Thursday, 2 July 2026

विद्यार्थिनींना मासिक पाळी, आरोग्याविषयी मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप.!!

विद्यार्थिनींना मासिक पाळी, आरोग्याविषयी मार्गदर्शन व सॅनिटरी नॅपकिनचे वाटप.!!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) :
उरण येथील एन. आय. हायस्कूल येथे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थिनींना मासिक पाळी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. श्री समर्थ कृपा सखी स्वयं सहाय्यता संस्था, उरण आणि शीलक्ष्मी सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थिनींसाठी मासिक पाळी आरोग्य व स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमात विद्यार्थिनींना मासिक पाळीदरम्यान घ्यावयाची स्वच्छता, आरोग्याची काळजी, योग्य सॅनिटरी नॅपकिनचा वापर तसेच गैरसमज दूर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी ९५ विद्यार्थिनींना कॉटनचे सॅनिटरी नॅपकिन मोफत वितरित करण्यात आले.

या कार्यक्रमास श्री समर्थ कृपा सखी स्वयंसहाय्यता संस्थेच्या अध्यक्षा समाजसेविका रायगड भूषण संगीता सचिन ढेरे, उपाध्यक्ष मीनाक्षी कोळी व शिलश्मी सोशल फाउंडेशन यांच्या अध्यक्ष रजनी ताजणे. हृदया ,भैरवी व चौधरी सर त्याचप्रमाणे शाळेच्या ज्येष्ठ व माजी शिक्षिका कुमार मॅडम, शाळेचे मुख्याध्यापक  एल. एम . भोये, शाळेचे पर्यवेक्षक  भूषण झोपे, पर्यवेक्षिका जगताप मॅडम, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या शिक्षिका दिपाली पाटील, सहाय्यक शिक्षक  खरमाटे एस . बी , कवितके मॅडम उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनींनी या उपयुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. अशा प्रकारचे आरोग्य जनजागृती उपक्रम नियमितपणे आयोजित करण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटील प्रमुख पाहुणे !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटील प्रमुख पाहुणे !! *अध्यक्ष रविंद्र मानगावे, व...