भिवंडीतील कोपर गावात " अखंड हरिनाम सप्ताह " चे व "ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण" कार्तिक सोहळ्याचे आयोजन, ग्रामस्थ्यांमध्ये भरभरून उत्साह !.
भिवंडी, दिं,१, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी तालुक्यातील कोपर गावात "जय गणेश हनुमान मंदिर" येथे श्री.जगतगुरू तुकाराम महाराज वारकरी संप्रदाय मंडळच्या वतीने "अखंड हरिनाम सप्ताह"चे व "ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कार्तिक सोहळा"चे आयोजन करण्यात आले आहे, तरी या मंगल प्रसंगी गावातील व येणाऱ्या भाविकांनी मांसाहार, धूम्रपान,मद्यपान करू नये असे कमिटी तर्फे विनंती करण्यात आली आहे.
या कालावधीत पहाटे ४ ते ६ वा. काकड आरती, सकाळी ७ ते ८महापूजा अभिषेक ८ ते १२ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी १२ ते १भोजन, सायंकाळी ४ ते ६ प्रवचन, ६ ते ७ हरिपाठ, ७ ते ९ हरिकीर्तन व ९ ते १०अन्न दणाचा कार्यक्रम रोज होणार आहे.
सदर सोहळा हा कार्तिक शुक्ल नवमी, बुधवार दिं. २/११/२०२२ ते कार्तिक शुक्लपक्ष द्वादशी शनिवार दिं. ५/११/२०२२पर्यंत होणार असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकर येणार असल्याने या परिसरातील सर्व भाविकांनी व भक्तांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा व शोभा वाढवावी अशी विनंती कृपाभिलाषी-आयोजक ह.भ.प. श्री. सोपान पाटील, ह.भ.प.श्री. भगवान भंडारी, ह.भ.प.श्री. रमाकांत पाटील, ह.भ.प.श्री. गौतम पाटील यांनी केली आहे.
कार्तिक शुक्ल नवमी, बुधवार दिं. २/११/२०२२ रोजी पहिला अभिषेक कोपर गावातील जनतेने निवडून दिलेले सरपंच सौ.श्री. रमेश सीताराम पाटील, सौ. श्री. राजेश रमाकांत पाटील, व सौ. श्री. मनिष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.याच दिवशी संध्याकाळी कोपरगावचे हभप दत्तात्रेय महादेव घरत यांचे प्रवचन, हरिपाठ मंडळ केवणी -दिवे गाव यांच्या तर्फे हरिपाठ होणार आहे. तर रात्री वै. जनकूबाई आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र श्री.विकास आत्माराम पाटील यांच्या सौजन्याने हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.
कार्तिक शुक्ल दशमी,गुरुवार दिं,३/११/२०२२ रोजी दुसरा अभिषेक समाज सेवक सौ. श्री हेमंत सूर्यकांत घरत, सौ. श्री. लक्ष्मण दूंदा पाटील यांच्या हस्ते होणार आहे.संध्याकाळी कोपरगावचे ह.भ.प.जगन्नाथ पाटील महाराज यांचे प्रवचन, व ज्ञानेश्वर मंडळ -काल्हेर गाव यांचे हरिपाठ, व हरी कीर्तन, होणार आहे, तर रात्री कोपर गावचे समाज सेवक श्री. हेमंत घरत यांच्या तर्फे त्यांच्या आजी वै. हभप सखुबाई घरत व आई वै. हभप यशोदा घरत यांच्या स्मरणार्थ अन्नदान होणार आहे.
कार्तिक शुक्ल एकादशी शनिवार, दिं, ४/११/२०२२ तिसरा अभिषेक सौ.श्री.श्रीरंग शांताराम पाटील,मा.शिवसेना शाखा प्रमुख सौ. श्री. केशव शिवराम पाटील, यांच्या हस्ते होणार आहे.
कार्तिक शुक्ल द्वादशी शनिवार, दिं,५/११/२०२० रोजी चतुर्थ अभिषेक कोपर गावचे मा. सरपंच श्री. जगदीश लालचंद पाटील व मा. उप सरपंच सौ. वासंती जगदीश पाटील तसेच श्री. दत्तात्रेय काशिनाथ पाटील व सौ. वैजयंतीबाई दत्तात्रेय पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तसेच वै. लालचंद कथोड पाटील यांच्या स्मरणार्थ श्री. जगदीश लालचंद पाटील यांच्या परिवारातर्फे महाप्रसाद व कार्यक्रमासाठी आलेल्या महाराजांना वस्रदान देण्यात येणार आहे.
या मंडळाचे सभासद हभप गोरखनाथ ना पाटील, हभप जगन्नाथ ह पाटील, हभप सूर्यकांत चं घरत, श्री. अनंता का भामरे, श्री. रंजन बाबू पाटील, हभप दत्तात्रेय म घरत, हभप अविनाश शं म्हात्रे, श्री. देवराम वि पाटील, श्री. गुरुनाथ ह भोईर व दत्तात्रेय का पाटील यांनी हरी चरणी सेवा दिली.
No comments:
Post a Comment