिजन वार्डनपदी नियुक्ती !!

ठाणे प्रतिनिधी : ता. १4,
पत्रकारिता, प्रभावी निवेदन, चित्रपट निर्मिती-दिग्दर्शन तसेच सामाजिक कार्य या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांची नागरी संरक्षण दलाच्या वतीने दिनांक 10 मार्च 2026 रोजी बेलापूर डिव्हिजन वार्डन म्हणून नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकी, संघटन कौशल्य आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या कार्याची दखल घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

यापूर्वीही पत्रकारिता व समाजकार्याच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल श्री. पोपळे यांचा ठाणे येथे संपन्न झालेल्या Asian Youth Image Conference & Award Ceremony – 2026 या कार्यक्रमात विशेष सन्मान करण्यात आला होता. इमेज इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स (IIORC मान्यताप्राप्त) संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील १३० मान्यवरांचा गौरव करण्यात आला होता.

या कार्यक्रमाला श्री. विजय जाधव (उपसंचालक, नागरी संरक्षण, नवी मुंबई–ठाणे, गृह विभाग, महाराष्ट्र शासन), सुप्रसिद्ध मालिका व चित्रपट निर्माता श्री. दीपक जोशी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमात माध्यमे, चित्रपट व मालिका यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली होती.

पत्रकारिता क्षेत्रात सकारात्मक व वस्तुनिष्ठ भूमिका मांडणारे, प्रभावी निवेदक म्हणून अनेक कार्यक्रमांना दिशा देणारे तसेच चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनातून सामाजिक प्रश्न मांडणारे व्यक्तिमत्त्व म्हणून श्री. लक्ष्मीकांत पोपळे यांची ओळख आहे. समाजहित जपत विविध उपक्रमांद्वारे जनजागृतीचे कार्य ते सातत्याने करत आहेत.

नागरी संरक्षण दलाच्या बेलापूर डिव्हिजन वार्डन या महत्त्वाच्या पदावर त्यांची झालेली नियुक्ती ही त्यांच्या सामाजिक कार्याची दखल असून, यामुळे आपत्ती व्यवस्थापन व नागरिकांमध्ये सुरक्षा जागरूकता निर्माण करण्याच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !!

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !! परिवहन आयुक्...