गायत्री नगर मोठी उमरी येथे मोफत हाडे ठिसूळता तपासणी व अस्थिरोग निदान शिबिर !!
अकोला - अविनाश उमाळे
गायत्री नगर, मोठी उमरी येथे श्री जगन्नाथ कल्चरल अँड मल्टीपर्पज फाउंडेशन, अकोला या सांस्कृतिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त मोफत हाडे ठिसूळता तपासणी व अस्थिरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी नवरात्रोत्सव तसेच इतर विविध प्रसंगी सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्याच परंपरेचा भाग म्हणून यंदाही चैत्र नवरात्र निमित्त आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात आला.
बॅनरवरील माहितीनुसार हे शिबिर रविवार, दिनांक २९ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ वाजेदरम्यान वृंदावन संगीत विद्यालय, गायत्री मंदिराजवळ, गायत्री नगर, मोठी उमरी, अकोला येथे पार पडले.
या शिबिरात सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अमोल बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोग निदान आणि हाडे ठिसूळता तपासणी (BMD कॅम्प) करण्यात आली. विशेषतः महिलांसाठी वैद्यकीय तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते.
ज्यामध्ये परिसरातील नागरिकांनी तपासणी चा लाभ घेतला शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी अनिल वावकर, वैद्यकीय अधिकारी माधव रांदड आणि अजय ठाकूर यांनी हाडे ठिसूळता तपासणी करत महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. संस्थेचे पदाधिकारी सुमित वासनकर, नीरज सराफ, स्वप्नील उमाळे, हरिओम येणकर, अभिजित वंडाळे अश्विन येणकर, आणि संस्थेचे अध्यक्ष अभिषेक अडचुले यांनीही उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविला.
यावेळी विठ्ठल मंदिर संस्थानचे विश्वस्त नारायण बुटे, जगन्नाथ उमाळे, भोलानाथजी नळेकर, श्रीहरी गावंडे यांच्यासह परिसरातील नागरिक अतुल वानखडे, राहुल कोल्हे, अनंत देशमुख, नितीन वर्गे, भास्कर देशमुख, सतीश नांदूरकर, वैभव देशमुख आणि संदीप नांदुरकर यांची उपस्थिती होती.
हा उपक्रम उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत पार पडल्याची माहिती नागरिकांनी दिली.
No comments:
Post a Comment