नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्याकडून अंबरनाथ येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा !!
अंबरनाथ | १५ ऑगस्ट २०२६ :
भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या अंबरनाथ येथील कार्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांच्या शुभहस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी, मानसेवी अधिकारी आणि नागरी संरक्षण स्वयंसेवक यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायन केले.
या कार्यक्रमास कार्यालयीन कर्मचारी, मानसेवी अधिकारी व नागरी संरक्षण स्वयंसेवक असे एकूण ५१ जण, तसेच १० होमगार्ड जवान उपस्थित होते. उपस्थितांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या एकता, अखंडता व सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी मा. उपनियंत्रक श्री. विजय जाधव सर यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद करताना नागरी संरक्षण विभागाची भूमिका, आपत्तीच्या काळातील स्वयंसेवकांचे योगदान आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक नागरिकाने बजावायच्या जबाबदारीवर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचारी, मानसेवी अधिकारी, नागरी संरक्षण स्वयंसेवक आणि होमगार्ड जवान यांच्यामध्ये उत्साहाचे व देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा विशेष संस्मरणीय ठरला.
स्वातंत्र्य, शिस्त, सेवा आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारा हा सोहळा नागरी संरक्षण नवी मुंबई समूह, ठाणे यांच्या अंबरनाथ कार्यालयात उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment