Thursday, 16 July 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी’ प्रकल्पाचे कौतुक !!

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडून ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी’ प्रकल्पाचे कौतुक !!

** रस्ता सुरक्षा व साक्षरतेचा संदेश

विशेष प्रतिनिधी : 
संदीप शेंडगे

महाराष्ट्र राज्य शिक्षण संचालनालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी-२०२६’ उपक्रमाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी बारामती तालुक्यातील काठेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत भेट देत शुभेच्छा दिल्या. साक्षरता, नशामुक्ती आणि रस्ता सुरक्षा यांसारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर जनजागृती करणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक धोरणानुसार शिक्षण संचालक (योजना) कृष्णकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर, उपशिक्षण अधिकारी सचिन अनंतकवळस आणि भाऊसाहेब सरक यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

यावेळी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाचे विभागीय नोडल अधिकारी डॉ. मणिलाल शिंपी यांनी RSP अधिकारी-शिक्षक युनिटच्या माध्यमातून पालक व विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन, रस्ता सुरक्षेची जाणीव आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘ट्रॅफिक सेन्स’ विकसित करण्याचे महत्त्व स्पष्ट केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी RSP अधिकारी-शिक्षक युनिटच्या कार्याचे विशेष कौतुक करत, राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान अधिक प्रभावीपणे राबवून समाजात वाहतूक नियमांविषयी जनजागृती वाढविण्याची गरज व्यक्त केली. विद्यार्थ्यांमार्फत रस्ता सुरक्षा संस्कार रुजविल्यास भविष्यात अपघातांचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात केंद्रप्रमुख अजित नांगरे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी, स्वयंसेवक राजेंद्र जगे, ह.भ.प. गणेश महाराज भगत, जोशी महाराज, RSP अधिकारी संजय खैरनार यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिक्षण उपसंचालक राजेश क्षीरसागर यांनी ‘उल्लास-नवभारत साक्षरता वारी’ उपक्रमाचे उद्दिष्ट, नियोजन आणि समाजातील विविध घटकांचा सहभाग याविषयी मार्गदर्शन करत हा उपक्रम राज्यभर प्रभावीपणे पोहोचविण्याचे आवाहन केले.

No comments:

Post a Comment

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल *कल्याण : (दिपक मागाडे)* द...