Wednesday, 12 July 2023

घाटकोपर अनधिकृत फेरीवाला संदर्भात मनसेची पोलिसांसोबत बैठक !

घाटकोपर अनधिकृत फेरीवाला संदर्भात मनसेची पोलिसांसोबत बैठक !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

           घाटकोपर पश्चिम मध्ये अनधिकृत फेरीवाले वाढल्याने प्रवाशी तसेच सामान्य नागरिकांना चालणे खूप कठीण होत आहे. या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेकदा आवाज उचलत आंदोलन केले आहे. नुकतेच घाटकोपर पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून दाखल झालेले बळवंत देशमुख यांची आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी सदिच्छा भेट घेत त्यांचे स्वागत केले.. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे, मनविसे उपाध्यक्ष प्रमोद मांढरे, राम रिंगे , माजी शाखाध्यक्ष शरद भावे आदी उपस्थित होते. यावेळी बळवंत देशमुख यांनी सकारात्मक भूमिका घेऊन कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
         पश्चिम विभागात एम जी रोड, स्टेशन परिसर तसेच खोत लेन मार्गावर फेरीवाले वाढल्याने वाहनांना मोठा अडथळा ठरत आहे. काही फेरीवाले असभ्य वर्टवनुक करत असल्याचे अनेकदा समोर येत असताना काही महिन्या पूर्वी मनसेने फेरीवाला स्टाईल ने दणका देखील दिला होता. आज सविस्तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांची मनसे कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी चर्चा करून बेशिस्त वागणाऱ्या फेरीवाल्यां विरोधात कारवाई करा अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !!

डोंबिवली एमआयडीसी निवासीत आंब्याचे मोठे झाड शाळेच्या भिंतीवर कोसळले; जीवितहानी टळली !! *डोंबिवली, दि. 4 ऑगस्ट 2026, (राजू नलावडे...