Friday, 17 July 2026

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यास वर्गाला सुरुवात !!

साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या अभ्यास वर्गाला  सुरुवात !!

उरण दि १५, (विठ्ठल ममताबादे ) : मंगळवार दिनांक १४ जुलै २०२६ रोजी स्कॉलरशिप परीक्षेच्या उज्वल निकालाची परंपरा असलेल्या साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप अभ्यास वर्गाचे  उद्घाटन साई ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या शुभहस्ते झाले.

       यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड,माध्यमिक विभाग मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक  गिरीश पाटील , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  भूषण जाधव , इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  अंकुश जोगळे , बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे आणि इयत्ता चौथी व सातवी चे स्कॉलरशिप विषय शिक्षक  उपस्थित होते. 

        सदर स्कॉलरशिप अभ्यास वर्ग शाळेच्या वेळा व्यतिरिक्त १ तास अगोदर येऊन शिक्षक स्वतःचा जादा वेळ देऊन घेणार आहेत. अशाच प्रकारे इयत्ता दहावीचे इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे शिक्षक अभ्यास वर्ग शाळेच्या वेळा व्यतिरिक्त १ तास अगोदर येऊन घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष  नरसू पाटील  यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही असे सांगताना स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ध्येयवेडे व्हा असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. येथील गुणवत्तावान शिक्षक शालेय वेळेव्यतिरिक्त वेळेत आपणाला मार्गदर्शन करणार आहेत त्याचा जास्तीत जास्त लाभ आपण घ्यावा असे म्हटले. तर शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड  यांनी विद्यार्थ्यांनी अधिकाधिक मेहनत घेऊन रायगड जिल्ह्यात अधिकाधिक स्कॉलरशिप मिळवण्याचा मान मिळवून साई ट्रस्टचे नाव मोठं करावं अशी शुभेच्छा देताना सर्व स्कॉलरशिप शिकवणाऱ्या गुणी शिक्षकांचे कौतुक केले.मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील  यांनी स्कॉलरशिप परीक्षेत सर्वोत्कृष्ट गुण मिळवणारा विद्यार्थी शाळेच्या झेंडावंदनाचा मानकरी होईल. शाळेच्या वतीने हा मान विद्यार्थ्यांना दिला जातो ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे सर्वोत्कृष्ट गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेच्या इतिहासात नोंद होईल अशी प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली. इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक  अंकुश जोगळे यांनी आपल्या शाळेने सर्वाधिक स्कॉलरशिप आणण्याचा विक्रम करावा आणि साई ट्रस्ट चे नाव मोठे करावे असे म्हटले.बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली बोरचटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळवून आपल्या आई वडिलांचे आणि शाळेचे नाव मोठे करावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कॉलरशिप तज्ञ मार्गदर्शिका श्रीमती योगसाधना पाटील  यांनी केले

No comments:

Post a Comment

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !!

सेंट विल्फ्रेड्स कॉलेजच्या (पनवेल) वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांचा 'स्वागत समारंभ' उत्साहात साजरा !! पनवेल येथील सेंट व...