महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त अभिवादन
औरंगाबाद - २/१०/२०१८
आज रोजी अहिंसेचे पुजारी, राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त शहागंज येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या दोन्ही थोर नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली.
या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे संस्थापक-अध्यक्ष रवी वैद्य यांनी मनपा च्या भोंगळ कारभारा विषयी नाराजी व्यक्त केली. या परिसरात घाणीचे साम्राज्य, तुटलेले दिवे, सकाळीच केलेली रंग-रंगोटी, या बद्दल उपस्थितांनीही नाराजी व्यक्त केली.
या कार्यक्रमास संस्थापक-अध्यक्ष रवी वैद्य, मराठवाडा संपर्क प्रमुख राज ठाकरे, मराठवाडा उपाध्यक्ष गोकुळ दाभाडे, महिला मराठवाडा अध्यक्षा सुनीता क्षत्रिय, प्रवक्ता माधुरी चौधरी, जिल्हा अध्यक्ष शिरीष चव्हाण, मनोज गांगवे, उद्योग आघाडीचे धोपटे मामा, सय्यद अफरोज, ऋषी पेटकर, दीपा बोधे, व कार्यकर्ते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment