Monday, 13 July 2026

संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज - अण्णासाहेब कटारे

संविधानाचे राज्य प्रस्थापित होण्यासाठी समस्त आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज - अण्णासाहेब कटारे

*"छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा झंझावात*

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी): राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकर्ता प्रवेश व कार्यकर्ता बैठकीचे आयोजन मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संतोषजी मोकळे यांच्या वतीने करण्यात आले होते. 

यावेळी मार्गदर्शन करतांना अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले की देशात भारतीय राज्यघटना आणि संविधान विसंगत ध्येयधोरणे राबविले जात आहेत. संसदेच्या पायऱ्यांवर डोके ठेवून देशाचा कारभार करण्याचे आश्वासन भारतीयांना देण्यात आलं होतं.परंतु त्याच संविधानाची अवहेलना होण्याचे प्रसंग वाढत आहेत, परिणामी देशातील मागास दलित, आदिवासी, ओ.बी.सी. मुस्लिम अल्पसंख्यांक, भटके विमुक्त आर्थिक दुर्बल घटकांचे जीवनमान खालवत जात असून मूठभर साम्राज्यवादी लोकांची सत्ता प्रस्थापित होत आहे. अशा परिस्थितीत देशात पुन्हा एकदा संविधानाचे सन्मानाचे समतेचे राज्य निर्माण करण्याची जबाबदारी संविधानवादी आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांची व पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष संघटनांची आहे. देशात व राज्यात धर्मनिरपेक्षवादी पक्षांची वाताहात होत असतांना धर्मांधशक्ती सत्तेच्या बळावर साम्राज्यवाद प्रस्थापित करू पाहत आहे याला केवळ थोपवून नव्हे तर नेस्तानाबूत करण्याचे सामर्थ्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या आंबेडकरी विचारधारेतच असून, आजमितिस, शोषित, पीडित, असलेला समाज संघटित होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून आता त्याला नेत्यांमधील हेव्यादाव्यांमुळे खिळ बसू नये आणि रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा जोमाने उभी करून संघटित शक्ती उदयास यावी,अशी आशा यावेळेस राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी व्यक्त केली.

संघटित रिपब्लिकन आंबेडकरवादी चळवळ पुन्हा उभी करण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष मैदानात उतरला आहे असे अण्णासाहेब कटारे यांनी शेवटी आपल्या भाषणात सांगितले. या बैठकीच्या वेळेस विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला.

या बैठकीस युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य बिपीन कटारे, महाराष्ट्र प्रदेश जनसंपर्क प्रमुख सचिन भाऊ नांगरे, महाराष्ट्र प्रदेश सचिव आर.बी.जगताप छत्रपती संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड, मराठवाडा उपाध्यक्ष अंबादास बावस्कर, जालना संपर्कप्रमुख राजू राक्षे, मराठवाडा संघटक कांतिलाल सोनवणे, मराठवाडा सरचिटणीस दर्शन कुमार इंगळे, मराठवाडा नेते राजेंद्र बनसोडे, संभाजीनगर कामगार आघाडी अध्यक्ष अनिल शिंदे, जनसंपर्क प्रमुख दादासाहेब मोकळे ,जिल्हा उपाध्यक्ष महेश विधाटे, संभाजीनगर युवा शहराध्यक्ष मनीष बोर्डे, संघटक संदीप काकडे, वैजापूर तालुका अध्यक्ष बाबासाहेब दिवेकर,येवला नेते शिवाजी गायकवाड, युवा नेते तुषार भाऊ वाघ, प्रशांत कटारे,  प्रसिद्धी प्रमुख वाल्मीक खरात, लक्ष्मीताई राक्षे, रमाताई दिवेकर, वैशालीताई पठारे, राजू रगडे, सागर हिवाळे, अभिनव निकम, अंबादास हिवाळे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

वृत्त - सचिन ननगरे 

No comments:

Post a Comment

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !! *डोंबिवली, राजू नलावडे  डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात ...