Saturday, 10 October 2026

महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाने जेडब्ल्यूआरच्या कामगारांना तीन हजार पगारवाढ‌ !!

महेंद्रशेठ घरत यांच्या नेतृत्वाने जेडब्ल्यूआरच्या कामगारांना तीन हजार पगारवाढ‌ !!

** कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांचे मानले आभार

उरण दि ९, (विठ्ठल ममताबादे ) : कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांच्या दमदार आणि डॅशिंग नेतृत्वामुळेच जेडब्ल्यूआरच्या कंत्राटी कामगारांना तीन हजार रुपयांची पगारवाढ झाली आहे. त्याचा फायदा सुमारे ६० कामगारांना झाला आहे. हे कामगार स्थानिक भूमिपुत्र आहेत. कोरोना काळात ज्यांच्या हाताला काम नव्हते, कामासाठी धडपडत होते, तेव्हा महेंद्रशेठ घरत यांनी हजारोंना नोकऱ्या, त्यातीलच हे ६० कामगार आहेत. त्यामुळे कामगारांना सतत पगारवाढ आणि ऐन संकटाच्यावेळी नोकऱ्या मिळवून दिल्या आणि वाचवल्याबद्दल शुक्रवारी(ता. ९) 'सुखकर्ता' बंगल्यावर कामगारांनी महेंद्रशेठ घरत यांचे आभार मानले. यावेळी भरत गायकवाड, किरण कुंभार आदी कामगार प्रतिनिधीही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

अमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना 'युवा पत्रकार पुरस्कार' प्रदान !

अमळनेरचे संपादक श्री. सुरेश हिरामण कांबळे यांना 'युवा पत्रकार पुरस्कार' प्रदान ! पाचोरा येथे दिमाखात पार पडले महाराष्ट्र राज्य पत्रक...