शिंदे गदाची महिला तालुकाप्रमुख प्रणाली किशोर म्हात्रे हिचा उपसरपंच निवडणुकीत दारुण पराभव करून युवा सामाजिक संस्थेच्या सीमा रवींद्र ठाकूर विजयी !
उरण दि ३०, (विठ्ठल ममताबादे) : जसखार गावाच्या उपसरपंच पदाच्या निवडणुका पार पडल्या त्यामध्ये युवा सामाजिक संस्थेच्या वतीने सीमा रवींद्र ठाकूर यांच्याविरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या महिला तालुका अध्यक्ष प्रणाली किशोर म्हात्रे यानी शिवसेना शिंदे गटाचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाशी हात मिळवणी करून सुद्धा युवा सामाजिक संस्थेच्या सीमा रवींद्र ठाकूर यांनी प्रणाली किशोर म्हात्रे यांचा दारूण पराभव केला. याच ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच म्हणून प्रणाली किशोर म्हात्रे ह्या कार्यरत होत्या त्यावेळी बाकी सर्व सदस्यांनी त्याच्यावर अविश्वास ठराव टाकून त्यांना पदावर हटवण्यात आले होते. तरीसुद्धा त्या पुन्हा एकदा उपसरपंच पदासाठी उभ्या राहिल्या व सत्तेच्या हव्यासा पोटी कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पक्षांसोबत युती करून सुद्धा पराभव झाला त्यामुळे परिसरात त्यांच्याविरुद्ध अनेक तर्क वितरक लावले जात आहेत.
तसेच नवनिवार्चीत उपसरपंच सीमा रवींद्र ठाकुर यांच्यावर सर्वच स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.सीमा रविंद्र ठाकूर यांनी या विजयाचे श्रेय ग्रामपंचायत सदस्य राकेश तांडेल आणि सचिन घरत तसेच युवा सामाजिक संस्थेच्या संपूर्ण टीम ला दिले आहे
No comments:
Post a Comment