कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील वेश्या व्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश; टोळीप्रमुखासह 8 जणांवर मोक्का, 20 महिलांची सुटका !!
*कल्याण, प्रतिनिधी* : कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात संघटितपणे अनैतिक वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या टोळीचा कल्याण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात टोळीप्रमुखासह एकूण 8 आरोपींना मोक्का कायद्यान्वये अटक करण्यात आली असून 20 पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे.
*काय आहे प्रकरण?*
दिनांक 21/02/2026 रोजी कल्याण महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजि. नं. 107/2026 मध्ये बी.एन.एस. कलम 143(3), 3(5) सह स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 चे कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल होता.
तपासात असे निष्पन्न झाले की, अटक केलेल्या महिला व पुरुष आरोपींनी संगनमत करून एकूण 20 बळी महिलांना वेश्याव्यवसायासाठी भाग पाडले. पैशाचे आमिष दाखवून त्यांचा वापर शरीरसंबंधासाठी ग्राहकांसोबत पाठवून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्वतःची उपजीविका करीत होते.
*आर्थिक फायदाासाठी संघटित गुन्हेगारी*
अटक केलेल्या महिला आरोपी व पुरुष आरोपींकडे कोणताही कायदेशीर आर्थिक स्रोत नसून, त्यांनी संघटित टोळी तयार करून आर्थिक फायद्यासाठी जबरदस्तीने महिलांचा अनैतिक व्यापार केल्याचे तपासात समोर आले. त्यामुळे या टोळीचा बिमोड करण्यासाठी मा. अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण यांची मंजुरी घेऊन गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम 1999 चे कलम 3(1)(ii), 3(2), 3(4) समाविष्ट करण्यात आले.
*अटकेची कार्यवाही*
1. दिनांक 30/06/2026 रोजी गुन्ह्यातील 5 महिला आरोपींना कल्याण जिल्हा कारागृहातून ताब्यात घेऊन 06/07/2026 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला.
2. मोक्का गुन्ह्यात फरार असलेला टोळी सदस्य प्रशांत उर्फ कवा विरकुमार गायकवाड याला 08/07/2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे अटक केली. त्याला 14/07/2026 पर्यंत पोलीस कोठडी झाली.
3. टोळीचा मुख्य आरोपी तौफिक उर्फ टोप्या हिमायत सय्यद व फरार आरोपी मिता नारायण बारीक हे पश्चिम बंगालमध्ये लपल्याची माहिती मिळाली. पोउनि विकास मडके यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डायमंड हार्बर पोलिसांच्या मदतीने 11/07/2026 रोजी दोघांनाही ताब्यात घेतले. ट्रान्झिट वॉरंटवरून त्यांना कल्याणला आणून 18/07/2026 पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
*अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन*
सदरची कारवाई मा. श्री. आशुतोष डुंबरे, पोलीस आयुक्त ठाणे शहर, मा. श्री. ज्ञानेश्वर बव्हाण, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. संजय जाधव, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. अतुल शेंडे, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-3 कल्याण यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अशोक होनमाने, कल्याण विभाग करीत आहेत.
No comments:
Post a Comment