साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाला आणि चित्रकला ग्रेड परीक्षा सराव वर्गाला सुरुवात !!
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी उज्वल निकालाची परंपरा असलेल्या साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या अभ्यास वर्गाचे आणि चित्रकला ग्रेड परीक्षा अभ्यास वर्गाचे उद्घाटन साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड , माध्यमिक विभाग मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अंकुश जोगळे ,इयत्ता दहावीचे विषय शिक्षक आणि चित्रकला शिक्षक उपस्थित होते.
अभ्यास वर्ग सुरू झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही तसेच स्पर्धा स्वतःशी करा असे म्हटले. येथील गुणवत्तावान शिक्षक शालेय वेळेव्यतिरिक्त वेळेत आपणाला मार्गदर्शन करणार आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा असे म्हटले. तर शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मेहनत घेऊन साई ट्रस्टचे नाव मोठं करावं अशी शुभेच्छा दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक राजेंद्र ठाकूर यांनी केले. यावेळी जगदीश गावंड , श्रीमती सरोज पाटील , श्रीमती प्रमिला पवार , श्रीमती सुरेखा पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment