Wednesday, 15 July 2026

NAMASTE दिन उत्साहात साजरा; कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर !!

NAMASTE दिन उत्साहात साजरा; कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांना सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडण्यावर भर !!

भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीत जनजागृती व प्रोफायलिंग उपक्रम संपन्न

ठाणे, दि. १५ : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 'NAMASTE Rural (National Action for Mechanised Sanitation Ecosystem)' अभियानांतर्गत NAMASTE दिन मंगळवार, दि. १४ जुलै, २०२६ रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायतीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश कचरा वेचक व स्वच्छता कर्मचाऱ्यांचे प्रोफायलिंग करून त्यांना सामाजिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण, कौशल्य विकास आणि सन्मानजनक उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देणे हा होता.

NAMASTE Rural ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असून स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध उपाययोजना या योजनेअंतर्गत राबविण्यात येत आहेत. यामध्ये कचरा वेचकांचे सर्वेक्षण व प्रोफायलिंग, क्षमता विकास, सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडणी, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य संरक्षण तसेच उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध उपक्रमांचा समावेश आहे.

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यापूर्वी राज्यस्तरावरून प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, गट विकास अधिकारी, जिल्हा सल्लागार, विस्तार अधिकारी, गट समन्वयक व समूह समन्वयक यांचे आभासी माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायत अधिकारी (सर्वेअर) यांचेही ऑनलाइन प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले असून त्यानुसार प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर सर्वेक्षण व जनजागृती अभियान सुरू करण्यात आले आहे.

कोन ग्रामपंचायतीत आयोजित कार्यक्रमास सरपंच रेखा पाटील, ग्रामपंचायत अधिकारी नितीन चव्हाण, जिल्हा सल्लागार दत्तात्रय सोळंके, मास्टर ट्रेनर ज्ञानेश्वर चंदे तसेच मोठ्या संख्येने कचरा वेचक व स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांना NAMASTE योजनेची सविस्तर माहिती देण्यात आली तसेच त्यांचे प्रोफायलिंग करण्यात आले.

योजनेअंतर्गत मिळणारे प्रमुख लाभ
NAMASTE योजनेद्वारे पात्र लाभार्थ्यांना पुढील सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत –
• NAMASTE ओळखपत्र 
• वैयक्तिक सुरक्षा साहित्य (PPE Kit) 
• आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आरोग्य विमा संरक्षण 
• लाभार्थ्यांच्या मुलांसाठी प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती 
• व्यावसायिक सुरक्षा व कौशल्य विकास प्रशिक्षण 
• District Waste Collection Centres (DWCCs) च्या माध्यमातून उद्योजक म्हणून विकसित होण्यासाठी मार्गदर्शन व सहाय्य 

No comments:

Post a Comment

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल *कल्याण : (दिपक मागाडे)* द...