अदानी एअरपोर्टवर शिवसैनिकांन कडून बोर्डची तोडफोड करत " शिवसेना झिंदाबाद " च्या दिल्या घोषणा.!
भिवंडी, दिं.2 अरुण पाटील -कोपर :
सकाळ पासूनच नागरिकांना अदानी एअरपोर्ट असं नाव दिसताच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याकडे याची. आज सकाळपासूनच नागरिकांना अदानी एअरपोर्ट असं नाव दिसताच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याकडे याची तक्रार केली. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी काल रात्री लावण्यात आलेले 'अदानी एअर पोर्ट' नाव तोडून टाकत " शिवसेना झिंदाबाद " च्या झोरदार घोषणा देण्यात आल्या. या वेळी मोठया संखेने शिव सैनिक व भारतीय कामगार सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव अदानी एअरपोर्ट असं लिहून विमानतळाच्या मुख्य दर्शनी भागात काल रात्री लावण्यात आलं. त्यानंतर आज सकाळपासूनच नागरिकांना अदानी एअरपोर्ट असं नाव दिसताच स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्याकडे याची तक्रार केली. त्यानंतर संतप्त शिवसैनिकांनी काल रात्री लावण्यात आलेले 'अदानी एअर पोर्ट' नाव तोडून टाकले आहे.
आज शिवसैनिक आणि भारतीय कामगार सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्हीआयपी गेट नंबर 8 आणि विलेपार्ले हायवेवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोरील बोर्ड तोडून टाकला आहे.मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आले आहे. विमानतळाचे संचालन अदानी ग्रुपच्या हाती गेल्यानंतर अदानी एअरपोर्ट असे बोर्ड विमानतळ परिसरात लावण्यात आले. मात्र तिथे अदानी विमानतळ असे लावलेले बोर्ड अजिबात सहन केले जाणार नसल्याचं शिवसैनिकांचं म्हणणं आहे. जीवीके प्रमाणे मॅनेज्ड बाय अडानी एयरपोर्ट असा बोर्ड ठेवण्याची सूचना शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अन्यथा जिथे फलक दिसेल, तिथे तोडफोड करण्याचा सेना नेत्यांनी इशारा दिला आहे.

No comments:
Post a Comment