भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादीतर्फे बाळ्या मामा यांचे नाव घोषित होताच एमएमआरडीए कडून कारवाईचा बडगा !!
*** विद्यमान खासदार कपिल पाटील यांना ही निवडणूक जाणार जड-- सुज्ञ मतदार
भिवंडी, प्रतिनिधी, दि. ०६ :
महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये भिवंडीच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने तगडा उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहीर करताच एमएमआरडीए कडून बाळ्या मामा ऊर्फ सुरेश म्हात्रे यांच्या गोदाम संकुलावर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र नियम नुसार काहीच करू "न" शकल्याने त्यांना खाली हात परतावे लागले आहे. या मागे नक्की कोण आहे व "रडीचा" डाव कोण खेळत आहे हे सर्व मतदारांना माहीत असल्याने ही निवडणूक विद्यमान खासदार तथा "पंचायत राज" राज्य मंत्री कपिल पाटील यांना ही निवडणूक नक्कीच जड जाणार असल्याचे सुज्ञ मतदारांनी भाकीत केले आहे.
सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांना मानणारा तरुण वर्ग या मतदारसंघात मोठा आहे. तसेच बाळ्या मामा यांचा अडचणीत असणाऱ्या सर्वांना मदतीचा हात नेहमी पुढे करतात त्यामूळे त्यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणावर आहे.
कपिल पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून सुरेश म्हात्रे यांची ओळखले असून काही वर्षांपूर्वी बाळ्या मामा हे शिवसेनेत (बाळासाहेब ठाकरे शिवसेना) असताना ते आक्रमक शिव सैनिक म्हणून ओळख जात होते.
बाळ्या मामा यांना पाच वर्षांपुर्वी उमेदवारी मिळू न शकल्यामुळे त्यांची पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढण्याची संधी हुकली होती. परंतु यंदा त्यांना ही संधी मिळाल्याने कपील पाटील विरुद्ध सुरेश म्हात्रे असा सामना रंगणार असून ही निवडणूक कपिल पाटील यांना नक्कीच जड जाणार आहे. त्यामुळे आता त्यात कोण बाजी मारणार, हे पाहणे औत्सुक्त्याचे ठरणार आहे.
भिवंडी लोकसभेच्या जागेसाठी महायुतीतर्फे भाजपचे केंद्रीय " पंचायत राज" राज्यमंत्री कपिल पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी, महाविकास आघाडीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. भिवंडी लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघ येतात. यामध्ये भिवंडी ग्रामीण, भिवंडी पश्चिम, भिवंडी पूर्व, कल्याण पश्चिम, शहापूर, मुरबाड या मतदार संघाचा समावेश आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा आगरी, कुणबी, आदिवासी, मुस्लिम अशा मतदारांचा भारणा असलेल्या भिवंडी लोकसभा मतदार संघात २००९ मध्ये काँग्रेसचा खासदार सुरेश टावरे हे निवडून आले होते. तर, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे बोलले जात आहे. असे असले तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाचे सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने भिवंडीच्या जागेवर दावा केला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्षांच्या दाव्यामुळे भिवंडीच्या जागेचा तिढा कायम होता. अखेर महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाला सोडण्यात आली असून या जागेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहिर केली. जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. परंतु ही जागा राष्ट्रवादीला मिळाल्याने ते काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.
कोण आहेत सुरेश म्हात्रे ? यांचा अल्प परिचय.
------------------------------------------------------------
मनसे, शिवसेना, राष्ट्रवादी, शिंदेची शिवसेना आणि आता पुन्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असा सुरेश म्हात्रे यांचा आतापर्यंतचा राजकीय प्रवास राहिला आहे. ते ठाणे जिल्हा परिषदेत बांधकाम सभापती होते. २०१४ मध्ये त्यांनी मनसेच्या तिकिटावर भिवंडी लोकसभेची निवडणूक लढवली असून यामध्ये त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची म्हणजेच ९३ हजार मते मिळविली होती. राज्यमंत्री कपिल पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ते ओळखले जातात.
पाच वर्षांपुर्वीच २०१९ मध्ये त्यांनी पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढविण्याटा चंग बांधला होता. त्यावेळी ते शिवसेना पक्षात होते. परंतु शिवसेना-भाजप युती असल्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली होती. त्यांनी काँग्रेस पक्षातून उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते. परंतु काँग्रेसच्या काही नेत्यांनी विरोध केला होता. यामुळे त्यांना उमेदवारी मिळू शकली नव्हती. या निवडणुकीत हुकलेली संधी पुन्हा गमावायची नाही असे ठरवून त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आणि या पक्षातून पाटील यांच्याविरोधात निवडणुक लढविण्याची त्यांनी संधी अखेर मिळविली. मात्र उमेदवारी जाहीर होताच सुरेश म्हात्रे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. येवई येथील आर के लॉजी पार्क येथील गोदाम बांधकामांवर एमएमआरडीए कारवाई करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान यावर आता सुरेश म्हात्रे यांनी प्रतिक्रिया देताना भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत. त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे, व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतले आहेत, असे स्पष्टीकरण यावर म्हात्रे यांनी दिलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यातील अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्टचाराची जननी कपिल पाटील हेच आहेत. एमएमआरडीए राजकीय दबावातून कारवाई करत आहे. 'जिनके घर शिसेके होते है, ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते.' असं म्हणत सुरेश म्हात्रे यांनी भाजपाचे उमेदवार कपिल पाटील यांना इशारा दिला आहे
No comments:
Post a Comment