उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाची नवीन कार्यकारिणीची निवड !!
उरण दि ८,'(विठ्ठल ममताबादे) : बुधवार दिनांक ८ एप्रिल २०२६ रोजी उरण तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाची विशेष सभा पी.एन.पी. माध्यमिक शाळा मोठी जुई येथे संघाचे मावळते अध्यक्ष सुधीर मुंबईकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेसाठी संघाचे संस्थापक अध्यक्ष नाथा नाईक,अरुण घाग, सूरदास राऊत,किशोर भोईर, संतोष म्हात्रे, प्रवीण पाटील, मिलिंद पट्टेबहादूर, मनोज म्हात्रे, सोनाली कोळी इत्यादी सदस्य उपस्थित होते. या सभेत संघाची नवीन कार्यकारिणी नेमण्यात आली. अध्यक्ष म्हणून मिलिंद पट्टेबहादूर, उपाध्यक्ष सोनाली कोळी, सचिव पदी संतोष म्हात्रे आणि खजिनदार म्हणून प्रवीण पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पी.एन.पी .शाळेचे मुख्याध्यापक किशोर भोईर यांनी सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. त्यांनी प्रास्ताविकात संघाची स्थापनेपासूनची वाटचाल विशद केली .याप्रसंगी नाथा नाईक,अरुण घाग,सुभाष ठाकूर, संतोष म्हात्रे,कोळी मॅडम,सुधीर मुंबईकर या सर्वांनी थोडक्यात मनोगत व्यक्त केले. सुधीर मुंबईकर यांनी सर्वांसाठी भोजनाची उत्तम प्रकारे व्यवस्था केली होती. मोठया उत्साहात सदर सभा संपन्न झाली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली
No comments:
Post a Comment