मा. आमदार किरण पावसकर यांनी जेष्ठ नागरिकांना दिली खुर्च्या आणि छत्रीची भेट !!
मुंबई(शांत्ताराम गुडेकर/समीर खाडिलकर )
शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या न्याय - हक्कासाठी सतत कार्यरत असलेले श्री. किरण पावसकर (मा.आमदार, शिवसेना सचिव, शिवसेना प्रवक्ते, अध्यक्ष -राष्ट्रीय कर्मचारी सेना) यांनी ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांना खुर्च्या आणि पावसाळा लक्षात घेऊन छत्र्या देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली.तर ईशान्य मुंबईतील १५ जेष्ठ नागरिकांसह जेष्ठ पत्रकार,मुक्त पत्रकार व श्रमिक पत्रकार यांना छत्री वाटप (वाटप करताना फोटो सुध्दा न घेता) केले. आज (दि.६ जुलै २०२६ रोजी) पावसाळ्यात बसण्याची सोय व्हावी म्हणून घाटकोपर, बंबखाना, अमृत नगर येतील रस्त्यावर रहाणाऱ्या जेष्ठ नागरिकांना खुर्ची भेट देत मदतीचा हात दिला.नव्या जुन्या पिढीतला बेबनाव अनेक घरातून दिसून येतो. आणि बऱ्याचदा ज्येष्ट नागरिकांच्या वाट्याला दुःख निराशा येते.आयुष्याच्या संध्याकाळी ते व्यथित होतात.ते सुखी कसे होतील हे पहाणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे मत कामगारांच्या न्याय -हक्कसाठी सतत कार्यरत असलेले श्री. किरण पावसकर (मा.आमदार, शिवसेना सचिव, शिवसेना प्रवक्ते,अध्यक्ष -राष्ट्रीय कर्मचारी सेना) यांनी बोलताना व्यक्त केले .ख्रिसमस, इयर एन्ड, न्यू इयर आणि गुलाबी थंडी, एकीकडं पावसाचा आनंद लुटण्यासाठी प्लान आखले जातायत तर दुसरीकडं रस्त्यावर राहणा-यांसाठी मात्र पाऊस, थंडी जीवघेणी ठरतेय.म्हणून त्यांनी हा मदतीचा हात दिला.
ईशान्य मुंबईतील घाटकोपर,विक्रोळी येथे गरजवंत जेष्ठ नागरिकांना मदत केल्याबद्दल अनेकांनी माजी आमदार किरण पावसकर यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा व आशिर्वाद दिले.तर अमृत नगर, बंबखाना व पार्क साईट येथील जेष्ठ नागरिकांकडून त्यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.
No comments:
Post a Comment