Tuesday, 10 November 2020

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कल्याण तालुक्यातील 'म्हारळ' ग्रामपंचायतीचा समावेश !

राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानात कल्याण तालुक्यातील 'म्हारळ' ग्रामपंचायतीचा समावेश !


कल्याण (संजय कांबळे) : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण विभागाने 'माझी वसुंधरा' हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. यामध्ये कल्याण तालुक्यातील म्हारळ ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला असून इतर १२ग्रामपंचायती आहेत. यासंदर्भात नुकतिच ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांनी जिल्हय़ातील गटविकास अधिकारी, ग्रामसेवक व सरपंच यांची मिंटिग आयोजित केली. 
पृथ्वी, वायू, जल, आकाश, अग्नी, या निसर्गातील पंचतत्वाचे गुणवत्ता पुर्ण संरक्षण व संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण विभागाने 'माझी वसुंधरा' हे महत्वाकांक्षी अभियान हाती घेतले आहे. ठाणे जिल्हा परिषदेच्या कार्यक्षेत्रातील १३ ग्रामपंचायती अंतर्गत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या संदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांनी पाच पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी व ग्रामसेवक, सरपंच यांची बैठक बोलावली होती. यामध्ये कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्वेता पालवे, अंबरनाथ च्या शीतल कदम, शहापूर अशोक भवारी, भिवंडी डॉ प्रदिप घोरपडे, तसेच सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
मानवनिर्मित प्रदूषणामुळे, जल वायू परिवर्तनामुळे जैवविविधतेने, पर्यावरणावर, मानवीआरोग्यावर, विपरित परिणाम होताना दिसून येत आहे. निसर्गाच्या असमतोलामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती व विविध प्रकारचे साथीचे आजार उद्भवू लागले आहेत. साठी मानवाचे निसर्गाशी असलेले नाते घट्ट नाते पुन्हा एकदा वेगवेगळ्या परिभाषेत करण्यातची आवश्यकता निर्माण झाली आहे. याच पाश्र्वभूमीवर माझी वसुंधरा अभियान २आॅक्टोबर २०२० ते ३१मार्च २०२१या कालावधीत हे राबविण्यात येणार आहे. यासाठी गाव कृती आराखडे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. तसेच हे अभियान पंचतत्वाशी संबधित घटकांवर केले जाणार आहे. यामध्ये पृथ्वी या घटकाशी वनीकरण व संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी जमीनीचे धृर्वीकरण, प्रदूषण नियंत्रण, हवेची गुणवत्ता, नदी संवर्धन जलस्रोतांचे जतन, उर्जा बचत, पारंपारिक उर्जेचा वापर, यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यातचे निश्चित केले आहे. याकरिता २०२१ च्या जनगणनेनुसार १०हजारापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये कल्याण तालुक्यातील म्हारळ, भिवंडी तालुक्यातील खोणी, कोन, कारिवली, काटई, राहनाळ, पिंपळघर शेलार, शहापूर तालुक्यात वाशिंद, मोखावणे, आसनगाव, अंबरनाथ तालुक्यातील. वांगणी या ग्रामपंचायतीचा सहभाग आहे. प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी हे नोडल आॅफिससर तर विस्तार अधिकारी हे सहाय्यक नोडल आॅफिससर म्हणून काम करणार आहेत. 

No comments:

Post a Comment

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न !

दैनिक युवक आधारच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न ! पनवेल, (केतन भोज) : दैनिक युवक आधारच्या पहिल्या वर्षाच्य...