Monday, 13 July 2026

राष्ट्रीय स्तरावरील संघ व्यवस्थापक म्हणून गौरव; प्रा. योगेश चौधरी यांचा पालघर जिल्ह्यात सत्कार !!

राष्ट्रीय स्तरावरील संघ व्यवस्थापक म्हणून गौरव; प्रा. योगेश चौधरी यांचा पालघर जिल्ह्यात सत्कार !!

पालघर, प्रतिनिधी ( पंकज चव्हाण) : 

पालघर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने सन २०२६-२७ च्या शासकीय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रशिक्षण सभेत जागतिक व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंसह संघ व्यवस्थापकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रा. योगेश किशोरी किशोर चौधरी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. रांची येथे आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या राष्ट्रीयस्तरीय ट्रायबल क्रीडा स्पर्धेत त्यांनी संघ व्यवस्थापक म्हणून यशस्वी जबाबदारी पार पाडल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला.

पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पालघर जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, पालघर शिक्षणाधिकारी अशोक पाटील, तसेच जिल्ह्यातील विविध क्रीडा शिक्षक व मान्यवर उपस्थित होते.

याचबरोबर प्रा. योगेश चौधरी यांची पालघर जिल्ह्यातील एकमेव महानगरपालिका असलेल्या वसई-विरार शहर महानगरपालिका क्षेत्रासाठी सलग आठव्यांदा जिल्हा क्रीडा प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रा. योगेश चौधरी यांच्या या दुहेरी सन्मानामुळे वसई-विरारसह पालघर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव वाढला असून, त्यांच्या कार्यामुळे विद्यार्थी व क्रीडापटूंना निश्चितच प्रेरणा मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

No comments:

Post a Comment

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!

डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !! *डोंबिवली, राजू नलावडे  डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात ...