Tuesday, 7 July 2026

उल्हासनगर मध्ये पुर्व वैमनस्यातुन तरुणाची हत्या, आरोपी अटक !!

उल्हासनगर मध्ये पुर्व वैमनस्यातुन तरुणाची हत्या, आरोपी अटक !!
 
उल्हासनगर , दि . ७ प्रतिनिधी : उल्हासनगर कॅंप ४  येथील कुर्ला कॅंप येथे पुर्व वैमनस्यातुन एका तरुणाचा चाकुचे वार करुन निर्घुन खुन केल्याची खळबळजनक  घटना काल रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली असुन या घटनेने सदर परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  विठ्ठलवाडी पोलिसानी काही तासातच आरोपीला अटक केली आहे . मयत व आरोपी लबाना समाजाचे असुन यापुर्वी त्यांच्या मध्ये केसेसच्या  वादातुन भांडणे झाली  होती. सतनाम सिंग लबाना असे मयत तरुणाचे नाव असुन गुरुप्रितसिंग उर्फ अनिस कर्तारसिंग लबाना  (१९) हे आरोपीचे नाव आहे.

उल्हासनगर कॅंप ५ येथील विर तानाजी नगर मध्ये राहणारे सतनामसिंग लबाना व गुरुप्रितसिंग लबाना हे एकाच  वस्तीत राहत आहेत.या दोन्ही कुटूंबामध्ये वाद सुरु होते. तर सतमानसिंग लबाना याला चोरीच्या गुंह्यात अटक केली होती. मात्र तो काही दिवसातच जामीनावर बाहेर आला. तेव्हा पासुन या दोन्ही कुटूंबातील  वाद विकोप्याला गेला.दरम्यान या दोन्ही कुटूंबातील वाद , एकमेकाविरोधात केलेल्या केसेसच्या कारणावरुन मनात राग धरुन गुरुप्रितसिंग उर्फ अनिस लबाना याने कॅंप ४ येथील कालीमाता मंदिराच्या मागे सतनाम सिंग याला गाठुन धारदार चाकुने त्याच्या मानेवर , छातीवर , पोटावर जबर वार करुन त्याला जिवे ठार मारले. या प्रकरणी सतनामसिंग लबाना यांचा भाऊ कुलदिपसिंग लबाना यांच्या तक्रारीवरुन गुरुप्रित लबाना याच्यवर भा. न्या. स कलम १०३ (१) सह महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३७ (१) व १३५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन आरोपीला पोलिसानी काही तासातच अटक केली आहे. तर सदर गुंह्याचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रहार गोडसे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "*

*" पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा ८१वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात साजरा "* महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ८ ज...