शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ या संघटनेतर्फे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, निर्माते, दिग्दर्शक दादासाहेब फाळके यांची जयंती साजरी !!
मुंबई (शांताराम गुडेकर) :
शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ या संघटनेच्या वतीने भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, निर्माते, दिग्दर्शक धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांची जयंती त्यांच्या दादर येथील अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली.याप्रसंगी शिवसेना प्रणित राष्ट्रीय शिव स्वराज्य सेना अध्यक्ष व वर्ल्ड वाईड ह्यूमनराइट्स ए.एफ. चे राष्ट्रीय अध्यक्ष जितेंद्र दगडूदादा सकपाळ, WHRAF चे महाराष्ट्र अध्यक्ष मोहन वायदंडे, शिव स्वराज्य सेनेच्या प्रवक्त्या सौ.सुषमा सकपाळ राऊत,भारतीय केबल सेनेचे सचिव राजेश जैन, कमला मेहता दादर अंध विद्यालय च्या संचालिका श्रीमती वर्षा जाधव, वैद्यकीय मदत कक्षाचे अनिकेत लाड, स्वाद केटरर्स चे प्रोपरायटर नितीन कोलगे, लायन दिलीप वरेकर, लायन संजय सासमल, लायन सचिन राऊत, कमला मेहता दादर अंध विद्यालय च्या प्राचार्य श्रीमती तन्वी महाडदळकर, शिक्षिका श्रीमती सुरेखा जाधव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment