Wednesday, 2 July 2025

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन (रजि.) तर्फे निळकंठ बगळे "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन (रजि.) तर्फे निळकंठ बगळे "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
         गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन(रजि.)तर्फे
तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मा.श्री.निळकंठ बगळे साहेब यांना "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्मा. श्री. निळकंठ बगळे साहेब लांजा तालुक्यामध्ये आल्यापासून खूप काही चांगले निर्णय घेऊन चांगले काम करत आहेत. लांजा तालुक्यामध्ये बाहेरून येणारे परप्रांतीय यांची सखोल चौकशी करून त्यांची विचारपूस करत आहेत. आपले कर्तव्य लक्षात घेऊन खूप काही मोलाची चांगली कामे‌ केली. तसेच लांजा तालुकामध्ये कोणत्याही संस्थेचे व समाजाचे कार्यक्रम असले की त्यांना आमंत्रण दिल्यानंतर ते त्या आमंत्रणाचा आदर करून हजर राहतात. त्याचा लांजा मधील नागरिकांना खूप अभिमान आहे. पोलीस निरीक्षक साहेबाना सोमवार (दि.३० जून २०२५) रोजी गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्यावतीने लांजा पोलीस स्टेशनला भेट देऊन त्यांना सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
           गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत करंबळे, उपाध्यक्ष श्री. सुभाष रामाणे, महासचिव- अमोल मेस्त्री, खजिनदार श्री.रवींद्र कोटकर यांच्य उपस्थितीत  लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.निळकंठ बगळे साहेब यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी रत्नागिरी शहरी विभागाचे पोलीस अधिकारी व हवालदार तसेच लांजा तालुक्याचे पोलीस अधिकारी व हवालदार. कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
           उच्च न्यायालयाचे कर्मचारी,समाजसेवक श्री.चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत, याशिवाय जेष्ठ नागरिक समूहाला पाणी, बिस्कीट वाटप केले जाते. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे. गुरुमाऊली चंद्रभागा फॉउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचा या सर्व कार्यास मोलाचा सहभाग असतो.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन (रजि.) तर्फे यशवंत केडगे "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन (रजि.) तर्फे यशवंत  केडगे "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ ने सन्मानित !!

मुंबई (शांताराम गुडेकर)
        गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन (रजि.) तर्फे
सोमवारी (३० जून२०२५) रोजी सन्मा.श्री.यशवंत रघुनाथ केडगे (DYSP Sdpo Lanja Dist-Ratnagiri) हे वयानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले म्हणून सेवानिवृतीचे औचित साधुन त्यांनी पोलीस दलात असताना केलेली कामगिरी पाहून गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन- गाव गवाणे, तालुका- लांजा,जिल्हा -रत्नागिरी यांच्यावतीने
श्री.यशवंत रघुनाथ केडगे(DYSP Sdpo Lanja Dist-Ratnagiri) यांचा "सामाजिक कर्तव्यदक्ष पुरस्कार-२०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
       गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत करंबळे, उपाध्यक्ष श्री. सुभाष रामाणे, महासचिव- अमोल मेस्त्री, खजिनदार श्री. रवींद्र कोटकर यांच्य उपस्थितीत त्यांची पत्नी,मुले व लांजा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. निळकंठ बगळे साहेब, रत्नागिरी शहरी विभागाचे पोलीस अधिकारी व हवालदार तसेच लांजा तालुक्याचे पोलीस अधिकारी व हवालदार. कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
       उच्च न्यायालयाचे कर्मचारी, समाजसेवक श्री. चंद्रकांत चंद्रभागा शिवराम करंबळे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत, याशिवाय जेष्ठ नागरिक समूहाला पाणी, बिस्कीट वाटप केले जाते. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री. चंद्रकांत शिवराम करंबळे यांचा मूळ उद्देश आहे. गुरुमाऊली चंद्रभागा फॉउंडेशनचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि सभासद, हितचिंतक यांचा या सर्व कार्यास मोलाचा सहभाग असतो.

Tuesday, 1 July 2025

वाडा तालुक्यातील राष्ट्रवादी (शरद पवार), जिजाऊ संघटना व अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अजितदादांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश !!

वाडा तालुक्यातील राष्ट्रवादी (शरद पवार), जिजाऊ संघटना व अन्य पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अजितदादांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश !!

मुंबई /दि.1 जुलै :
वाडा तालुक्यातील विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे सरचिटणीस, आमदार शिवाजीराव गर्जे, ज्येष्ठ नेते नवाब मलिक, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार दौलत दरोडा, आमदार सनाताई मलिक, आमदार किरण लहामटे, पालघर जिल्हा अध्यक्ष आनंदभाई ठाकूर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. *यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केलेले वाडा तालुक्यातील गजानन पाटील यांना पालघर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद देण्यात आले आहे.*

मुंबई येथील महिला आर्थिक भवन येथे मंगळवार (दि. 1 जुलै) हा प्रवेश कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी वाडा तालुक्यातील खालील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी (शरद पवार), जिजाऊ संघटना व अन्य पक्षातून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांची नावे खालीलप्रमाणे -

*राष्ट्रवादी (शरद पवार पक्ष) हमरापूर - कंचाड विभाग*
* गजानन पाटील, दीपेश पाटील, अनिकेत भोईर, राहुल पाटील, गणेश सांबरे, लोकेश जैन, पवन पाटील, सचिन पाटील, समीर भानुशाली, स्वप्नील पाटील, सचिन फराड, महेश पाटील, पद्माकर म्हात्रे, सुदाम भगत

*जिजाऊ संघटना (मोज / आबिटघर विभाग)*
* सुधीर विशे (जिजाऊ संघटना संघटक), सचिन विशे (विभाग प्रमुख), पुंडलिक ठाकरे (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते) भास्कर गावित (सरपंच ग्रु. ग्रा.खैरे - आंबिवली) मंगला गावित, दिनेश देशमुख, अमित देशमुख, संदीप जाधव, कैलास भोईर, पंढरी पाटील, दिनेश देशमुख, मनोज वाघ, स्वप्नील भोईर, प्रदीप देशमुख, पंढरी देशमुख, अंकुश गावित, रोहन गावित, जयराम गोरे, शंकर सवर, जयेश भुरकुड, अच्युत वेखंडे, बापू वळवी, नामदेव देशमुख, चंद्रकांत पटारे, विशाल धांगडे, समीर चौरे, महेंद्र मलावकर, सुभाष पाटील, संतोष नवले, नरेश देशमुख, भगवान निरगुडे, भगवान झुगरे, विराज निरगुडे, राहुल मलावकर आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण !!

रोटरी वर्षाची सांगता विविध उपक्रमांनी; रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण !!

चोपडा, प्रतिनिधी - रोटरी या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेचे वर्ष १ जुलै ते ३० जून या कालावधीचे असते. दरवर्षी नवीन व्यक्तीकडे रोटरीची पदे आनंदाने सोपविली जातात. ३० जून रोजी रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष रोटे. डॉ. ईश्वर सौंदणकर व मानद सचिव रोटे. भालचंद्र पवार यांनी आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह क्लबचे स्वप्न असणारा प्रकल्प - रोटरी रुग्णवाहिकेचे लोकार्पण व इतर दोन प्रकल्प पूर्णत्वास नेत रोटरी वर्षाची सांगता केली. 

रोटरी भवन येथे झालेल्या रुग्णवाहिका लोकार्पण प्रसंगी रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे भावी प्रांतपाल रोटे. डॉ. राजेश पाटील (जळगाव) यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी मंचावर क्लबचे अध्यक्ष डॉ. ईश्वर सौंदाणकर, सचिव भालचंद्र पवार, कोषाध्यक्ष प्रदीप पाटील, क्लबचे भावी अध्यक्ष आशिष जयस्वाल, सचिव विश्वास दलाल, कोषध्यक्ष निखिल सोनवणे, रोटरी सेवा संस्थेचे सचिव विलास एस. पाटील, प्रकल्प मार्गदर्शक नितीन अहिरराव व या रुग्णवाहिकेचे संचालन करणारे डॉ. दुर्गेश जयस्वाल हे उपस्थित होते. रोटरी रुग्णवाहिका जयस्वाल हॉस्पिटल चे संचालक डॉ. दुर्गेश जयस्वाल यांना सुपूर्त करण्यात आली ह्यावेळी सर्व रोटरी सदस्य बंधू-भगिनींच्या चेहऱ्यावर स्वप्नपूर्ती झाल्याच्या आनंद दिसून आला. याप्रसंगी डॉ. राजेश पाटील, आशिष गुजराथी, नितीन अहिरराव यांनी मनोगते व्यक्त केली तर सूत्रसंचालन संजय बारी यांनी व प्रास्ताविक डॉ. सौंदाणकर यांनी व आभार प्रदर्शन भालचंद्र पवार यांनी केले.

याप्रसंगी क्लबचे आशिष गुजराथी, संजीव गुजराथी, पंकज बोरोले, प्रवीण मिस्त्री, लीना पाटील, अरुण सपकाळे, चंद्रशेखर साखरे, विलास कोष्टी, शिरीष पालीवाल, रुपेश पाटील, चंद्रशेखर पाटील, शशिकांत पाटील, डॉ. नीता जयस्वाल, पुनम गुजराती, विलास पी. पाटील अनुराग चौधरी, गौरव महाले यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्लबतर्फे बाजारपेठेत १००० कापडी पिशव्या मोफत वाटून पर्यावरण संवर्धनास मदत केली. यासाठी रोटरी क्लब ऑफ चोपडा कडून ज्या महिलांना शिलाई मशीन देण्यात आले होते त्यांनाच कापड देऊन त्यांच्याकडून या पिशव्या शिवून घेतल्या यातून महिला सबलीकरण व पर्यावरण दोघेही हेतू सध्या झाले, यासाठी प्रकल्प प्रमुख डॉ पराग पाटील होते. तसेच प्रेरणा मतिमंद विद्यालयातील मतिमंद विद्यार्थ्यांसाठी दंत - नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर सकाळी आयोजित करण्यात आले होते . या शिबिरात डॉ. राहुल पाटील डॉ. तृप्ती पाटील व डॉ. अमोल पाटील यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. विविध प्रकल्पांचे यशस्वी आयोजन करत रोटरी वर्षाची मोठ्या उत्साहात व आनंदात सांगता करण्यात आली. रोटरी क्लब चोपडाच्या सदस्य बंधू व भगिनी यांनी उपस्थिती दिली.

'माझ्या भीमाच्या नावाचं'... गाण्याचे रचनाकार भीमराव काळेनंद यांचे "महाप्रयाण" !!

'माझ्या भीमाच्या नावाचं'... गाण्याचे रचनाकार भीमराव  काळेनंद यांचे "महाप्रयाण" !!

आपल्या कलेच्या माध्यमातून फुले -शाहू-आंबेडकर चळवळ जिवंत ठेवण्याच्या कामासाेबतच महामानवांचे विचार घराघरात पाेहाेचवण्याचे कार्य सामाजिक कार्यकर्ते, कवी, साहित्यिकांनी आणि कलाकारांनी वेळाेवेळी केले आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे महाराष्ट्राचे ख्यातनाम ज्येष्ठ गीतकार, गायक भीमराव अर्जुन काळेनंद (कुंबेफळकर) यांच्या कार्याला माझा सलाम... 

लहानपणापासूनच त्यांना लिखाणाची आवड हाेती. लेखणीतून समाजप्रबाेधन घडावे, गाण्यातून परिवर्तन घडावे या उदात्त ध्येयाने प्रेरित हाेऊन काळेनंद दादांनी हातात लेखणी घेतली आणि अनेक गाणी जन्माला घातली. 

भीमराव काळेनंद बीड जिल्ह्यातील, आष्टी तालुक्याचे रहिवासी हाेते. कुंबेफळ हे त्यांचे मूळ गाव. कुंबेफळ नावाच्या खेड्यात एका गरीब कुटुंबात काळेनंद यांचा जन्म झाला. हलाखीच्या परिस्थितीतही "न खचता ते पुढे वाटचाल करत राहिले. कुंबेफळ गावातील काळेनंद दादा पहिले पदवीधर होते. कालांतराने बरीच वर्षे त्यांनी मुंबईत कल्याण तालुक्यात माेहाेने आंबेवाडी या ठिकाणी वास्तव्य केले. १९७२ साली ते मुंबईत आले. खेडेगावात जन्माला आलेल्या या व्यक्तिमत्वाने आपल्या गावाचे नाव कला आणि लेखणीच्या जाेरावर संपूर्ण महाराष्ट्रात नेले. इयत्ता आठवीला असताना त्यांनी गाणी लिहायला सुरुवात केली. १९७२ मध्ये त्यांनी पहिले गाणं रेकॉर्ड केलं आणि भीमराव काळेनंद यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. वडील भजन करायचे, त्यांच्यासाेबत मी जायचाे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर गीतरचना करायचो असे देखील त्यांनी मला सांगितले. 

आजपावेताे ५००० हून अधिक भीमगीते, लाेकगीते, प्रबाेधनगीते, भक्तिगीते, भजन-पाेवाडे यांची रचना केली. काळेनंद दादांनी सुरुवातीच्या काळात कल्याण येथील रुक्मिणी रुग्णालयात काम केले. त्यानंतर वडिलांच्या
इच्छेनुसार एन.आर.सी कंपनीमध्ये २७ वर्षे नाेकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. कंपनीमध्ये नाेकरी करताना आपले लिखाण अव्याहतपणे त्यांनी सुरूच ठेवले. साेबतच तबला, ढाेलकी, पेटी, हार्माेनियम अशा प्रकारचे वाद्य वाजविण्याचाही त्यांना छंद हाेता.

 ‘माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लावील रमानं’, ‘सहा डिसेंबर छप्पन साली’, ‘मी जगेल तर या समाजासाठी’, मी मरेल तर या समाजाच्यासाठी',अशी अनेक स्फूर्तिदायक गीते प्रचंड लाेकप्रिय झाली. ‘तर भिमान मढवल तुला माणूस घडवलं’, ‘लाख मताने निवडून आली माता रमामूळ त्या’, ‘बुद्धाची जयंती’, ‘सिद्धार्था आम्हाला साेडून जाऊ नकाे’, , फिरे घेऊन झेंडा निळा’, 'लहुच्या तालमीत होते टिळक शिकायला' ‘बुद्धाची वाणी, रामजीचा लाल, भीमाची रमा, निळ्या झेंड्याचे कफन पाहिजे, लय दिवसानं गेलोय,सासरवाडी,लाकाेराेना जनजागृती’, ‘भक्तिगीते, लाेकगीते अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली. 

सुषमा देवी यांनी आपल्या पहाडी आवाजाने गायिलेले ‘माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लाविलं रमानं’ या गाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला. या गाण्याशिवाय डाॅ. बाबासाहेबांची जयंती असाे किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम असाे हे गाणे वाजविल्याशिवाय प्रेक्षकांना चैन पडत नाही. असे हे गाणे आज प्रत्येक भीम अनुयायांच्या आणि सर्वांच्या ओठावर आल्याशिवाय राहत नाही. त्या गाण्याचे कवी म्हणजे भीमराव अर्जुन काळेनंद...  

या गाण्याचा शेवट त्यांनी असा केला आहे की, ‘काळेनंद अशी ही मायी, झाली नवकाेटीची आई ! ती वागली प्रेमानं कुंकू लावील रमानं’ हे गाण्याचे कडवं ऐकताच काळेनंद दादा यांची आठवण मनाला चटका लावून जाते...

तसेच ६ डिसेंबरला डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्याा महापरिनिर्वाण दिनी महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेरील नागरिकांच्या स्टेटस्वरती एकच गाणं झळकत ते म्हणजे ‘सहा डिसेंबर छप्पन साली वेळ कशी ती हेरली... ’ हे गाणे ऐकताच डाेळ्यातून आजही अश्रू ओघाळतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची  आठवण या गाण्यातून भीमराव काळेनंद दादांनी करून दिलेली आहे. ते गाण्यात लिहतात की, शान जळता भारतभूची चितेवरती पाहिली, पाहताक्षणी कालेनंदने श्रद्धांजली वाहिली...

डबडबलेल्या अश्रुंनीही महिमा त्यांची गाईली
अमर झाली भीमाची किर्ती  डोळ्याने मी पाहिली...
जाता जाता हृदयी ही आमुच्या मूर्ति बुद्धाची कोरली...
दुष्ट काळाने भीमरायांची प्राणज्योत ती चोरली...

हे गाणं अजरामर ठरलं आहे. 

मी मरेल तर या समाजासाठी, मी जगेल तर या समाजासाठी...’ या गाण्यातून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि समाजाप्रती असलेलं प्रेम काळेनंद यांनी 
लेखणीतून हुबेहूब लेखणीतून रेखाटले आहे.

२००५ साली महापूर आला हाेता. त्या महापुरात गाण्यांच्या डायऱ्या पाण्यात वाहून गेल्या. त्यात विविध प्रकारची १५०० गाणी लिहिली हाेती. अशी आठवण त्यांनी मला स्वतः फोनवर सांगितली हाेती. अनेक वेळा त्यांच्या सोबत माझा फोन वर संपर्क झाला असून, आम्ही अनेक गाण्यांवर चर्चा केली आहे.  गाण्यांच्या डायऱ्या पाण्यात वाहून गेल्या. मात्र त्यांची लेखणी थांबली नाही. निस्वार्थी भावनेने ते लिहीत राहिले. आणि सर्वांच्याच ओठी जे नाव फुलू लागलं ते म्हणजे भीमराव काळेनंद...

त्यांनी लिहिलेली गाण्यांच्या डायऱ्या पाण्यात बुडून गेल्या. पाण्यामध्ये जरी डायऱ्या बुडून गेल्या. मात्र त्यांची लेखणी थांबली नाही ते लिहत राहिले. आपल्या लेखणीतून प्रबोधन करत राहीले. भीमराव कालेनंद यांचे विशेष म्हणजे अनेक गाणी त्यांची ताेंडपाठ हाेती. दादांनी फोनवर बाेलताना माझ्याशी खंत व्यक्त केली हाेती. ते म्हणाले हाेते, ‘मी जी गाणी लिहिली ती गाणी अजरामर ठरली. परंतु त्याचा माेबदला मला कधीच मिळाला नाही आणि मी कधी पैशामागे फिरलाे ही नाही.’ असं साधं, सरळ जीवन काळेनंद दादा आयुष्यभर जगले. आणि समाजामध्ये नावं त्यांनी कमावलं. आपली कला जाेपासत त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले. त्यांना चार मुले आणि दाेन मुली आहेत. (अशोक, सम्राट , साजन, आकाश, वैशाली ,कविता) नऊ महिन्यापूर्वी पत्नीचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे काळेनंदांनी लिहिलेली गाणी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, सुषमा देवी, रंजना शिंदे, दीपरुसवा, चंद्रकांत शिंदे अशा अनेक नामवंत गायक कलाकारांनी गायली आहेत. टी सिरीज, विनस, प्रीझम, कश्मीर इ. कॅसेट कंपनीने काळेनंद दादांंच्या गाण्यांना माेठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली.

‘जगात देखणी, भीमाची लेखणी’ या अजरामर ओळी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डकांनी बाबासाहेब घराघरात पाेहाेचवला अशा महाकवी वामनदादा कर्डक तसेच स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांचा सहवास काळेनंद दादांना काही काळासाठी लाभला.

१९८४ मध्ये लाेकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या नावाचं 
महामंडळ स्थापन  करायच होत. त्यासाठी दिल्लीला देखिल ते गेले होते. त्यासाठी भीमराव काळेनंद दादांनी खूप धावपळ केली हाेती. 

२००८ साली मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते कला भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २०१७ साली अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद-पुणे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उत्कृष्ठ लेखनाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला.‌ २०१७ साली अखिल भारतीय मातंग संघ, मानखुर्द मुंबई यांचेकडून 'समाजभूषण पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. २०१८ मध्ये बहुजन राष्ट्र समितीच्या वतीने ‘डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगाैरव सन्मान पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. २०२२ साली लाेककवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी महाेत्सव समिती कल्याण यांच्या वतीने  ‘जीवनगाैरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तर त्यांच्या कलेचे दखल घेऊन विविध ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

आपल्या समाजातील घटक प्रबोधन,परिवर्तन करतोय म्हणूनच त्यांच्या कार्याची दखल घेवून, कल्याण येथिल सूत्रसंचालक शशिकांत चव्हाण आणि सामाजिक कार्यकर्ते सदानंद गायकवाड यांनी भीमराव काळेनंद आणि प्रसिद्ध गायिका सुषमा देवी यांना घरी बोलाऊन त्यांचा सन्मान केला. म्हणजेच बाबासाहेबांची चळवळ आपल्या कलेच्या माध्यमातून पुढे नेणाऱ्या कलावंतांचा सन्मान होणे ही काळाची गरज आणि आपली सामाजिक बांधिलकी आहे.

कलाकार पेन्शन याेजना मिळावी म्हणून गेल्या पाच वर्षापासून त्यांची खटपट सुरू हाेती. २०२५ मध्ये त्यांना माेबदला मिळाला आणि फक्त दाेन आठवडेच. म्हणजे शेवटच्या क्षणापर्यंत कलाकाराला वंचितच रहावे लागले. ज्या कलाकारांनी आपल्या लेखणीतून शेवटपर्यंत प्रबाेधन आणि परिवर्तन केले अशा कलाकारांना वेळेतच न्याय आणि त्यांच्या हक्काचा माेबदला मिळाला पाहिजे. त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली असे समजले जाईल.

आमचे वडील आदर्श होते. त्यांची सेवा करण्याची संधी आम्हाला मिळाली. त्यांनी आम्हाला चांगले शिक्षण देऊन, आमच्यावर चांगले संस्कार दिले. आज आमच्या पंखात त्यांनी बल दिले आहे. अनेक गाणी त्यांनी लिहिली आणि समाजाच प्रबोधन केलं . त्यांनी लिहिलेल्या गाण्यातून त्यांच्या आठवणी आज जिवंत राहतील. जे त्यांचं साहित्य आहे. ते साहित्य आम्ही सांभाळून ते समाजापर्यंत पोहोचवणार आहोत. असे काळेनंद यांचा मुलगा सम्राट यांने माझ्याशी बोलताना सांगितले.

आजपर्यंत विविध विषयावरती त्यांनी गाणी लिहिलेली आहेत. सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी या गाण्यांचा फायदा झाला आहे. समाज प्रबोधनासाठी  जी गाणी लिहून ठेवली आहेत त्यांचा पुढे देखिल  होणार आहे. म्हणून त्यांचे सर्वच लिखाण आंबेडकरी चळवळीसाठी  अतिशय उपयुक्त असं ठरणार आहे. तर येणाऱ्या काळात  डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू बुद्ध भीम गीत ब्लॉगस्पॉट डॉट.कॉम या साइटवर तसेच  रायटर बीए काळेनंद या यूट्यूब चॅनेलवर भिमराव काळेनंद यांचं लिखाण आपल्याला वाचायला मिळणार आहे.

दिनांक १९ जून २०२५ रोजी काळेनंद दादांची प्रकृती बिघडली त्यानंतर उल्हासनगर येथील एका हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती अधिक बिघडली आणि दिनांक २२ जून २०२५ रोजी पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास वयाच्या ७८ वर्षी त्याची प्राणज्योत मावळली. 

ही दुःखद बातमी समजताच पूर्ण महाराष्ट्र मध्ये शोककळा पसरली. आंबेडकरी चळवळीतील एक प्रतिभावंत महाकवी आपल्यातून निघून गेल्याने, त्यांनी लिहिलेल्या अजरामर गाण्यांचे स्टेटस सर्वांच्या माेबाईलवर दिसू लागले आणि त्यांना अभिवादन करू लागले. 

पाश्चात देशात लिखाणाला महत्त्व :  डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू बुद्ध भीम गीत ब्लॉगस्पॉट डॉट.कॉम या  वेबसाइटवर भारत देशाच्या बाहेरून सुद्धा काळेनंद दादा यांच्या गाण्याचे लिखाण  लंडन, अमेरिका, न्यूझिडल, दुबई, युके, अशा विविध देशातून लिखाण वाचलं गेले आहे. एवढं दर्जेदार लिखाण भीमराव काळेनंद यांनी केले असून बाहेरच्या देशातसुद्धा त्यांची गाणी लाेकप्रिय ठरली आहेत. 

सामाजे परिवर्तन :  काळेनंद दादा यांना झाडे लावण्याची खूप आवड होती. काळेनंद दादा यांचा मुलगा सम्राट याने दोन वर्षांपूर्वी रत्नागिरी येथून आंबे आणले होते. आणि त्या आंब्याची कोय काळेनंद दादा यांनी घराजवळ लावली होती. ते रोप मोठ होऊन त्या झाडाची देखभाल स्वतः काळेनंद गेल्या दाेन वर्षांपासून करीत हाेते. त्यांच्या मृत्यू नंतर काळेनंद यांच्या परिवाराने मोहने, गालेगाव स्मशान भूमिच्या आवारात त्यांच्या अस्थीवर ते झाड आज लावण्यात आले आहे. त्या झाडाची निगा काळेनंद परिवार करणार आहे. म्हणजे अस्थी विसर्जित न करता काळेनंद यांच्या परिवाराने सामाजिक एक नवा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला दिसून येत आहे. 

लेखकाला अंधारात ठेऊ नका : आजकाल गायक हा वेगाने फेमस हाेताे. गाणे देखील झपाट्याने व्हायरल हाेतात. त्या गाण्याच्या रिल्स बनतात. परंतु ज्यांच्या लेखणीने गाणं साकार झालेले आहे. त्या गाण्याच्या लेखकाला नेहमीच अंधारात ठेवले जाते. असंख्य गाणी युट्युबवर टाकली जातात. परंतु लेखकाच्या नावाचा विसर पडलेला असताे. ज्याने गाणं जन्माला घातलं आहे. त्याच नावं आलेच पाहिजे. ही देखील खबरदारी, जबाबदारी आणि सामाजिक बांधिलकी आपण जपली पाहिजे. लेखक हे गाण्याचे मूळ निर्माते असतात आणि त्यांना गाण्याचे कॉपीराइट मिळू शकतात. ज्येष्ठ कवी, गायक भीमराव काळेनंद यांचे साहित्य सांस्कृतिक चळवळ अधिक गतिमान करणारे साहित्य आहे. 

आपल्या कलेच्या माध्यमातून समाज परिवर्तन आणि प्रबाेधन करणाऱ्या कलावंतांच्या आठवणी जिवंत ठेवणे आजच्या तरुणांनी, कार्यकर्त्यांनी खूप महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. त्यातूनच आपल्याला प्राेत्साहन मिळत असते. त्यांनी विविध विषयावरती केलेले लिखाण, साहित्य प्रत्येकाच्या घराघरांमध्ये पाेहाेचवण्याचा काम आपण सर्वजण करूया. तेव्हाच खऱ्या अर्थाने कवी भीमराव अर्जुन काळेनंद यांना अभिवादन ठरेल. 


लेखक : कवी, पत्रकार - मिलिंद सुरेश जाधव 
रा.पडघा, भिवंडी मो.८६५५५६९४३६

युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराची "एक वारी रक्तदानाची" वारीत रक्तदानाची जनजागृती !!

युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराची "एक वारी रक्तदानाची" वारीत रक्तदानाची जनजागृती !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

मुंबई - रक्तदान क्षेत्रात कार्यशील असलेल्या युनिक ब्लड मोटिव्हेटर्स रक्तदाते परिवाराचे सात समर्पित आणि समाज सेवेसाठी कायम तत्पर असणारे सदस्य रक्तदान जनजागृतीचा बॅनर हातात घेऊन मुंबईहून पंढरपूर वारीला निघाले.  वारीच्या पहिल्याच दिवशी  त्यांनी संपूर्ण मार्गावर "रक्तदान हीच खरी सेवा" हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवले. संध्याकाळी पंढरपूरमध्ये पोहोचताच, तेथील पंढरपूर ब्लड बँकेत आपल्या तीन सदस्यांनी निःस्वार्थपणे रक्तदान करून श्रद्धा, सेवा आणि माणुसकीचा अनोखा संगम साकारला.रक्तदान जनजागृतीचे बॅनर हाती घेऊन भाविकांमध्ये एक वेगळीच जागृती निर्माण करत आहेत.

रक्तदान जनजागृती मोहीम प्रमुख म्हणून श्री. सचिन निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे संस्थापक सदस्य रामेश्वर खरूळे, मंदार नायक, हर्ष शिरसाट, सचिन धुरी, किरण पारसेकर, कु. तेजस रामेश्वर खरुळे आदींनी प्रत्यक्ष सहभागी होत हजारो वारकऱ्यांमध्ये रक्तदानाचे महत्त्व प्रभावीपणे पोहोचवले.

वारीस जातो देव भेटी, रक्तदानाने देऊ जीवन भेटी !", "वारीत देव दर्शन, रक्तदानात माणुसकीचे दर्शन !" अशा प्रेरणादायी घोषवाक्यांसह युनिक टीमने हातात फलक, बॅनर्स आणि माहितीपत्रके घेऊन मार्गावर जनजागृती केली. या उपक्रमामुळे अनेक वारकऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदानासाठी नोंदणीही केली.
यावेळी बोलताना श्री. सचिन निकम म्हणाले, "वारी ही केवळ भक्तीची यात्रा नसून, ती मानवतेच्या सेवेसाठी एक मोठी संधी आहे. लाखो वारकऱ्यांमध्ये रक्तदानाचा संदेश पोहोचवल्यास त्याचा व्यापक आणि सकारात्मक परिणाम होईल."

"युनिक ब्लड मोटिव्हेटर्स" ही संस्था गेल्या 7 वर्षांपासून  संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान, थॅलेसेमिया जनजागृती, आणि आरोग्य शिबिरांचे आयोजन करून समाजसेवेचे कार्य करत आहे.
अशा या मानवतेच्या कार्याला संपूर्ण युनिक परिवाराला वारकरी भाविकांकडून लाख लाख आशीर्वाद मिळाले आहेत.

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी - डॉ.सुभाष घुले

अपेडाच्या माध्यमातून गुळ निर्यातीस चालना मिळावी - डॉ.सुभाष घुले

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापूर व अपेडा मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 30 जून 2025 रोजी इजिनिअर असोसिएशन हॉल, उद्यमनगर,कोल्हापूर येथे गुळ निर्यात कार्यशाळा पार पडली. कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. विद्यासागर गेडाम, प्रमुख गुळ संशोधन केंद्र, कोल्हापूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. पांडूरंग बामने, सहाय्यक व्यवस्थापक अपेडा, डॉ.सुभाष घुले उपसरव्यवस्थापक,पणन मंडळ कोल्हापूर, कृषि विज्ञान केंद्र कनेरीचे प्रा. पांडूरंग काळे, गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासाहेब पाटील, पणन मंडळाचे अधिकारी ओंकार माने, प्रसाद भुजबळ, सत्यजित भोसले, सुयोग टकले, व गुळ उत्पादक उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना पणन मंडळ कोल्हापूरचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी केली. गुळ उत्पदकांनी गुळ निर्यात करणेकरीता अपेडा चे माध्यमातून प्रयत्न करावे भौगोलिक मानांकन अतर्गत वैयक्तिक गुळ उत्पादकांनी नोंदणी करणे अवश्यक असल्याने गुळ उत्पादकांनी जि आय नोंदणी करावी, जेणेकरून कोल्हापूरी गुळ जगभरात पोहोचण्यास मदत होईल याबाबत कृषी पणन मंडळा च्या योजनांचा फायदा गूळ उत्पादकांनी घ्यावा असे सांगीतले. तसेच पणन मंडळाच्या योजनांबाबत माहिती दिली. अपेडाचे श्री. पांडूरंग बामने यांनी अपेडाच्या योजना, निर्यात क्षेत्रातील संधी, गॅप प्रमाणपत्र, गुळाची मागणी, गुळ प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन केले. प्रा. पांडूरंग काळे यांनी गुळ उत्पादन वाढीबाबत व त्याच्या प्रतवारी बाबत मार्गदर्शन केले. उत्तम प्रतीचा गूळ कसा तयार करावा याबाबत डॉ. गेडाम यांनी मार्गदर्शन केले. गुळ निर्यातदार दिपक जोशी व बाळासोहेब पाटील यांनी गुळ उत्पादकांनी कोमिकल विरहीत उत्तम प्रतीचा गुळ उपलब्ध करून दिल्यास कोल्हापूर गुळाची निर्यात करू असे नमुद केले. तसेच विविध देशाचे प्रतवारी मानके काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले. गूळ उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय प्रमाणीकरण करणे बाबत प्रश्न उपस्थित केला, यावर श्री बामने यांनी याबाबत शेतकर्‍यांनी अपेडा कडे संपर्क केल्यास त्याबाबत मदत केली जाईल आसे सांगितले. कार्यशाळेस सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातीन गुळ उत्पादक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यशाळा संपले नंतर गूळ संशोधन केंद्राच्या गुऱ्हाळ गृह भेट देण्यात आली. यावेळी डॉ गोविंद येनके यांची सर्वाना प्रकल्पा विषई सविस्तर माहिती सांगितली. यावेळी डॉ गेडाम यांनी आधुनिक तंत्रज्ञान गूळ उत्पादनात वापरणे गरजेचे असल्याचे नमूद केले. सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पणन मंडळाचे श्री.ओंकार माने यांनी केले व  प्रा. पांडूरंग काळे केविके कन्हेरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

वृतांत - विलासराव कोळेकर (+91 94224 20611)

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डों...