कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टोळीप्रमुखासह 8 जणांवर मोक्का !!
*20 पीडित महिलांची सुटका*
*कल्याण, प्रतिनिधी
कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे अनैतिक वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात टोळीप्रमुखासह 8 आरोपींना मोक्का कायद्यान्वये अटक करण्यात आली असून 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
*काय आहे प्रकरण?*
21 फेब्रुवारी 2026 रोजी कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायासाठी भाग पाडल्याचा आरोप होता. तपासात आरोपींनी संगनमत करून 20 महिलांचा अनैतिक व्यापार केल्याचे समोर आले.
आरोपींकडे कोणताही कायदेशीर आर्थिक स्रोत नसल्याने आर्थिक फायद्यासाठी त्यांनी संघटित टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या टोळीचा बिमोड करण्यासाठी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
*अटकेची कार्यवाही*
30 जून रोजी 5 महिला आरोपींना अटक करून पोलीस कोठडी घेण्यात आली. 8 जुलै रोजी फरार टोळी सदस्य प्रशांत उर्फ कवा गायकवाड याला अटक करण्यात आली.
टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या सय्यद आणि मिता बारीक हे पश्चिम बंगालमधील डायमंड हार्बर येथे लपले होते. पोउनि विकास मडके यांच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने 11 जुलै रोजी दोघांनाही ताब्यात घेतले. दोघांनाही ट्रान्झिट वॉरंटवर कल्याणला आणून 18 जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
*अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन*
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह आयुक्त ज्ञानेश्वर बव्हाण आणि अपर आयुक्त संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. पुढील तपास सपोनि अशोक होनमाने करत आहेत.
No comments:
Post a Comment