Saturday, 14 March 2026

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा ...

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
       शिवसेना नेते, खासदार व ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष मा. श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ईशान्य मुंबई विभाग प्रमुख श्री.सुरेशजी पाटील यांच्या सहकार्याने आणि ग्राहक संरक्षण कक्षाचे सचिव मा. श्री.निखिलजी सावंत व ग्रा. कक्ष सचिव अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर (पश्चिम) येथे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चा करण्यात आली. यावेळी घाटकोपर (पश्चिम) येथील साई सद्गुरू भारत गॅस एजन्सी (मंजिरी कंपनी)चे मॅनेजमेंट श्री.हसन बाबुशेठ, असल्फा येथील भारत गॅस कंपनी चे मॅनेजमेंट श्री. सुमित सिंग, तसेच झिग्मा गॅस सर्व्हिस 90 फीट रोड घाटकोपर पश्चिम गॅस सेवा चे मालक श्री.सलीम पटेल व सीनियर मॅनेजमेंट सौ.सुजाता पुजारी यांची भेट घेण्यात आली. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण होत असल्याने त्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या वतीने निवेदन पत्रक संबंधित व्यवस्थापनाला देण्यात आले.यावेळी शिवसेना घाटकोपर पश्चिम कक्ष विधानसभा संघटक श्री.यशवंत विठ्ठल खोपकर,कक्ष कार्यालय प्रमुख श्री. विश्वनाथ जाधव, कक्ष वार्ड संघटक १२३ श्री.संतोष चादे, कक्ष प्रतिनिधी प्रमोद जाधव आदी मान्यवर निवेदन पत्रक देताना उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !!

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !! परिवहन आयुक्...