समता बुद्ध विहार यांच्यावतीने संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन !!
घाटकोपर, (केतन भोज) : घाटकोपर पश्चिम इंदिरा नगर येथील समता बुद्ध विहार यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदा ही दि.१३ ते १६ एप्रिल या चार दिवसीय संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भगवान गौतम बुद्ध,क्रांतीज्योती महात्मा जोतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज यांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
यावेळी दि.१३ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे आगमन होणार असून दुसऱ्या दिवशी दि.१४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर दि.१५ एप्रिल रोजी सायंकाळी.५.०० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत अर्जुन ओव्हाळ आणि पार्टी यांचा भिम गीतांचा कार्यक्रम होणार आहे. तर दि.१६ एप्रिल रोजी सायंकाळी ७.०० ते १०.३० वाजेपर्यंत स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमात सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तसेच समता बुद्ध विहार, समता महाउपासिका संघ बहुउद्देशीय महिला मंडळ, पंचशील बुद्ध विहार, समता प्रतिष्ठान यांच्यावतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment