Sunday, 4 October 2026

जीवनदीप लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरप जि.प. शाळेतील मुलांना 'सुरक्षाकवच' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती !!

जीवनदीप लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरप जि.प. शाळेतील मुलांना 'सुरक्षाकवच' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती !!

*कल्याण (संजय कांबळे) :* कल्याण तालुक्यातील जीवनदीप महाविद्यालयाच्या लॉ कॉलेजच्या द्वितीय वर्ष LLB च्या विद्यार्थ्यांनी वरप जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना 'मुलांचे सुरक्षा कवच' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती अभियान २०२६ मधून मार्गदर्शन केले.

गुरुवार दि. १ ऑक्टोबर रोजी आयोजित या शिबिरात मयूर मदन तारमळे, सचिन दुंदा भोईर, मोनिका चंद्रकांत लोंखडे, सुषमा पाटील, ऐश्वर्या निलेश मिसाळ आणि सोनाली पांडुरंग वाघ या कायद्याच्या विद्यार्थ्यांनी मुलांच्या सुरक्षिततेशी संबंधित कायदे, हक्क आणि संरक्षण याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

जिल्हा परिषद शाळेतील मुला-मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लक्षपूर्वक मार्गदर्शन ऐकले. या उपक्रमाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment

जीवनदीप लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरप जि.प. शाळेतील मुलांना 'सुरक्षाकवच' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती !!

जीवनदीप लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून वरप जि.प. शाळेतील मुलांना 'सुरक्षाकवच' अंतर्गत कायदेविषयक जनजागृती !! *कल्याण (सं...