"संविधानाचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र यावे" - अण्णासाहेब कटारे
*राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्ता मेळावा*
*छत्रपती संभाजीनगर, सचिन ननगरे
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश आणि बैठकीचे आयोजन करण्यात आले. मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोष मोकळे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
*संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन*
यावेळी मार्गदर्शन करताना अण्णासाहेब कटारे म्हणाले की, देशात संविधानविरोधी धोरणे राबवली जात आहेत. परिणामी मागास, दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लिम आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे जीवनमान खालावत आहे. अशा परिस्थितीत संविधानाचे समतेचे राज्य पुन्हा प्रस्थापित करण्याची जबाबदारी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांवर आहे.
देशात धर्मनिरपेक्ष शक्ती कमकुवत होत असताना धर्मांध शक्ती सत्तेच्या बळावर वर्चस्व प्रस्थापित करू पाहत आहे. हे थोपवण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेतील संघटित शक्ती उभी करणे गरजेचे आहे. नेत्यांमधील हेवेदाव्यांमुळे आंबेडकरी चळवळीला खीळ बसू नये, असेही त्यांनी सांगितले.
संघटित रिपब्लिकन आंबेडकरी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला असल्याचे कटारे यांनी स्पष्ट केले.
*पदाधिकारी उपस्थित*
या बैठकीत विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. कार्यक्रमाला बिपीन कटारे, सचिन नांगरे, आर.बी. जगताप, संदीप गायकवाड, अंबादास बावस्कर, राजू राक्षे, दर्शन कुमार इंगळे, अनिल शिंदे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment