Wednesday, 8 April 2026

बाळू कृष्णा पार्टे यांचे दुःखद निधन. !

बाळू कृष्णा पार्टे यांचे दुःखद निधन. !

उरण दि ८, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र पोलीस कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते बाळू कृष्णा पार्टे यांचे शनिवार दिनांक ४/४/२०२६ रोजी वयाच्या ७५ वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा उत्तरक्रिया विधी बुधवार १५/४/२०२६ रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी बोरी, पानसरे आळी, उरण येथे होणार आहे. मनमिळाऊ व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे बाळू पार्टे हे गोर गरिबांच्या अडी अडचणीत गोरगरिबांना ते मदत करत असल्याने त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.एक कर्तव्य दक्ष व प्रामाणिक पोलीस कर्मचारी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख होती. सेवानिवृत्त झाल्या नंतरही त्यांनी आपल्या आयुष्यात अनेकांना मार्गदर्शन, मदत केली आहे. त्यांच्या पश्चात पाच मुले, दोन मुली ,बारा नातू असा त्यांचा कुटुंब परिवार आहे. २ मुले महाराष्ट्र पोलीस विभागात कार्यरत आहेत , एक आर्मी मध्ये तर एक नात पीएसआय आहे. देश सेवेला वाहून घेतलेले हे कुटुंब आहे. बाळू पार्टे यांच्या निधनाने पार्टे कुटूंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या मृत्यू झाल्याने सर्वत्र मोठया प्रमाणात शोक व्यक्त केला जात आहे. या दुःखद प्रसंगी व विधी प्रसंगी कुठल्याही प्रकारचे दुःखवटे स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी कळविले आहे

No comments:

Post a Comment

उरणमध्ये ‘वादन एक कला चा राजा’ गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्री एकविरा आई गडाचा देखावा !

उरणमध्ये ‘वादन एक कला चा राजा’ गणेशोत्सवाच्या माध्यमातून श्री एकविरा आई गडाचा देखावा ! आगरी कोळी कराडी समाजाचे श्रद्धास्थान आई एकविरा देवीच्...