Thursday, 2 April 2026

चटाळे येथे ‘नाथ हा माझा’ नाट्यप्रयोगाचे आयोजन !!

चटाळे येथे ‘नाथ हा माझा’ नाट्यप्रयोगाचे आयोजन !!

पालघर प्रतिनिधी/ पंकज चव्हाण

पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील श्री हनुमान मंदिर विश्वस्त  मंडळ, चटाळे यांच्या वतीने श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त दोन अंकी नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघर तालुक्यातील ९२ वर्षांची अखंडित नाट्यपरंपरा जपणारा हा विशेष नाट्यप्रयोग ‘नाथ हा माझा’ या नावाने सादर होणार आहे.

या नाटकाचे लेखन मधुसूदन कालेलकर यांनी केले असून दिग्दर्शन श्री. संदेश कवळी व श्री. सुभाष पाटील यांनी केले आहे. नाटकात श्री. सुभाष पाटील, संदेश कवळी, श्री. तुषार वर्तक, श्री. सुनील म्हात्रे, श्री. हर्षद सातवे, श्री. योगेश ठाकूर, श्री. जयेश भोईर, श्री. नयन म्हात्रे आणि यज्ञेश म्हात्रे हे कलाकार भूमिका साकारणार आहेत. संगीताची जबाबदारी श्री. हर्षद सातवे व श्री. लौकिक सातवे यांनी सांभाळली आहे. तसेच नाटकात स्त्री कलाकार म्हणून लावणी सम्राज्ञी स्वाती तांदळे, कु.अक्षता तांडेल, सौ रेखा वर्तक आणि सिनेतारका सायली चौधरी-वर्तक सहभागी होणार आहेत.

हा नाट्यप्रयोग शुक्रवार, दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता प्रभात वाचनालयाच्या भव्य पटांगणात, चटाळे येथे सादर करण्यात येणार आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !!

उरण महाविद्यालयात बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्र या विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रम !! उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : कोकण ज्ञानपीठ...