शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड क्र.१२४ मधील ग्राहकाना न्याय मिळवून दिल्याबद्दल मानले आभार !!
*** ग्राहक संरक्षण कक्षतर्फे एल.जी.वितरकाला दणका
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
शिवसेना नेते,सचिव शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार श्री.अनिल भाऊ देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कक्षाचे सरचिटणीस विजय मालणकर, लोकसभा समन्वयक अजय शिरोडकर यांच्या सुचनेनुसार ग्राहकाला न्याय मिळवून देण्यात यश आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, कु. श्रुती बाबुराव मुळीक राहणार विक्रोळी पार्क साईट यांनी दिनांक २७/१०/२०२३ रोजी आर सिटी मॉल येथे ३४,४५० रु किमतीचे फ्रिज विकत घेतले होते. फ्रिजचे गॅस लिकेज झाले होते. पाच महिन्यांपासून तक्रार करून सुद्धा फ्रिज बदली करून देत नव्हते.त्यामुळे त्रस्त झालेल्या मुळीक यांनी घाटकोपर पश्चिम ग्राहक संरक्षण कक्षचे, १२४ चे वार्ड संघटक यशवंत वि.खोपकर यांच्याशी संपर्क करून न्याय मिळावा म्हणून विनंती केली. मुळीक यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन घाटकोपर पश्चिम ग्राहक संरक्षण कक्षेचे पदाधिकारी यांनी स्वतः आर सिटी मॉल येथे जाऊन ग्राहकाची तक्रार निवारण करून कु. श्रुती बाबुराव मुळीक यांना एलजी कंपनीचे दुसरे नवीन फ्रिज मिळून दिले. नवीन फ्रिज मिळवून दिल्याबद्दल मुळीक यांनी ग्रा. सं. कक्ष चे आभार पत्र देऊन आभार मानले. शाखा क्रमांक १२४ शाखेमध्ये आभार पत्र घेतेवेळी ग्रा.स.क. पदाधिकारी अमित भाटकर, श्रीकांत चिचपुरे, राजेन्द्र पेडणेकर, यशवंत वि.खोपकर , विकास डुकरे, गुरुदत्त पेडणेकर, विनायक जाधव इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment