Wednesday, 15 July 2026

कल्याण येथील घोलपनगर मधील धोकादायक इमारतीचे बेकायदेशीर पाडकाम !!

कल्याण येथील घोलपनगर मधील धोकादायक इमारतीचे बेकायदेशीर पाडकाम !!

** मोठी दुर्घटना थोडक्यात टळली

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण पश्चिम घोलप नगर परिसरात धोकादायक घोषित करण्यात आलेल्या इमारतीचे सुरक्षेचे सर्व नियम डावलून खाजगी बिल्डरकडून पाडकाम करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पाडकामादरम्यान इमारतीचा काही भाग थेट रस्त्यावर तसेच महावितरणच्या मुख्य वीजवाहिनीवर कोसळल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

सदर इमारत शेतकरी सहकारी संस्थेच्या मालकीची असून एकूण १४ धोकादायक इमारती आहेत त्यापैकी एका इमारतीवर बिल्डरने जेसीबीच्या साह्याने पाडकाम सुरू होते पाडकामावेळी कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तज्ञ आणि अनुभवी अभियंत्यांमार्फत धोकादायक इमारतीचा अहवाल घेण्यात आला नव्हता तसेच सुरक्षित अंतरावर लाईन मार्किंग आणि आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करणे आवश्यक होते तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना इमारतीच्या पालकांना बाबत सूचना करणे गरजेचे होते. या सर्वांना  डावलून बिल्डरने मनमानीपणे इमारतीचे पाडकाम केल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र काही क्षणांचा फरक पडला असता मोठी जीवित व वित्तहानी झाली असती, अशी प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने संबंधित बिल्डरला नोटीस बजावली आहे. मात्र यानंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.


धोकादायक इमारतींच्या पाडकामासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने अधिकृत निविदा प्रक्रिया राबवून ठेकेदाराची नियुक्ती केली असताना, खाजगी बिल्डरला हे पाडकाम करण्याची परवानगी कोणी दिली? अधिकाऱ्यांनी कोणत्या अधिकाराखाली ही परवानगी दिली? सुरक्षेचे नियम पायदळी तुडवत पाडकाम का करण्यात आले? अशा प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
त्यामुळे धोकादायक इमारती पाडकाम प्रकरणी पालखीने एसओपी तयार करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मान्य आहे.
या प्रकाराबाबत प्रभारी सहाय्यक आयुक्त थोरात यांना विचारले असता "संबंधित धोकादायक इमारतीच्या पाडकाम प्रकरणी बिल्डरला नोटीस काढण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर केला जाईल असे थोरात यांनी सांगितले."


या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकारी आणि संबंधित बिल्डरवर कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदेशीर आणि जीवघेण्या पाडकामांना आळा घालावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल *कल्याण : (दिपक मागाडे)* द...