Tuesday, 14 July 2026

भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा ! रहिवासी भयंकर त्रस्त !!

भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा ! रहिवासी भयंकर त्रस्त !!

               डोंबिवली आणि विशेष करून ग्रामीण परिसरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला असून १५ दिवस आधी बुकिंग करून सुद्धा गॅस येत नाही. शिवाय हे बुकिंग ग्राहकांना न कळविता किंवा मेसेज न पाठविता कॅन्सल करीत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी घरपोच डिलिव्हरी बंद केल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. घरपोच डिलिव्हरी बंद होण्याचे कारण की सद्या कर्मचारी उपलब्ध नसल्याचे समजले आहे. तएकंदर गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या एजन्सीची यंत्रणा , व्यवस्था बरोबर नसल्याने हा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे असे समजले आहे.

               डोंबिवली आजदे, सागर्ली इत्यादी गावातील रहिवाशी हे भारत गॅस सिलेंडर मिळण्यासाठी एमआयडीसी मधील उस्मा पेट्रोल पंप जवळील चैतन्य गॅस एजन्सीचा गोडाऊनवर लोक गर्दी करीत आहेत. येथे महिला, ज्येष्ठ नागरिकांना येथे गॅस मिळण्यासाठी चार चार तास थांबावे लागत आहे. शिवाय पावती बनविण्यासाठी प्रथम त्यांना चैतन्य गॅस एजन्सीचा डोंबिवली मधील नेहरू मैदान जवळील ऑफिस मध्ये जावे लागते. तेथे जाण्यासाठी आणि सिलेंडर वाहतुकीसाठी रिक्षा करावी लागत आहे. त्यात त्यांचे कमीतकमी रुपये १००/- जात आहेत. हे सर्व ग्राहक अल्प उत्पन्नातील मध्यमवर्गीय लोक आहेत. आजदे गावात राहणाऱ्या सौ योगिता थोटांगे या आपला घरातील गॅस सिलेंडर संपल्यावर नोंदणी करून सुद्धा गॅस न आल्याने त्या सकाळी गॅस गोडाऊन वर गेल्या होत्या तेव्हा त्याना मोठा मनःस्ताप सहन करावा लागला असून त्यानी गॅस एजन्सीला याचा जाब विचारला. परंतु गॅस एजन्सी कडून कुठलेही समर्पक उत्तर मिळाले नाही आहे. आशिष नेवाळकर हा युवक शिक्षण चालू ठेवून नोकरी करीत आहे पण तोही दांडी मारून गॅस सिलेंडर मिळण्यासाठी आला होता. काहींनी या त्रासाबद्दल नगरसेवकांकडे तक्रारी केल्या आहेत. सदर गॅस सिलेंडर मिळण्यासाठी मोठा काळाबाजार होत असल्याचे समजले असून संबंधित सरकारी प्रशासनाने याची दखल घेऊन कडक कारवाई केली पाहिजे. 
         आधीच महागाईने आणि गॅस सिलेंडर भाववाढीने जनता त्रस्त झाली आहे. त्यात रहिवाशी गॅस सिलेंडर ग्राहकांना चार चार तास थांबून वाहतुक खर्चाचा भुर्दंड बसत आहे. त्यात जास्त करून महिलांना (लाडक्या बहिणींना) याचा फटका बसत आहे. लोकप्रतिनिधी आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी याचा जरूर विचार करावा तसेच शक्यतो आजदे, सागर्ली अशा ग्रामीण भागात महानगर गॅस पुरवठा चालू करण्यासाठी प्रयत्न करावा.

वृत्त - राजू नलावडे, डोंबिवली 

No comments:

Post a Comment

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !! *डोंबिवली, राजू नलावडे  डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात ...