Tuesday, 7 April 2026

कल्याण येथे नागरी संरक्षण प्राथमिक वर्ग क्र. ०८/२०२६ ला उत्साहात प्रारंभ; ४२ प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग !!

कल्याण येथे नागरी संरक्षण प्राथमिक वर्ग क्र. ०८/२०२६ ला उत्साहात प्रारंभ; ४२ प्रशिक्षणार्थ्यांचा सहभाग !!

बातमीदार प्रतिनिधी: ता. ७, नागरी संरक्षण, नवी मुंबई समूह ठाणे अंतर्गत मा. विजय जाधव, उपनियंत्रक, नागरी संरक्षण यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली सोमवार दि. ०६/०४/२०२६ ते १०/०४/२०२६ या कालावधीत दुपारी १३.०० ते १७.०० या वेळेत नागरी संरक्षण प्रशिक्षण हॉल, कल्याण कार्यालय येथे प्राथमिक वर्ग क्र. ०८/२०२६ सुरू करण्यात आला आहे. या प्रशिक्षण वर्गात एकूण ४२ प्रशिक्षणार्थी सहभागी झाले असून पहिल्याच दिवशी उत्साहपूर्ण वातावरणात प्रशिक्षणास प्रारंभ झाला.

आज पहिल्या दिवशी नियोजित वेळापत्रकानुसार सहाय्यक उपनियंत्रक श्री. अनिल गावित यांनी विविध विषयांवरील व्याख्याने व प्रात्यक्षिकांचे प्रभावी सादरीकरण केले. प्रशिक्षण अधिक समृद्ध करण्यासाठी मानसेवी निदेशक डॉ. प्रकाश ठमके तसेच श्री. रामबरन यादव यांनीही व्याख्याने व प्रात्यक्षिकांमध्ये मोलाचे सहकार्य केले.

यावेळी मा. उपनियंत्रक विजय जाधव यांनी प्रशिक्षण वर्गास प्रत्यक्ष भेट देऊन प्रशिक्षणार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांमध्ये नागरी संरक्षण कार्याबद्दल अधिक उत्साह व बांधिलकी निर्माण झाल्याचे दिसून आले.

सदर पाच दिवसीय प्रशिक्षण वर्गामध्ये आपत्कालीन परिस्थितीतील बचावकार्य, प्राथमिक उपचार, अग्निशमन, आपत्ती व्यवस्थापन आणि नागरी संरक्षणाची मूलभूत तत्त्वे याबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली.

Regards : DCCD, NMC, Thane

सौजन्य/वृत्त - विश्वनाथ राऊत सर 

No comments:

Post a Comment

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !!

वालधुनी नदी स्वच्छ व सुंदर करण्यासाठी उपायुक्तांनी केली प्रत्यक्ष पाहणी !! कल्याण, प्रतिनिधी : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे  घ...