कल्याण (संजय कांबळे) : ऐन दिवाळीच्या पुर्वसंध्येला कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांच्या नेतृत्वाखाली तलाठी पथकाने पहाटे अचानक अनाधिकृतपणे गौणखनिजाची वाहतूक करणा-या वाहनावर धाड टाकून त्यावर दंडात्मक कारवाई करित ते वाहन कल्याण उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालय परिसरात पुढील कार्यवाही साठी जमा केले, यामुळे चोरटी वाहतूक करणा-या मालकांचे धाबे दणाणले आहेत,
कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक गैरकारभाराला आळा घातला आहे, नागरिकांच्या तक्रारीनंतर तात्काळ कारवाई करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे लोकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, कामे होणार असेल तर बिलकुल दिंरगाई त्यांच्याजवळ चालत नाही, सर्वसामान्य नागरिकांच्या कामांचा निपटारा वेळीच होत असल्याने महसूल विभागातील इतर कर्मचारी देखील कामचुकारपणा करीत नाहीत, याचाच एक भाग म्हणून तलाठी सजा कल्याण, बारवे, शहाड, मांडा यांचे पथक तयार करण्यात आले असून त्यांनी नुकतिच पहाटे ८:३०वा अनाधिकृत गौणखनिजाची वाहतूक दगड पावडर करणा-या ट्रक क्रंमाक एम एच शुन्य डि के २००४ हा कांबा ते अंबरनाथ असा जाणारा पकडला,यामध्ये साडेपाच ब्रास दगड पावडर होती, याच्या चालकाजवळ वाहन परवाना, व राँयल्टी नसल्याने या विरोधात दंडात्मक कारवाई करून एकूण दंड, एक लाख,१४हजार ६४ रुपये तर वाहन दंड, दोन लाख रपये ठोठावण्यात आला आहे, हा दंड मुळ दंडाच्या पाचपट असून सदरची गाडी कल्याण प्रांतकार्यालय येथे पुढील दंडात्मक कारवाई साठी जमा करण्यात आली आहे, या संदर्भात सर्वांचे जाबजबाब, पंचनामे झाले असून ही कार्यवाही ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, उपविभागीय अधिकारि कल्याण अभिजित धांडे पाटील यांच्या मार्गदर्शन खाली व कल्याण तहसिलदार दिपक आकडे यांच्या नेतृत्वाखाली कल्याण महसूल विभागाच्या कर्मचारी व अधिका-यांनी केली आहे,
ऐन दिवाळीच्या पुर्वसंध्येला कल्याण तहसिल विभागाने गौणखनिजाची अनाधिकृत पणे वाहतूक करणा-या विरोधात धडक कार्यवाही सुरु केल्याने चोरटी वाहतूक करणा-या मालकांचे धाबे दणाणले आहेत, यानंतरही अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचे तहसिलदार दिपक आकडे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment