Friday, 17 July 2026

*इम्पॅक्ट न्यूज : मिलापनगर तलाव परिसरात केडीएमसीकडून साफसफाई !!

*इम्पॅक्ट न्यूज : मिलापनगर तलाव परिसरात केडीएमसीकडून साफसफाई !!

*डोंबिवली, दि. 17 जुलै 2026*

"बातमीदार माझा" मध्ये 16 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीची केडीएमसी प्रशासनाने तातडीने दखल घेतली आहे. केडीएमसीच्या सफाई कर्मचाऱ्यांनी मिलापनगर तलावातील निर्माल्य आणि कचरा तलावातून काढला आहे. तसेच तलावाच्या आजूबाजूच्या परिसरातील कचरा आणि प्लास्टिकही उचलून नेण्यात आले आहे.

*नागरिकांच्या 6 मागण्यांवर अद्याप निर्णय नाही*  
स्वच्छता मोहिमेबद्दल स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केडीएमसीचे आभार मानले आहेत. मात्र स्थानिक नागरिकांनी केलेल्या एकूण 6 मागण्यांवर केडीएमसीने अद्याप कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे तलावाची स्वच्छता कायमस्वरूपी राखली जाईल का, याबत नागरिक साशंक आहेत.

*कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी*  
नागरिकांनी केडीएमसीला तलाव स्वच्छतेबाबत केलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात अशी मागणी केली आहे. तसेच तलावात निर्माल्य आणि कचरा टाकणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर कडक कारवाई करावी. नागरिकांनीही तलाव स्वच्छता राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी "बातमीदार माझा" आणि केडीएमसी प्रशासनाचे धन्यवाद व्यक्त केले आहेत.

No comments:

Post a Comment

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !! पनवेल येथील सेंट व...