Sunday, 9 August 2026

आता उठवू सारे रान -: युवकांचा आवाज..

आता उठवू सारे रान -: युवकांचा आवाज..

गेल्या अनेक दिवसापासून चालू असणारे शैक्षणिक लढा हा शिक्षणा पुरता मर्यादित न राहता अनेक समस्यांचा आवाज झाला आहे. अनेक युवकांनी मांडलेले प्रश्न आज जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अंतर्गत लक्ष परिवर्तन संस्था युवकांच्या आवाज या कार्यक्रमात दिसले.

     शिक्षण, वाढती बेरोजगारी, पेपर फुटी, चॅट जिटीपी, ए आय, व्यसन, शिक्षण व्यवस्था, नीट परीक्षा, खेळाडूवरील अत्याचार, आत्महत्या, E20 पेट्रोल आणि इथेनॉल, अशा विविध प्रश्नातून युवकांनी आपले विचार मांडण्याच्या प्रयत्न केला. आज आपण बघतोय, पाहतोय पण यावर आपण बोलायला तयार नाही का? एकाची समस्या आहे का ? तर नाही ती समस्या प्रत्येकाची आहे त्याच्या विरोधात आवाज उठवणे देखील आपले कर्तव्य आहे. 

शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणे, आर्थिक फी यावर सरकारने विचार करायला हवे. जेणे करून सर्वांना शिक्षणात संधी मिळाले पण वाढती फी बघता १० नंतर ४० टक्के मुलांचे शिक्षण घटल्याचे समोर आले आहे. तरी आपण त्यावर शांत आहोत ? तसेच प्रश्न अत्याचाराच्या, तरुणांनी आपल्या आजूबाजूच्या आणि स्वतःच्या आयुष्यातील समस्या मांडल्या, तसेच त्या समस्यांवर उपाय शोधण्याचाही प्रयत्न केला. त्यामुळे ही चर्चा केवळ समस्या मांडण्यापुरती मर्यादित न राहता त्यातून पुढे काय करता येईल, याचाही विचार करणारी ठरली. चर्चेदरम्यान AI मुळे मुलांमध्ये आळशीपणा वाढत असल्याचा महत्त्वाचा मुद्दा मांडला. आजच्या काळात AI चा योग्य वापर आणि त्यावरील अतिनिर्भरता याबाबत तरुणांनी विचार करणे किती आवश्यक आहे, हेही या चर्चेतून जाणवले. मोबाईल मधील AI चा अती वापर तसेच इतर अँप चा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने अनेकाना वेगवेगळ्या प्रश्नांना समोरे जाऊन तणावाला बळी पडताना दिसत आहेत पण आपण त्यावर उपाय करण्यापेक्षा आजुन नवीन कसे अँप व मूल गुंतून कसे बसतील यांच्या विचार आपण करतो.

सरकार नागरिकांच्या प्रश्नावर उपाय कधी शोधणार ? कधी त्यांना न्याय देणार ? आज अनेक आमदार खासदार, नगरसेवक आहेत जे पैशाच्या जोरावर, पदावर नागरिकांच्या छळ करताना दिसत आहे. पण त्यावर सरकार बोलायला तयार नाही. आमली पदार्थाचे सेवन वयाच्या ६ वर्षापासून गलो गल्ली होताना दिसत आहे तरी देखील पोलिस प्रशासन गप्पा का ? आजुन किती लहान मुलांचे बळी घेणार आहे. असे असंख्य प्रश्न युवकांच्या मनात आहे आता त्यांना संधी मिळाली आहे आणि ते आवाज उठवून नागरिकांना जागे करून आपल्या हक्काच्या आवाज होण्यास तयार आहे. "हम सब एक हे" च्या घोषणेने तरुणांना लढण्याची ऊर्जा मिळाली. युवकांच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न सोडू शकतात त्यासाठी सर्वांनी एकत्र येणे देखील गरजेचे आहे. 


कार्यक्रमाला प्रमूख पाहुणे म्हणून जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय डॉ. संजय मंगला गोपाळ, श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, वी नीड यू सोसायटी सचिव अभय कांता, समता विचार प्रसारक संस्थेचे सचिव लतिका सुप्रभा मोतीराम, जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय अजय भोसले तसेच लक्ष परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष गोरख हिवाळे, योगेश कांबळे व इतर सदस्य उपस्थित होते.

हा कार्यक्रम सुंदर झाला याचा आम्हाला आनंद आहे. भविष्यात तो आणखी मोठ्या स्वरूपात व्हावा, अधिकाधिक तरुणांपर्यंत पोहोचावा आणि समाजातील महत्त्वाच्या प्रश्नांवर तरुणांना विचार करण्यासाठी, बोलण्यासाठी व कृती करण्यासाठी एक मजबूत व्यासपीठ मिळावे. कारण समाजात बदल घडवायचा असेल तर केवळ समस्या मांडून उपयोग नाही; प्रश्न विचारावे लागतील, विचार मांडावे लागतील, उपाय शोधावे लागतील आणि त्या उपायांवर कृतीही करावी लागेल. आजच्या या चर्चेतून एक आशा नक्कीच निर्माण झाली आहे की तरुणांना योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाले, तर ते समाजात नक्कीच सकारात्मक बदल घडवू शकतात.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतली असे वी नीड यू सोसायटी सदस्या कल्पना ताई, मनिषा ताई, रोनित व इतर सदस्य यांनी मेहनत घेतली.

2 comments:

ठाणे जिल्ह्याला दिलासा : बारवी धरण ओसंडून वाहू लागले; कल्याणसह परिसराचा पाणीप्रश्न सुटणार‌ !!

ठाणे जिल्ह्याला दिलासा : बारवी धरण ओसंडून वाहू लागले; कल्याणसह परिसराचा पाणीप्रश्न सुटणार‌ !! *ठाणे, प्रतिनिधी* : ठाणे जिल्ह्यात...