मुरबाड औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीत सिक्युरिटी गार्डचा संशयास्पद म्रुत्यू ?
*मुरबाड मधील खळबळ जनक घटना *
मुरबाड (मंगल डोंगरे ) मुरबाड
औद्योगिक क्षेत्रालगत असलेल्या कुडवली येथील सुपरगँस नावाच्या कंपनीत आज सिक्युरिटी गार्डचा मृत देह सापडल्याची खळबळ जनक घटना घडली असुन , सदर घटनेचे कारण समजले नसल्याने म्रुत्युचे गुढ कायम आहे. मात्र या घटनेने तालुक्यातील मानिवली (व्या )या
गावावर शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर व्रुत्त असे कि,किसन काशिनाथ भावार्थे (वय २५ वर्षे) असे मृताचे नाव असून तो मुरबाड तालुक्यातील व्यापारी मानिवली (खुर्द) येथील राहणारा आहे.तो मुरबाडच्या कुडवली अतिरिक्त एम. आय. डी. सी मधील सुपर गॅस कंपनीमध्ये सुमारे अडीच वर्षांपासून BIS या कंपनी अंतर्गत सिक्युरिटी गार्ड म्हणून कामाला होता. काल सायंकाळी रात्रपाळीला हजर झालेला किसन आज सकाळी साडेसहा वाजेपर्यत कंपनीमध्ये दिसत नसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली होती.त्यातच आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास किसनचा मोठा भाऊ त्याला जेवणाचा डबा घेऊन कंपनीत आला असता, किसन लाईट बंद करण्यासाठी गेल्याचे त्याच्या सहकाऱ्याने सांगितले. त्यामुळे सदर जेवणाचा डबा किसनला देण्याचे सांगून तो आपल्या कामाला निघून गेला. मात्र तासाभराने त्याने पुन्हा किसनला दोन वेळा कॉल केल्यावर तो अद्याप आला नसल्याचे सिक्युरिटी केबिनमधून त्याला सांगण्यात आल्याने, तो कंपनीकडे धाव घेत आला व किसनची शोधाशोध सुरू झाली.तेव्हा त्याचे बूट कंपनी मधील पाण्याच्या टाकी जवळ आढळून आल्याने ,भावास संशय आला,आणि त्यावरून संशयाचे निरसन करण्यासाठी सुमारे साडेदहा वाजेच्या सुमारास ३ लक्ष लिटर पाणी भरलेली सदरची टाकी पोलिसांच्या मदतीने रिकामी करण्यात आली आणि धक्कादायक प्रकार समोर आला. सदरच्या टाकी मध्ये किसनचा म्रुतदेह त्याच्या सिक्युरिटी गणवेशाच्या साहाय्याने शरीराला मोठा दगड बांधल्याच्या अवस्थेत आढळून आल्याचे सांगण्यात आले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या मुरबाड पोलिसांनी ऍम्ब्युलन्समधून सदरचे शव शासकीय रुग्णालयात पाठवले. किसनच्या पश्चात त्याचे आईवडील, विवाहित मोठा भाऊ व विवाहित बहीण असा परिवार आहे. मानिवली गावातील मनमिळाऊ, स्वच्छ प्रतिमेचा तथा छान स्वाभाविक तरुण म्हणून किसनची ओळख होती. त्यामुळे या घटनेने गावकऱ्यांना मानसिक धक्का बसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
मात्र हा प्रकार नेमका काय आहे? याबाबतचे गुढ कायम असुन, मुरबाड पोलिस पुढील तपास करीत आहेत. तर सदरची सत्यघटना सीसीटीव्ही फुटेजवर अवलंबून असल्याचे बोलले जात आहे. या घटनेची संपूर्ण चौकशी व्हावी, अशी मागणी किसनचे कुटुंबीय करीत आहेत.
No comments:
Post a Comment