Friday, 31 May 2024

संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला (प), मुंबई या रात्र शाळेचा निकाल सलग पाच वर्षे 100% शंभर टक्के !!!

मुंबई प्रतिनिधी, तारीख- 1, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ, भिवंडी संचलित संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल, कुर्ला पश्चिम,  या रात्र शाळेचा सलग पाच वर्षे  एस.एस.सी. बोर्ड परीक्षेचा 100% निकाल लागल्याने, संस्थेमध्ये, रात्र शाळेचे विद्यार्थी, शिक्षक वर्ग आणि नेहमीच मदतीचा हात देणारी मासूम संस्था असे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या  एस. एस. सी. बोर्डाचा परीक्षेचा निकाल सोमवारी दि.२७ मे २०२४ रोजी दु.१ वा. सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईल या माध्यमातून जाहीर झाला.  संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूलमध्ये पाच वर्षे यशस्वी परंपरा कायम राखत येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारत शाळेचा शंभर टक्के निकाल दिला आहे . व्हावले आरती प्रकाश  - 65.00 टक्के मिळवून प्रथम तर जाधव अमृता बाळू 60. 00 टक्के गुण मिळवुन द्वितिय, कु. जोगदंकर जयश्री गणेश हिने  55.80 टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनी समाधान कारक गुण संपादित करत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे.
दिवसा शाळेप्रमाणेच रात्र शाळेमध्ये शिक्षण दिले जाते. दिवसाच्या शाळेत जो अभ्यासक्रम 5 तासात इयत्ता 10 वी मध्ये शिकवला जातो तोच अभ्यासक्रम 3:30 तासात रात्र शाळेत शिकवला जातो. अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी साडेतीन तासाची वेळ कमी पडते परिणामी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी जादा तासिका घ्याव्या लागतात. त्यामुळे रात्र शाळेचाही कार्यकाळ हा पाच  तासाच्या ही जास्त होतो म्हणून सरकारने विशेष बाब म्हणून रात्र शाळांना पूर्णवेळचा दर्जा दिला पाहिजे, असे मत रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री विश्वनाथ राऊत सर यांनी मांडले. 

 ते पुढे असे म्हणाले, रात्र शाळेत शिक्षण घेणारा नियमित विद्यार्थी तर असतोच पण त्याचबरोबर अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करणारे, कामातील प्रमोशन मिळावे, चांगलं काम धंदा मिळावा, रिक्षा टॅक्सीचे बॅच- बिल्ले काढता यावेत अशा  विविध कारणांसाठी शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी रात्र शाळेत प्रवेश घेत असतात. 

रात्र शाळेत शिक्षण घेणारा विद्यार्थी हा गरीब विद्यार्थी आहे. कुर्ला पश्चिम मुंबई येथे पसरलेल्या दाटीवाटीच्या झोपडपट्टीत राहणारे विद्यार्थी दिवसा काबाड- कष्ट करतात, 12 तासांची नोकरी करून धावपळ करत, आपले राहिलेले शिक्षण पूर्ण करणारा विद्यार्थी, रात्र शाळेत शिक्षण घेत असतो. अशा रात्र शाळेत शासनाने लक्ष द्यावे. काम धंदा करून उपाशीपोटी रात्रशाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्याला अल्पोपहार मिळावा तसेच शिक्षणासाठी लागणारे साहित्य मोफत उपलब्ध करून द्यावेत असे मुख्याध्यापक श्री राऊत सर यांनी सांगितले. 
 रात्र शाळेचे मुख्याध्यापक श्री राऊत सर हे सन 2018 सालात   मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्यापासून रात्र  शाळेचा निकाल सतत उंचावलेला आहे. मार्च 2020 पासून ते मार्च 2024 अशा सलग पाच वर्षात  इयत्ता दहावीच्या वर्गाचा, बोर्ड परीक्षेचा निकाल 100% लागला आहे. 

100% निकाल लागण्यासाठी रात्र शाळेतील परीक्षेत बसलेले विद्यार्थी, मुख्याध्यापक श्री राऊत सर, शिक्षक वर्ग श्री समाधान सुभाष खैरनार सर, श्री विरकर, श्री पद्माकर फर्डे सर, यांनी खूप कष्ट घेतले. त्यामुळे सर्वांचीच अभिनंदन सर्वांकडून करण्यात येत आहेत.
त्याचबरोबर पाच वर्षे  10 वी बोर्डाचा निकाल 100% मिळवण्यास सतत ऊर्जा मिळत गेली. ती आमच्या संस्थेचे अध्यक्ष मा. श्री विजय जाधव सर कार्याध्यक्ष मा. श्री बी .डी. काळे सर तसेच सर्व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून. 

मागील वर्षी रात्र शाळेत समायोजनाने दिलेले शिक्षक शासनाने तडकाफडकी काढून टाकले. त्यामुळे रात्र शाळेत इंग्रजी, गणित, विज्ञान सारखे महत्त्वाचे विषय शिकवणारे शिक्षकच राहिले नाहीत. शिक्षण विभागाकडे सतत शिक्षकांची मागणी करूनही संपूर्ण वर्षभर  रात्र शाळेत इंग्रजी, गणित, विज्ञान सारखे महत्त्वाचे विषय शिकवण्यासाठी शिक्षकच मिळाले नाहीत. 
रात्र शाळेत शिकणारा विद्यार्थी गरीब आहे. तो काबाड कष्ट करून शिक्षण घेतो, म्हणून त्याच्या शिक्षणासाठी शासनाने महत्त्वाचे शिक्षक रात्र शाळेला द्यायला पाहिजे होते परंतु आजपर्यंत तीन वर्ष महत्त्वाच्या विषय शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत यासाठी दाद कोणाकडे मागावी? असा प्रश्न मुख्याध्यापकांना पडला आहे.
मासूम संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय निकिता केतकर मॅडम व त्यांची पूर्ण टीम,   एस.एस.सी डिपार्टमेंट सांभाळणारे श्री शशिकांत गवत सर, श्री पाटील सर तसेच प्रोजेक्ट मॅनेजर कुमारी धनश्री धनावडे मॅडम या सर्वांनी  नेहमीच वेळप्रसंगी मदतीचा हात पुढे करून एक प्रकारे संजीवनी देण्याचे कार्य मासूम संस्था गेल्या 10 वर्षांपासून रात्र शाळेत करत आहे. मासूम परिवाराचे आभार रात्र शाळेकडून व संस्थेकडून मानले आहेत.

आज संत ज्ञानेश्वर नाईट हायस्कूल कुर्ला ही रात्र शाळा परिसरात नावारूपाला आली आहे. म्हणून पालकांना  मुख्याध्यापकांच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे की, आपल्या पाल्याचे प्रवेश, इयत्ता 8वी, 9वी, 10वी साठी आजच निश्चित करा.

पाण्याचा स्त्रोत,पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या आधारे पाणीटंचाईच्या कालावधीतच जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांची चौकशी करा - सुहास खंडागळे

पाण्याचा स्त्रोत,पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या आधारे पाणीटंचाईच्या कालावधीतच जिल्ह्यातील जलजीवन मिशन योजनांची चौकशी करा - सुहास खंडागळे

** योजना होऊनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ठेकेदारांची बिले थांबवा, गाव विकास समितीची रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

कोकण, (शांताराम गुडेकर) : 
रत्नागिरी जिल्ह्यात जल जीवन मिशन योजनेच्या उद्देशाची पूर्तता झाली आहे का? यासाठी पाणीटंचाईच्या कालावधीतच पाण्याचा मुबलक स्त्रोत दर दिवशी नियमित होणारा पाणीपुरवठा आणि योजनेचा दर्जा या तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने पाणीटंचाईच्या कालावधीतच सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे केले आहे. 

जल जीवन मिशन योजनेच्या नावाखाली करोड रुपये खर्च होत असताना अनेक भागांमध्ये आजही तक्रारी आहेत. पाण्याचे बारमाही स्त्रोत सक्षम करण्याकडे दुर्लक्ष झालेले आहे. अनेक ठिकाणी तांत्रिक चुका अधिकारी आणि ठेकेदारांनी केल्या असून दर दिवशी प्रतिमाणसी 55 लिटर याप्रमाणे पाणीपुरवठा अद्यापही सुरू झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील पाणीटंचाई कायमची निकालात निघण्याच्या दृष्टीकोणातून या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने झाली आहे, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. 

रत्नागिरी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये गाव विकास समितीचे सुहास खंडागळे यांनी म्हटले आहे की, करोड रुपये खर्च करूनही रत्नागिरी जिल्ह्यातील पाणीटंचाई अनेक ठिकाणी संपणार नसेल, अनेक ठिकाणी नव्या योजना पूर्णत्वास गेल्या नसतील तर जलजीवन मिशन या महत्वकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीबाबत  खालील तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी पाणी टंचाई असताना पावसाळा सुरू होण्यापूर्वी होणे गरजेचे आहे __

१) पाण्याचा मुबलक स्त्रोत, २) दर दिवशी होणारा पाणीपुरवठा आणि ३) पाणी योजनेच्या कामाचा दर्जा या तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने आपल्या मार्फत स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करून जिल्ह्यातील जल जीवन मिशन योजनांच्या कामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्हा संघटनेमार्फत सुहास खंडागळे यांनी केली आहे. 

केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणारी जलजीवन मिशन योजना ही ग्रामीण भागातील पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी अशी योजना आहे.या योजनेत पाण्याचा बारमाही स्त्रोत,पाण्याच्या सोर्सचे सक्षमीकरण, दर दिवशी प्रति माणसी ५५ लिटर पाणी प्रत्येक कुटुंबाला घरापर्यंत देणे इत्यादी गोष्टी समाविष्ट आहेत.मात्र या बाबींची पूर्तता योजनेच्या अंमलबजावणीत झाली आहे का? हे पावसाळ्याआधी पाण्याची टंचाई असताना तपासणे गरजेचे आहे. याच कालावधीत कोणत्या योजना यशस्वी झाल्या आहेत याची वस्तुस्थिती समजेल. नवी योजना असतानाही ज्या गावांमध्ये पाणीटंचाई असेल तेथील जलजीवन मिशन योजनांची बिल थांबवण्यात यावीत. याबाबत आपण योग्य ती दखल घेऊन जिल्ह्यातील पाणी समस्या कायमची निकालात काढण्याच्या दृष्टीने जलजीवन मिशन योजनांच्या कामाची वरील तीन मुद्द्यांच्या आधारे चौकशी करावी असे सुहास खंडागळे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या ई-मेल मध्ये म्हटले आहे.

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
          लांजा तालुका मधील गवाणे गावचे सुपुत्र मुंबई उच्च न्यायालयाचे कर्मचारी तसेच गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे यांना गुरुवार  दि. ३० मे २०२४ रोजी जनादेश टिव्ही न्युजच्या १६ व्या वर्धापन दिनाच्या निमत्ताने राम गणेश गडकरी रंगायतन, ठाणे येथे प्रमुख पाहुणे श्री. मनोज शिवाजी सानप (ठाणे जिल्हा - माहिती अधिकारी) यांच्या शुभ हस्ते "कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार -२०२४ "या  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर दा.कृ. सोमण (पंचांगकर्ता /खागोल अभ्यासक ), समाजरत्न डॉ. शेठ नानाजीभाई खिमजिभाई ठक्कर (ठाणावाला), कैलास पवार (ठाणे जिल्हा - शल्य चिकित्सक), अभिनेता अनिकेत केळकर, संपादक - मंगेश प्रभूळकर, कार्य. संपादक -अश्विनी भालेराव, ऍड. सौ. कदम, कु. डॉ.ढवळ, निर्भय पत्रकार संघटना पदाधिकारी, सदस्य, सभासद उपस्थित होते.

         जनादेश टिव्ही न्युजच्या १६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार विविध क्षेत्रातील लौकिक प्राप्त व्यक्ती, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राध्यापक, प्राचार्य, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, शाळा, महाविद्यालय, सेवाभावी संस्था, निर्मल व हरित गावे, ग्रामपंचायत, सामाजिक सांस्कृतिक मंडळे, संस्था / संघटना, पतसंस्था, बँका व सहकार क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्थांचा खास पुरस्कार देऊन शानदार गौरव करण्यात आला. शिक्षण,समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, राजकारण, वैद्यकीय, वकिली, अभियांत्रिकी इत्यादी विविध क्षेत्रात कार्यक्षेत कर्तृत्ववान गुणीजनांचा या राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सन्मानचिन्ह, खास मानपत्र, आणि तुळशीरोप असे होते. नामवंत पाहुण्यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्हा दिव्यांग समन्वय समितीला आर्थिक मदत नुकतीच करण्यात आली होती. याशिवाय गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे आणि परिवार व पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक यांच्यातर्फे कोकणात दरवर्षी विविध उपक्रम राबविण्यात येतात. शिक्षण, समाजसेवा, ग्रामसेवा, तंटामुक्त, कृषीसेवा, शेती विकास, कामगार, उद्योग, साहित्य, कला, क्रीडा, ग्रंथपालन, पर्यावरण आदी क्षेत्रात गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे. फळाची अपेक्षा न ठेवता सतत कार्य करत रहाणे हे गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष समाजसेवक श्री.चंद्रकांत शिवराम करंबळे मूळ उद्देश आहे. गुरुमाऊली चंद्रभागा फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत करंबळे कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार -२०२४ ने सन्मानित झाल्याबद्दल लांजा तालुक्यातील अनेक मान्यवर, सामाजिक संस्था, समाज मंडळ, कुणबी समाज शाखा, पत्रकार, वृत्तपत्र लेखक, करंबळे परिवार नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

समाज विघातक मनुस्मृती शैक्षणिक विषय होवूच शकत नाही !!

समाज विघातक मनुस्मृती शैक्षणिक विषय होवूच शकत नाही !!

**(देशव्यापी संविधान जन जागृती व साक्षरता अभियान आयोजक डॉ. माकणीकर यांचे मत)

मुंबई दि (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित संविधानाचे राज्य असून, बाबासाहेबांनी अख्खी च्या अख्खी मनुस्मृती जाळून टाकली आहे, त्यामुळे समाज विघातक मनुस्मृती शैक्षणिक विषय होवूच शकत नाही. शिकवायचेच असेल तर भारतीय संविधान शिकवा असे मत देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियानचे राष्ट्रीय आयोजक पँथर डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केले.

महाड या ऐतिहासिक ठिकाणी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती दहन केली होती त्याच धर्तीवर वर चांगल्या इतिहासाची पुनरावृत्ती म्हणून जाहीर निषेधार्थ 
शरद पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार श्री. जितेन्द्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन कार्यक्रम आखून शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकारच्या शैक्षिणक धोरणाचा कडाडून विरोध केला. यावेळी अनावधानाने गालबोट लागले, जितेंद्र आव्हाड हे बाबासाहेबांना बाप मानतात आणि कोणता बाप मुलाला माफ करणार नाही? अस होणार नाही, त्यामुळे त्या प्रकरणाचे राजकरण कुणीही करू नये अशी विनंती धम्मसेवक डॉ. माकणीकर यांनी केली आहे.

समाजभूषण डॉ माकणीकर म्हणाले की, आव्हाडांनी मनुस्मृती जाळली याचा भाजपा व त्यांच्या समर्थक पक्षांना राग नाही आला पण बाबासाहेबांचा फोटो असलेले पोस्टर जाळले याचा राग आला अस भासवून ते आव्हाड विरोधी वातावरण निर्माण करत आहेत, आंबेडकरी समाजाने आपापल्या गावात मनुस्मृतीचे दहन करून या सरकारचा निषेध व्यक्त करून आव्हाडांच्या प्रमाणिक आंदोलनाला कृतीतून समर्थन नोंदवावे तसेच मनुस्मृती शिकवणीचा निर्णय सरकारला मागे घेण्यास भाग पाडावे.

रिपब्लीकन पँथर नेते दिवंगत ईश्वर कांबळे यांच्या इच्छेनुसार देशव्यापी संविधान जनजागृती व साक्षरता अभियान अंतर्गत आम्ही मागील 25 वर्षापासून भारतीय संविधान शालेय माध्यमिक अभ्यासक्रमात शिकवनी साठी स्वतंत्र विषय म्हणून समाविष्ट करण्यात यावे यासाठी अभियान राबवत असून त्यासंदर्भातील पत्रव्यवहार शासन व प्रशसानात केला आहे, या मनुवादी सरकारच्या बुडात दम असेल आणि खरच काही शिकवायचे असेल तर डॉ. आंबेडकर लिखित "भारतीय संविधान" शिकवावे - असे आंबेडकरी कट्टर समर्थक डॉ माकणीकर म्हणाले.

मोदी सरकार मुळातच संविधान विरोधी असून बहुजनांच्या हक्काचे संरक्षण करणाऱ्या संविधानाची आधीच त्यांनी पायमल्ली केली आहे, त्यामुळे त्यांनी डावपेच करून विविध राज्यात सरकारे बनवली आहेत ती असंवैधानिक सरकारे आहेत असे मला वाटते,  त्यामुळे मोदीच्या नेतृत्वात असलेल्या सरकार कडून भारतीय संविधानाच्या समर्थनात कोणती अपेक्षा होणे अशक्यप्राय आहे. अशी निराशा ही विद्रोही पत्रकार डॉ. राजन माकणीकर यांनी व्यक्त केली.

Thursday, 30 May 2024

आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीचा दहावीचा निकाल १०० टक्के !!

आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवलीचा दहावीचा निकाल १०० टक्के !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
              रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर  तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो आंगवली गावातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित 'जनता विद्यालय आंगवली'चा यंदाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० % लागला असून या विद्यालयातील एकूण ४८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तमरीत्या पास होत शाळेला शंभर टक्के निकाल देत संस्थेचा तसेच या शाळेचा नाव उज्वल केले आहे.

             सन २०२३-२०२४ घेण्यात आलेल्या यंदाच्या एस. एस. सी. बोर्डाचा परीक्षेचा निकाल सोमवारी दि.२७ मे २०२४ रोजी दु.१ वा.सायबर कॅफे अथवा इंटरनेट मोबाईलवर माध्यमातून जाहीर झाला. या परीक्षेत जनता विद्यालय आंगवलीची यशस्वी परंपरा कायम राखत येथील विद्यार्थ्यांनी बाजी मारत शाळेचा शंभर टक्के निकाल दिला आहे .कु.भावेश महेंद्र पवार यांनी -८७. २० टक्के मिळवून प्रथम तर कु.भावेश प्रविण सुर्वे ८४. ८० टक्के गुण मिळवुन द्वितिय, कु.यश बबन जंगम यांनी ७६ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनी समाधान कारक गुण संपादित करत शाळेची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे. यामध्ये विशेष श्रेणी -०५, प्रथम श्रेणी -२०, द्वितिय श्रेणी -१९ तर पास श्रेणी -०३ चा समावेश आहे. तर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आंगवली विकास मंडळ मुंबई संचालित जनता विद्यालय आंगवली अध्यक्ष श्री.संतोष मोरेश्वर दळवी, आजी -माजी पदाधिकारी, विद्यमान उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार, सल्लागार, सर्वं संचालक आणि प्रशाळेचे मुख्याध्यपक श्री. अजितकुमार रामचंद्र चव्हाण तसेच सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचारी वर्ग, संस्थेचे संचालक, सदस्य तसेच गावातील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, आंगवली -सोनार वाडी ग्रामस्थ, मारळ, बामणोली, निवदे, बोंड्ये, कासार कोळवण, वांझोळे, निवे, हातीव ग्रामस्थ, नागरिक यांनी अभिनंदन करून या विद्यार्थ्यांस पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Wednesday, 29 May 2024

आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी तळागातील ढोर (कक्कया) बांधवांचे आझाद मैदान येथे १८ जूनला राज्यव्यापी आंदोलन !!

आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी तळागातील ढोर (कक्कया) बांधवांचे आझाद मैदान येथे १८ जूनला राज्यव्यापी आंदोलन !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
            उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो...!वीरशैव कक्कया ढोर समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्याच्या हक्काचे आर्थिक विकास महामंडळ मिळवून देण्यासाठी तळागातील ढोर (कक्कया) बांधवाना आता एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे. आपला समाज आजवर अनेक पक्षाचा दावणीला बांधला गेला. त्यांनी आपला स्वार्थ साधून घेतला.पण समाज मात्र मागे राहिला. या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी, येणाऱ्या भावी पिढीचे भविष्य घडविण्यासाठी, आपापसातील मतभेद बाजूला सारून पावसाळी अधिवेशनात सरकारला घेराव घालण्यासाठी सज्ज होण्याची वेळ आली आहे.
           येत्या १८ जून २०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता संत कक्कया स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील सर्व कक्कया (ढोर) बांधव, भगिनी आणि समाज मंडळ तसेच त्यांचे कार्यकर्ते यांनी मोठया संख्येने आझाद मैदान येथे उपस्थित राहायचे आहे.
          ढोर (कक्कया) समाजांच्या न्याय हक्कासाठी आजपर्यंत कुठल्याही सरकारकडून ढोर (कक्कया) समाजाला पुरेपूर न्याय मिळाला नाही आणि ढोर समाजाने सुद्धा कुठलेही आंदोलन करून आपल्या न्याय हक्कासाठी मागणी केली नाही.
          पण आजची परिस्थिती आणि उद्याची चिंता व्यक्त करता (ढोर कक्कया) समाजाला अधिक अडचणीचा सामना करावा लागणार आहे. कारण उद्योग व्यवसायातून आणि शिक्षणातून आर्थिक बळ नसल्यामुळे हा समाज उद्योग व्यवसायातून वंचित होत चालला आहे. सरकारकडून दिवसेंदिवस जातीचे आरक्षण धोक्यात येत आहे.आपल्या समाज बांधवांना रिझर्वेशनचा धोका होणार आहे, त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या आणि व्यावसायिक दृष्ट्या समाज मोठ्या संख्येने मागे पडताना दिसणार आहे.
           गेली पन्नास वर्षापासून असणारे लिड कॉम महामंडळ हे संत रोहिदास महामंडळ झाले आहे. पण त्याच्यावर कोणत्याही नेतेमंडळींनी ब्र शब्द केला नाही. या पन्नास वर्षात या महामंडळातून किती वाटा ढोर (कक्कया) समाजाला मिळाला याचे निदान केल्यावर असे कळाले की फक्त दोन टक्के सुद्धा नाही. याचा अर्थ काय?
          आम्ही अतिशय श्रीमंत आहोत... की ,आम्ही अतिशय  शूद्र आहोत. आम्हाला शासकीय आमच्या हक्काचे अनुदान मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. या सर्व गोष्टींना वाचा फोडण्यासाठी, आज आम्हाला आमचे स्वतंत्र संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ पाहिजे आहे आणि ते आपण मिळवल्या शिवाय शांत बसायचे नाही. एक दिवस समाजासाठी, समाजातील तरुण पिढीच्या भविष्यासाठी १८ जून २०२४ सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्रातील तमाम ढोर (कक्कया श) बांधवानी एकत्र येऊन आझाद मैदानात धरणे आंदोलन करुन संत कक्कया समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास सरकारला भाग पाडू.उठ कक्कया जागा हो, महामंडळाचा धागा हो...! आता नाही तर कधीच नाही...! आम्ही सहभागी होत आहोत तुम्ही पण व्हा असे आवाहन श्री.दत्ता श्रावण खंदारे (धारावी) यांनी केले आहे.

Monday, 27 May 2024

"मी कोकणी उद्योजक पुरस्कार" मुंबईतील शानदार सोहळ्यात संदेश जिमन यांना प्रदान !!

"मी कोकणी उद्योजक पुरस्कार" मुंबईतील शानदार सोहळ्यात संदेश जिमन यांना प्रदान !!

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

               शिवभक्त कोकण व निलक्रियेटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यावसायिक सन्मान सोहळा 'मी कोकणी उद्योजक' आज मुंबईतील चर्नी रोड येथील साहित्य संघ नाट्यगृहात विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न  झाला. या सोहळ्यात कोकणचे सुपुत्र, सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते, पत्रकार, रेल्वे मॅन श्री. संदेश जिमन यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी त्यानी आजपर्यंत रेल्वेच्या सुविधा संगमेश्वर तालुकावासीयाना मिळण्यासाठी केलेल्या संघर्षाचा आढावा घेतला. हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून तालुक्यातील प्रत्येकाचा आहे.

तालुक्यातुन रेल्वेने प्रवास करणा-या सर्व प्रवासी वर्गाला मी हा संपर्पित करतो असे संदेश जिमन यांनी नम्रपणे नमुद केले. रेल्वेच्या सोयी सुविधांसाठी २४ तास निस्वार्थीपणे संघर्ष करणा-या संदेश जिमन याना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे रत्नागिरी जिल्हा, संगमेश्वर तालुका मधील अनेक मान्यवर सह सर्व स्तरातुन अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Saturday, 25 May 2024

लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेतर्फे अभ्यास दौरा संपन्न !!

लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेतर्फे अभ्यास दौरा संपन्न !!

** रत्नागिरी जिल्ह्यातील विविध समाजसेवी संस्थांना दिल्या गेल्या भेटी
 

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             चिपळूण तालुक्यामधील नवीनच स्थापन करण्यात आलेल्या लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील विविध समाजसेवी संस्थांना भेटी देण्याचे आयोजन केले होते. रत्‍नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे. रत्‍नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

              या अभ्यास दौऱ्यात संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार, उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते, विश्वस्त सत्यवान विचारे, सौ. सुविधा कासार, नेत्रा टोपरे, प्रमोद आंब्रे आणि सदस्य संतोष शिंदे यांनी वेगवेगळ्या संस्थांची कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.      

  
           या दौऱ्या अंतर्गत प्रथम देवरुख येथील सांदिपनी गुरुकुल कुडवली या संस्थेला भेट दिली. त्या ठिकाणी संस्थेचे अधिक्षक गुरव यांनी उपस्थितांचा पुष्पगुच्छ देवून सन्मान केला. त्यानंतर संस्थेबद्दल माहिती देताना या संस्थेमध्ये १८ वर्षापर्यंतच्या लहान मुलांचे संगोपन करून त्यांना शालेय शिक्षण सुद्धा देण्याचे काम ही संस्था करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर देवरुख येथील मातृमंदीर या संस्थेला भेट देऊन तेथील संस्थेची माहिती घेतली. त्या ठिकाणी संस्थेच्या अधीक्षिका कुमारी अश्विनी कांबळे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली.      


               
          त्यानंतर लांजा या ठिकाणी कै. श्रीमती जानकीबाई (आक्का) तेंडुलकर महिलाश्रम या संस्थेला भेट दिली. त्या ठिकाणी संस्थेच्या अधिक्षीका कुमारी ज्योती यादव यांनी माहिती देताना सांगितले की या संस्थेमध्ये १८ वर्षाखालील अनाथ मुलींचे संगोपन करून त्यांचे शिक्षण सुद्धा केले जाते. त्याचबरोबर येथील महिला आश्रमामध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची सुद्धा राहण्याची व्यवस्था केली जाते. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेस महात्मा गांधी व्यसनमुक्ती २०१६ चा पुरस्कार मिळालेल्या लांजा येथील "भारतीय कष्टकरी रयत" (भाकर) या संस्थेला भेट दिली. या संस्थेमधील कार्याची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी सांगितले की, या संस्थेमध्ये वृद्ध महिला व वृद्ध पुरुष यांच्या राहण्याची व जेवणाची सोय पूर्णपणे मोफत केली जाते. तसेच या ठिकाणी भेटी देणाऱ्या व्यक्तीला ९९ रुपयांत पोटभर जेवण आणि राहण्याची व्यवस्था केलेली असून कोकणातील पर्यटन स्थळ म्हणून सुद्धा ही संस्था नावारूपाला आलेली आहे. यापुढे अशीच समाज उपयोगी कामे या संस्थेकडून चालू ठेवली जातील असेही त्यांनी सांगितले.‌ रात्री विश्राम गृहात संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संस्था कशाप्रकारे कामकाज करतात याची माहिती या अभ्यास दौऱ्याच्या आयोजनातून  मिळाली असे संस्थेचे अध्यक्ष बाळकृष्ण कासार यांनी सांगितले. तर सर्व विश्वस्त आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल उपाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी आभार मानले.

Friday, 24 May 2024

नालेसफाई अन निष्काळजीपणा शिवसेनेचा मनपा प्रशासनाला इशारा..!

नालेसफाई अन निष्काळजीपणा शिवसेनेचा मनपा प्रशासनाला इशारा..!

**मान्सुनपुर्व मनपाची फेकाफेकी कोणतीही उपाययोजना नाही.

वसई, प्रतिनिधी : वसई विरार महापालिका प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे नालासोपारा शहरातील प्रमुख नाले या वर्षी साफ न झाल्याने शहर तुंबण्याची शक्यता आहे; तर या नालेसफाईत हातसफाई करणाऱ्या प्रभाग समितीच्या संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना महिला शहरप्रमुख रूचिता नाईक यांनी केली आहे. 

नालासोपारा शहरातील प्रमुख नाले अद्यापही साफ केलेले नाहीत. बहुतांश नाल्यांतील गाळ तसाच असल्याचे दिसत आहे एकीकडे पालिका आयुक्त शंभर टक्के नालेसफाईचा आग्रह धरत असताना नालासोपारातील नालेसफाईत दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रूचिता नाईक यांनी केली आहे. साफ न केलेल्या नाल्यांमध्ये समेळगाव, साई नगर, छेडा नगर, हनुमान नगर, नाल्यांचा समावेश असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

नाल्यांची सफाई न झाल्याने आगामी काळात अनेक  घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती आहे. तातडीने नालेसफाई करण्याची मागणी रूचिता नाईक यांनी केली आहे.

शिवसेना वार्ड क्रमांक १२४ तर्फे वीर सोळंकीची आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केल्याबद्दल ग्राहक संरक्षणच्यावतीने सत्कार !!

शिवसेना वार्ड क्रमांक १२४ तर्फे वीर सोळंकीची आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केल्याबद्दल ग्राहक संरक्षणच्यावतीने सत्कार !!

**श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन वीर सोळंकी यांचा सत्कार

मुंबई (शांताराम गुडेकर) :

       मुंबईतील इंटरनॅशनल इडो-यु कराटे डो फेडरेशन या अकादमीतील विर गिरीश सोलंकीने यूएई दुबई येथे आयोजित द इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप दुबई बुडोकर कप- २०२४ या स्पर्धेत रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकण्याची चमकदार कामगिरी केली. दुबईच्या संयुक्त अरब अमिराती येथील केंट कॉलेज स्पोर्ट हॉल येथे या स्पर्धा पार पडल्या. जगातील १६ देशातील भारत युएई. कझाकस्तान, चीन, जपान, फिलिपिन्स, ओमान, कुवेत, सौदी, अरेबिया, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया, भुतान, यू के आणि ऑस्ट्रेलिया अशा देशातून एकूण -८२८ खेळाडूंनी सहभाग घेतला या आंतरराष्ट्रीय कराटे बुडोकन स्पर्धेत वीर सोलंकीने यांनी कामगिरी केली.व सुवर्ण पदक त्याने पटकावले. त्याबद्दल शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड क्रमांक-१२४ तसेच मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष  श्री.यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या वतीने कु.वीर सोळंकी यांचे पुष्पगुच्छ देऊन व शॉल शिफल देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचा वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२३- राजेंद्र पेडणेकर, मा.उपशाखप्रमुख महादेव करळकर,उपशाखाप्रमुख विजय शिरोडकर, विनायक जाधव, विलास जाधव, शाहीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

नालेसफाईचा मुंबई महानगरपालिकेचा दावा धादांत खोटा, नालेसफाई नव्हे तर निव्वळ 'हाथ की सफाई' – प्रा. वर्षा गायकवाड

नालेसफाईचा मुंबई महानगरपालिकेचा दावा धादांत खोटा, नालेसफाई नव्हे तर निव्वळ 'हाथ की सफाई' – प्रा. वर्षा गायकवाड

नालेसफाई घोटाळ्याची चौकशी त्वरित करून सर्व दोषींवर कडक कारवाई करा.

नालेसफाईच्या कामातील गैरव्यवहारात भाजपाचेही हात बरबटलेले, भाजपा जबाबदारी झटकू शकत नाही

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             मुंबईत मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी सत्ताधारी पक्ष आणि सरकार नियुक्त मुंबई महानगरपालिका प्रशासकानी करदात्यांचे २५० कोटींहून अधिक रुपये खर्चूनही कामाचे वास्तव भयावहच आहे. अनेक भागात अजून ५० टक्केही काम झालेले नाही. महापालिका प्रशासकाने नालेसफाईच्या कामाची अधिकृत आकडेवारी जनतेसमोर विस्तृतपणे मांडावी व नालेसफाई घोटाळ्याची चौकशी त्वरित करून सर्व दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा.वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
             नालेसफाईवर बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, ७५ टक्के नालेसफाईचे काम झाल्याचा मुंबई महापालिकेचा दावा धादांत खोटा आहे. अनेक भागांत नालेसफाईची कामे झालीच नाहीत हे वास्तव आहे. अनेक ठिकाणी गाळ, कचरा, राडारोडा अजून तिथेच पडून आहे. प्रत्यक्षात ५० टक्के पेक्षाही कमी काम झाले आहे, ते ही समाधानकारक नाही. सत्ताधारी पक्ष आणि पालिका प्रशासनाच्या भ्रष्ट व ढिसाळ कारभारामुळे यंदाही मुसळधार पाऊस झाल्यास मुंबई तुंबण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही नालेसफाई नव्हे तर सत्ताधारी, महापालिकेचे अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये 'सेटिंग' झालेली निव्वळ 'हाथ की सफाई' आहे.नालेसफाईबद्दल लोकांमध्ये असलेला तीव्र आक्रोश लक्षात घेता भाजपा या पापामधून स्वतःचे हात झटकण्याचे प्रयत्न करत आहे पण या महाघोटाळ्यात ते देखील तितकेच वाटेकरी आहेत हे जनता जाणून आहे.तेव्हा भाजपाला यातून पळ काढता येणार नाही, मुंबईकरांना हिशोब तर द्यावाच लागेल, असेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ कासारकोळवणच्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम थाटामाटात संपन्न !!

श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ कासारकोळवणच्या २७ व्या  वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम थाटामाटात संपन्न !!

मुंबई  ( शांताराम गुडेकर ) :
          रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मधील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या  कासार कोळवण गावातील सरकार मान्य श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळाचा २७ वा वर्धापनदिन सोहळा थाटामाटात संपन्न झाला. श्री शिवशक्ती उत्कर्ष मंडळ हे सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक, कला, क्रीडा, धार्मिक अशा विविध क्षेत्रात कार्यरत मंडळाच्या वतीने गेली २७ वर्ष अनेक प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले आहे  व या मंडळास ४ राज्यस्तरीय व १ नॅशनल पुरस्कार प्राप्त झालेआहेत. 
          एक उत्तम सामाजिक संघटना म्हणून नावलौकिक आहे.मंडळाच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने दिनांक १० मे २०२४ ते १२ मे २०२४ असा तीन  दिवस साजरा करण्यात आला. यनिमित्ताने विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, बॉक्स क्रिकेट टूरनामेन्ट , विध्यार्थी गुणगौरव, जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ, महिलांसाठी हळदीकुंकू, धार्मिक विधी काकड आरती, होम हवन, साई बाबांच्या पादुकांची भव्य मिरवणूक, साई भंडारा महाप्रसाद, रेकार्ड डान्स व सांस्कृतिक कार्यक्रम लोकांच्या मनोरंजनासाठी माभले- जाधव वाडी (संगमेश्वर) यांचे नमन असे  विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रेरणास्थान उद्योगपती विश्वजित चिंदरकर साहेब व सामाजिक कार्यकर्ते युयूस्तू आर्ते, उप सरपंच प्रकाश तोरस्कर, मंडळ अध्यक्ष रवींद्र सि. करंबळे, सचिव शैलेश दळवी, खजिनदार राजेंद्र शं. करंबळे, सरपंच, पोलीस पाटील व विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती लाभली. व विद्यमान आमदार शेखर निकम साहेब यांनी ही शुभेच्छा दिल्या.या संपूर्ण कार्यक्रमाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला असे मंडळचे सल्लागार, सक्रिय कार्यकर्ते व माजी खजिनदार पत्रकार मोहन कदम यांनी बोलताना सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजी -माजी मंडळ पदाधिकारी,विद्यमान मंडळ पदाधिकारी, सदस्य व सभासद, महिला मंडळ पदाधिकारी, सदस्य, युवा मंडळ पदाधिकारी, सदस्य व कासार कोळवण समस्त ग्रामस्थ मंडळी व माहेरवाशिनी ह्याच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा आनंदाने नेत्रदीपक पार पाडला.

Monday, 20 May 2024

एम. बी. लॉ. असोसिएट तर्फे 'ॲड. विशाल राजे - निंबाळकर आणि ॲड. कामेश हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस "कमलधाम वृद्धाश्रमात साजरा**

एम. बी. लॉ. असोसिएट तर्फे 'ॲड. विशाल राजे - निंबाळकर आणि ॲड. कामेश हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस "कमलधाम वृद्धाश्रमात साजरा** 

कल्याण, प्रतिनिधी :
      ॲड. विशाल राजे - निंबाळकर आणि ॲड. कामेश हरिश्चंद्र पाटील यांचा वाढदिवस एम. बी. लॉ. असोसिएटने अंबरनाथ येथील "कमलधाम वृद्धाश्रम "येथे साजरा केला.
          ॲड.विशाल आणि ॲड. कामेश यांनी एम. बी. लॉ. असोसिएटसोबत वाढदिवस साजरा करताना आजी - आजोबांना गरजेच्या उपयोगी भेटवस्तू दिल्या. तसेच वृद्धाश्रमाच्यां परिसरात वृक्षारोपण केले.
             यावेळी श्री. मच्छिंद्र पावशे सर वसार,श्री. सूर्यकांतशेठ पाटील व जितेंद्र पाटील अंतार्ली , आकाश मुकादम आणि एम. बी. लॉ. असोसिएटचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
            यावेळी कमलधाम वृध्दाश्रमाच्या संचालक /अध्यक्ष सौ. पुर्णिमा कबरे म्हणाल्या आपण वाढदिवस वृद्धाश्रमात येऊन साजरा करतात. त्यामुळे आमच्या आजी - आजोबांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. आजी - आजोबां आनंदी तर आम्हीपण आनंदी होतो. एम. बी. लॉ. असोसिएटने राबविलेला उपक्रम समाजासाठी आदर्शवत आहे.

Sunday, 19 May 2024

येणा-या काळात संगमेश्वर येथे ९ गाड्यांच्या थांब्याबद्दल‌कोकण रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास येत्या १५ ऑगस्टला करणार उपोषण !!

येणा-या काळात संगमेश्वर येथे ९ गाड्यांच्या थांब्याबद्दल‌कोकण रेल्वे प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न आल्यास येत्या १५ ऑगस्टला करणार उपोषण  !!

** निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख संदेश जिमन यांचा इशारा 

मुंबई (शांताराम गुडेकर) :

            छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि मार्लेश्वर; कर्णेश्वर; सप्तेश्वर या सारख्या जागृत देवस्थानांची भूमी असणा-या; पर्यटनदृष्ट्या अतिशय सक्षम आणि निसर्गसंपंन्न संगमेश्वर तालुक्यात दळणवळणाचे लांब पल्ल्याचे साधन म्हणून प्रवासी वर्गाची रेल्वेला एस.टी इतकीच पसंती मिळते. मात्र आवश्यक सोयी सुविधांचा अभाव असल्याने तालुक्याचा पर्यटन विकास रखडल्याचे चित्र आहे. रेल्वेची उदासिनता; महामार्गाचे कुर्मगतीने सुरु असणारे काम; पर्यटन किंवा धार्मिक स्थळाच्या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे तालुक्याच्या विकासात नेहमी अडथळे येतात.
             कोंकण रेल्वेच्या माध्यमातुन पर्यटकांची सख्या तालुक्यात वाढू शकते आणि त्यातुनच तालुक्याचा पर्यटन विकास साध्य होइल. मनी ऑर्डरवर जगणा-या स्थानिक जनतेला स्वत:च्या उत्पन्नाचे साधन तयार करता येइल" असे मत रेल्वेच्या समस्यांवर काम करणा-या संदेश जिमन यानी व्यक्त केले.:संदेश जिमन यानी याबद्दल विस्तृत प्रतिक्रिया दिली. संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात नेत्रावती एक्सप्रेस ला थांबा मिळाला परंतु त्यासाठी जवळपास चार वर्ष संघर्ष करावा लागला. नेत्रावतीला थांबा मिळाल्याचा परिणाम म्हणुन संगमेश्वर रेल्वे स्थानकाच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली. पाच कोटीचा टप्पा या वर्षी आमच्या स्थानकाने ओलांडला. त्यानंतर आरक्षण खिडकी ची मागणी पुर्ण झाली. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. पुढे जाऊन आम्ही आणखी नऊ गाड्याना थांबा मिळावा म्हणुन निवेदन दिले आहे. परंतु त्याच दरम्यान निवडणूक आचारसहिंता सुरु झाली. येणा-या काळात या पैकी काही गाड्याना थांबे मंजुर होतील अशी अपेक्षा आहे.
            ४ जुनला निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर नवीन सरकार स्थापन होइल.या सरकारमधील जे कुणी रेल्वे मंत्री असतील ते आमच्या मागण्याना न्याय देतील अशी आशा व्यक्त करुया. परंतु येत्या 30 जुनपर्यंत कोकण रेल्वे प्रशासनाकडून आमच्या मागणीस सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास आम्ही येत्या १५ ऑगस्ट पासून लोकशाहीच्या मार्गाने उपोषण करण्याचा पवित्रा घेऊ असा इशाराही पत्रकार संदेश जिमन यांनी दिला.पर्यटनातुन तालुक्याचा विकास साधायचा असल्यास स्थानिक नेत्यानीही आमच्या मागण्यांचा जोरदार पाठपुरावा करावा.हा विकास साधण्यासाठी रेल्वे सारखा उत्तम पर्याय उपलब्ध असताना राजकीय इच्छा कुठेतरी कमी पडतेय असे चित्र सध्या या तालुक्यात दिसत आहे अशी खंतही जिमन यांनी बोलुन दाखवली.

आंगवली -रेवाळे वाडी भावकिचा भैरी भवानीचा गोंधळ थाटामाटात संपन्न !!

आंगवली -रेवाळे वाडी भावकिचा भैरी भवानीचा गोंधळ थाटामाटात संपन्न !!

कोकण, (शांताराम गुडेकर) :

                 रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील देवरुख शहरापासून जवळच असलेल्या श्री क्षेत्र मार्लेश्वर परिसरातील मु. पो. आंगवली गावातील रेवाळे वाडी  येथे रेवाळे भावकीचा भैरी भवानी देवीचा गोंधळ नुकताच थाटामाटात संपन्न झाला. वाडीतील रेवाळे, धनावडे, गुडेकर, आग्रे, चव्हाण आणि त्यांचे नातेवाईक या गोंधळाला मोठया संख्येने उपस्थित होते.

              भैरी भवानी हे कोकणवासीयांचे एक कुलदैवत आहे. यातील भैरी (भैरव) हा शंकराचा अवतार असून त्याच्या भैरव किंवा काळभैरवनाथ या नावाचा भैरी, काळभैरी, बहिरीनाथ हे अपभ्रंश आहेत. तरी कुलदेव्हाऱ्यात भैरव व खंडोबाच्या वेगवेगळ्या मूर्ती पुजल्या जातात. भैरी भवानी (काल भैरी) देवीचे जोगेश्वरी हे एक नाव आहे. भैरी भवानी म्हणजेच काल भैरव देवाची संगिनी जोगेश्वरी आहे. कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, रत्‍नागिरी जिल्ह्यातील सर्वच समाजात भैरी देव हा कुलस्वामी आहे. मराठा, कोळी, आगरी, गवळी, कुणबी, न्हावी, भंडारी (राजपूत), खारवी, भोई, कराडी, सुतार, कुंभार समाजांत भैरी (भैरव) देवाला विशेष स्थान आहे. भैरी देवाची काळभैरव, काळभैरवनाथ, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी अशी नावे असलेली अनेक मंदिरे ठाणे, रायगड व रत्‍नागिरी जिल्ह्यांत आहेत. भैरी देव हा कार्ल्याच्या एकवीरा देवीचा भाऊ मानला जातो. त्याचे मंदिर लोणावळा जवळच्या कार्ला लेणी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या देवघर गावात आहे. आणि जोगेश्वरी देवीचे स्थान कार्ल्याच्या डोंगरावरील एकवीरेचा मंदिरात एकवीरेच्या शेजारी आहे. भैरी देव हा रक्षणकर्ता म्हणून ओळखला जातो. कोकणपट्टीतील सर्वच डोंगरी व सागरी किल्ल्यांवर भैरी देवाची काळभैरव, भैरवनाथ, भैरोबा, भैरी, बहिरी या नावांची स्थाने आहेत. आंगवली रेवाळे वाडी येथे पार पडलेल्या या गोंधळाचे यजमानपण यावर्षी श्री.काशिराम केशव रेवाळे, सौ. सुलोचना का. रेवाळे यांनी पार पाडले. जोगवासह सर्वं महत्वाच्या राजकोजी पूजा विधी श्री.काशिराम रेवाळे, सौ.सुलोचना  काशिराम रेवाळे आणि आत्माराम रामचंद्र रेवाळे, मधुकर रेवाळे, विष्णू रेवाळे, दौलत रेवाळे, शिवाजी रेवाळे, सुधाकर रेवाळे, दत्ताराम रेवाळे, शांताराम सि.रेवाळे, बाळू रेवाळे, संतोष भिवा रेवाळे,अनंत लु.रेवाळे, प्रकाश रेवाळे,सचिन सावजी रेवाळे, विश्राम रेवाळे, प्रशांत रेवाळे, वकील रेवाळे, दिलीप रेवाळे, महेश रेवाळे, संदीप तु. रेवाळे यांच्या उपस्थितीत पार पडल्या. यावेळी रुपेश रेवाळे, अंकुश रेवाळे,क्षचेतन रेवाळे, हेमंत द.रेवाळे, काशिराम गोविंद रेवाळे, जयू रेवाळे, रामकृष्ण शंकर रेवाळे, विश्राम रेवाळे, वामन रेवाळे, शांताराम रेवाळे, कल्पेश रेवाळे,संतोष सि.रेवाळे,मंगेश वामन  रेवाळे,योगेश रेवाळे, आत्माराम ग.रेवाळे, किशोर का. रेवाळे, विकास रेवाळे, निकील आत्माराम रेवाळे, जितू आ. रेवाळे,अशोक रेवाळे, गणेश (गण्या) दि. रेवाळे, संकेत संतोष रेवाळे, राजेंद्र शिवाजी रेवाळे, सुरेश रेवाळे, शांताराम बा. रेवाळे, वैभव रेवाळे, सुहास सुरेश रेवाळे, महेंद्र वि. रेवाळे, संदेश मधुकर रेवाळे, विनय विष्णू रेवाळे, विवेक रेवाळे आणि रेवाळे वाडी महिला मंडळ, युवा मंडळ, सर्वं तरुण -तरुणी, माहेरवाशिनी, सासरवासनी, जावई मंडळी आदी भावकीसह दत्ताराम ल.गुडेकर,तुकाराम ल. गुडेकर, शांताराम ल.गुडेकर, बाळकृष्ण धनावडे, शशिकांत आग्रे, संतोष चव्हाण, अजित आग्रे, संदीप चव्हाण, संदीप रेवाळे उपस्थितीत होते. सर्वं पूजा विधी, जागर झाल्यावर सर्वांनी जेवण करून गोंधळी यांनी सादर केलेल्या कथेचा आनंद घेत कार्यक्रमाची सांगता केली.

Wednesday, 15 May 2024

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे.. त्यासाठी निवडणुकी च्या दिवशी बुधवार सरकारला जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यामार्फत काही कर्मचारी नियमावे लागतात. त्यात प्रीसेडिंग अधिकारी १ मतदान अधिकारी १/२/३ शिपाई, पोलीस, एनसीसी, हेडर तसेच स्वच्छता कर्मचारी तसेच मतदारांची लहान मुलं सांभाळण्यासाठी बालसंगोपन केंद्रासाठी आशा वर्कर  अंगणवाडी सेविका नियुक्त केलेले होते त्यात त्यांना खालील प्रमाणे मानधन एक दोन तीन दिवसाकरता देण्यात आले होते त्यात प्रीसायडिंग अधिकारी साडेतीनशे रुपये, मतदान अधिकारी १/२/३ यांना दर दिनी अडीचशे रुपये ,बूथवरील शिपाई २०० रुपये ,पोलीस २५० रुपये अशा तऱ्हेने दर दिनी मानधन देण्यात आले .

पण बालसंगोपन केंद्रासाठी कार्यरत आशा , ग्रामपंचायत शिपाई स्वच्छता कर्मचारी यांना १२/१२ तास राबवून फक्त १५० रुपये मानधन देण्यात आल्याने त्यांचेत ड्युटी संपल्यानंतर असंतोष निर्माण झालेला आहे .दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यात शिपाई अंगणवाडी कर्मचारी यांना प्रत्येकी ५५० तर, आशा वर्कर वा स्वयंसेवक यांना साडेतीनशे रुपये मानधन देण्यात आल्याने जळगाव जिल्ह्यातच एवढे कमी मानधन का देण्यात आले? याबाबत आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये विचारणा होत आहे.. व संतापही व्यक्त केला जात आहे केंद्र सरकारच्या निवडणूक आयुक्त मार्फत ही निवडणूक होत असता जळगाव जिल्ह्यात वेगळे दर तर बुलढाणा जिल्ह्यात वेगळे द्वारका याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी खुलासा करणे आवश्यक आहे या कर्मचाऱ्यांना अक्षरशः राबवून घेतले .काही ठिकाणी तर मुख्य सेविका यांनी अंगणवाडी मदतनिसांना पण हजर ठेवा असे आदेश दिले ने मदतनीस हा सुद्धा हजर राहिल्यात .त्यामुळे दीडशे रुपये मधून निम्मे पैसे 75 रुपये 75 रुपये प्रमाणे मदतनिसांना सुद्धा द्यावे लागले . बीएलओ कर्मचाऱ्यांमध्ये सुद्धा असंतोष आहे आशा तऱ्हेने केंद्र सरकारच्या व्यवहार खाजगी  व्यवस्थापनापेक्षा ही कर्मचाऱ्यांचे शोषण करण्या साठी झालेला आहे अशा तऱ्हेने बेकादेशीर व्यवहार निवडणूक केंद्रावर झालेला आहे याबाबत चौकशी करून बुलढाणा जिल्ह्याप्रमाणे मतदान केंद्रावर आलेल्या नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडी सेविकांना साडेपाचशे रुपये तर मदतनिसांना साडेतीनशे रुपये अदा करावेत अशी मागणी जळगाव जिल्हा आयटक तर्फे संघटनेचे जिल्हाध्यक्ष कॉ अमृत महाजन यांनी केली आहे. किमान वेतन अपेक्षाही निम्म्या वेतनावर राबवून घेतलेल्या या कर्मचाऱ्यांना किमान वेतनइतके मानधन  न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा का महाजन यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिलेला आहे..

Sunday, 12 May 2024

भिवंडी लोकसभा मतदारसंघात माझा विजय निश्चित - भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा)

काल महाविकास आघाडीच्या मतदारसंघात झालेल्या शहापूर, भिवंडी, कल्याण येथील प्रचार सभा व त्या सभांना नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद व स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा तसेच देशातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांची उपस्थिती यामुळे माझा विजय निश्चित झालेला आहे असे प्रतिपादन सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी केले.

कालच्या कल्याण येथील सभेत ॲड असिम सरोदे यांनी वस्तुस्थिती समजावून सांगितली व महाराष्ट्रात एएवढ




Saturday, 11 May 2024

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी 
चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टी प्रणित सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळली तर नाहीच, उलट न



शेतकऱ्यांचे शोषण केले. पेन्शन, नोकरीची शाश्वती धोक्यात आणली आहे. बेरोजगारी, महागाई, जातीयवाद, वाढवून "डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर" लिखित मूळ संविधान धोक्यात आणले आहे, म्हणुन महिलांना १ लाख रु देणार, ३०:लाख रिक्त सरकारी नोकऱ्या..शेतमजूर असंघटित यांना किमान ४०० रु मजुरी देणार ! जुनी जी एस टी करांचा फेरविचार पेन्शन देणार ,, अशी गॅरंटी मिळावी व.. मोदी सरकारचे लोकविरोधी खाजगीकरण नितीविरोधी निर्णय पलटवण्यासाठी.. अग्नीवीर योजना बंद करून सैन्यात पूर्वीप्रमाणे जवानांचे हक्क मिलणे यासाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडी असून राष्ट्रव्यापी इंडिया आघाडीच पर्याय उभा केला आहे. त्या इंडिया आघाडीचा समविचारी पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. तरी त्या आघाडीचे जळगाव जिल्हातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे रावेर मतदार संघातून श्रीराम दयाराम पाटील.. उद्धव ठाकरे नेतृत्वाखालील शिवसेनेचे उमेदवार श्री करण पवार यांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणावे असे आवाहन जळगाव जिल्हा आयटकचे कामगार नेते कॉ. अमृत महाजन, जे एन बाविस्कर तसेच भाकपचे ज्ञानेश्वर पाटील, लक्ष्मण शिंदे, वासुदेव कोळी सरफराज शाह, निर्मला शिंदे, देविदास बोंदर्डे, शशिकला निंबाळकर, काळू कोळी, भास्कर सपकाळे, जिजाबाई राणे, अरुण काळे, जेडी ठाकरे, प्रा कटेकर, रमेश पाटील, नामदेव कोळी, रंजना माळी, सटरसिंग बारेला, शिवाजी बंडू, अरमान तडवी, प्रेमसिंग बारेला, गुरुदास मोरे, सुखदेव भील, छोटू पाटील, वाल्मीक मैराळे, प्रहलाद एरंडे, गोरख वानखेडे, रतीलाल भील आदींनी केले आहे

Thursday, 9 May 2024

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त आज मोटार सायकल रॅली व भव्य शोभायात्रा !!

*संध्या 5 वा.  सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, सिविल लाईन चौक येथुन मोटार सायकल रॅलीची  होणार सुरुवात*

अकोला - दरवर्षीप्रमाणे ब्राह्म समाजाचे आराध्य दैवत भगवान परशुराम यांच्या जन्मोत्सवाच्या पुर्वसंध्येला दि.9 मे 2024 रोजी संध्या.5 वा. सिव्हील लाईन जि.प. विश्रामगृह, येथुन मोटारसायकल रॅलीची सुरुवात होवून सिव्हील लाईन्स चौक,  बडा पोस्ट आफीस, ध्रिगाचौक, ओपन थियेटर, टिळक पुतळा, जिप रोड जिल्हाधिकारी कार्यालय सरकारी बगीचा खोलेश्वर येथे येवून शोभायात्रेमध्ये सहभागी होणार आहे. व 5.30 वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. संध्या. 5.30 वाजता परशुराम चौक खोलेश्वर येथे संयोजक अशोक शर्मा सह सकल ब्राह्मण समाजाचे अध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये पुजा व आरती होऊन शोभायात्रा प्रारंभ होईल. शोभायात्रा मार्गावर स्व. शिवपाल शर्मा परिवाराच्या वतीने व शालीनी टॉकीज येथे नगरसेवक अजय शर्मा परिवाराच्या वतीने शोभायात्रेमध्ये सहभागी सर्वांना शितपेयाचे वितरण करण्यात येणार आहे. सदर शोभायात्रा ही परशुराम चौक खोलेश्वर येथून निघून चित्रा चौक, सिटी कोतवाली, कपडा बाजार, सराफा चौक, गांधी चौक, वसंत टॉकीज येथून येवून भगवान परशुराम चौक खोलेश्वर येथे शोभायात्रेचे समापन होणार आहे. नंतर पारितोषीक समारंभ तर रात्री 8 वाजता महाप्रसाद मारवाडी ब्राह्मण संस्कृत विद्यालय निमवाडी अकोला येथे राहील. दि.10 मे 2024 रोजी सकाळी 11 वा भगवान परशुराम जन्म व महाआरती भगवान परशुराम मन्दिर, खोलेश्वर येथे तरी कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संयोजक अशोक अंबादास शर्मा (लोणाग्रावाले) विजय तिवारी, उदय महा, गिरीश गोखले, मोहन पांडे, कृष्णा गोवर्धन शर्मा, रामप्रकाश मिश्रा, निलेश देव, प. हितेश मेहता, राकेश शर्मा, देवेंद्र तिवारी, राजेंद्र तिवारी, आनंद शास्त्री, कुशल सेनाड, प. अमोल चिंचाळे, अक्षय गंगाखेडकर, विवेक शुक्ला, राजेश व्याम्बरे, गोपाल राजवैद्य, सीमा शुक्ल, किर्ती मिश्रा, किर्ती शर्मा, मनिषा तिवारी, दुर्गा जोशी, राजगुरु, रश्मी जोशी, अंजली जोशी, नेहा कुलकर्णी, चिमोटे, दिपाली देशपांडे, शशी तिवारी, चंदा शर्मा, सुनिता तिवारी. तारा शर्मा आणि भगवान परशुराम जन्मोत्सव समितीने केले आहे.

Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/LZ9WKrBL1yE59xBfyQnS62

Wednesday, 8 May 2024

सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते लोकनिर्माण प्रतिष्ठानचे उद्घाटन !!

सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते लोकनिर्माण प्रतिष्ठानचे उद्घाटन !!

समाजोपयोगी विविध उपक्रमास लवकरच सुरूवात - अध्यक्ष बाळकृष्ण कासार 

कोकण, (शांताराम गुडेकर) :

           लोकनिर्माण प्रतिष्ठान या संस्थेचे उद्घाटन प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी आणि विश्वस्त यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्ते आणि उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांच्या हस्ते तुळशीला पाणी घालून संपन्न झाले. संस्थेची पहिली सर्वसाधारण सभा रविवार दि. (५ मे) रोजी दुपारी १२ वाजता संस्थेच्या पाग येथील कार्यालयात संपन्न झाली. या सभेला अध्यक्ष बाळकृष्ण कासार, उपाध्यक्ष युयुत्सू आर्ते, सचिव संजय गोरीवले, खजिनदार पुनित कासार, विश्वस्त सुविधा कासार, पुनम खरे, नेत्रा टोपरे, प्रमोद आंब्रे, सत्यवान विचारे आणि नवीन सदस्य संतोष शिंदे उपस्थित होते. संस्थेला कमी कालावधीत आणि मार्च २०२४ अखेर नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष युयुत्सु आर्ते यांनी सर्व विश्वस्तांचे पेन देऊन अभिनंदन  केले.
          सर्वप्रथम संस्थेतील व्यक्तींची ओळख करण्यात आली. त्यानंतर तुळशीच्या रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी समाजोपयोगी कामांना मंजुरी देण्यात आली.त्यातील याच महिन्यात २२ ते २६ कालावधीत होणाऱ्या मुंबई कुर्ला येथे अभिनय कार्यशाळेला मंजुरी देण्यात आली. संस्थेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेला सर्व विश्वस्त उपस्थित राहिल्याबद्दल सचिव संजय  गोरीवले यांनी आभार मानून सभेची सांगता केली.

Monday, 6 May 2024

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

लग्नाची अंतिम बोलणी करण्याआधी पालकांनी मुलाकडे प्रेम प्रकरणाबाबत चौकशी करावी !!

कल्याण, प्रतिनिधी :- पालकांनी लग्नाची बोलणी अंतिम करण्याआधी आपल्या मुलांकडे प्रेम प्रकरणांबाबत चौकशी केल्यास भविष्यात कोणत्याही मुला मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होणार नाही असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शीतल घोलप यांनी येथे केले. 

    कल्याण पश्चिम येथील महापालिकेसमोरील स्वामी नारायण हॉल येथे आयुष मॅट्रिमोनीच्या विद्यमाने  सकल धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यासमयी शितल घोलप बोलत होत्या. वधू वर  मेळाव्याचे उद्घाटन केल्यानंतर धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण मनोरे यांनी धनगर समाजातील सर्व पोटजातींनी एकत्र येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून यापुढेही अनिल काकडे यांनी धनगर समाजाचे मेळावे आयोजित करावे अशी अपेक्षा व्यक्त केली  तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलतांना धनगर समाज नेते श्री. देवराम कंखरे यांनी लग्न जुळवणे अवघड झाले असून वधू वर मेळाव्यामुळे ते काम सोपे झाले असल्याचे स्पष्ट करून यामुळे वेळ आणि पैसा वाचत असल्याने समाज बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.  यासमयी विशेष अतिथी म्हणून व्यासपीठावर सर्वश्री कौतिकराव बस्ते, रमाकांत पाटील, सतिश हडपे, लालचंद कंखरे , सुनिल वैद्य, प्रतिभा ठोके, सुरेखा बोरसे, संगिता बाविस्कर , अर्चना खांगटे, इत्यादी तर विशेष अतिथी म्हणून सर्वश्री संजय लाळगे, राहुल परदेशी, योगेश घोलप, संजय खांगटे,   रावण धनगर, सुधाकर बाविस्कर, ज्ञानेश्वर काटकर, पन्नालाल कंखरे, दिगंबर भामरे , पंकज मनोरे, गजानन सोनवणे, लता मनोरे इत्यादी प्रतिष्ठित नागरिक उपस्थिती होते.कार्यक्रमाचे प्रास्तविक आयोजक अनिल काकडे यांनी, सूत्रसंचालन समाधान मोरे तर आभार प्रदर्शन विलास तायडे यांनी केले.

Sunday, 5 May 2024

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !!

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव कानिक पाटील सेवानिवृत्त !!

कल्याण, (एस. एल. गुडेकर) :
            कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती प्रभारी सचिव पदावर कार्यरत असणारे कानिक जयराम पाटील हे मंगळवारी दिनांक ३० एप्रिल रोजी ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. यावेळी  कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते पाटील यांना सेवानिवृत्त निरोप व सत्कार समारोहाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी विविध मान्यवरांच्या हस्ते पाटील यांना गौरविण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

           तसेच कल्याणनजीक असणाऱ्या दावडी गावी कानिक पाटील यांच्या राहत्या घरी सेवानिवृत्ती सत्कार सोहळा पार पडला. यावेळी त्यांच्या धर्मपत्नी जयश्री पाटील यांनी त्यांना औक्षण केले. तसेच पाटील कुटूंबीय व नातेवाईकांकडून त्याचा यथा योग्य सन्मान करण्यात आला.  कानिक पाटील हे कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक जालिंदर पाटील याचे भाऊ आहेत. यावेळी पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी गर्दी केली होती.

Thursday, 2 May 2024

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एकाच छताखाली सर्वांना स्थळे मिळून वेळ व पैशांची बचत व्हावी ह्या उद्देशाने कल्याणात सकल धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
      कल्याण पश्चिमेतील महापालिकेसमोरील स्वामी नारायण हॉल येथे रविवार दिनांक ५ मे रोजी श सायंकाळी ५ वाजता धनगर समाज वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण मनोरे यांच्या हस्ते ह्या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात येणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनगर समाज विकास मंडळाचे अध्यक्ष देवराम कंखरे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून याप्रसंगी सर्वश्री समाधान मोरे, विलास तायडे, संजय लाळगे, समीर मानकर, योगेश घोलप, राहुल परदेशी, गजानन सोनवणे, रमाकांत पाटील, ज्ञानेश्वर कंखरे, कौतिकराव बस्ते, शांताराम माने, ज्ञानेश्वर काटकर, सुधाकर बाविस्कर, दिलिप सुर्यवंशी, श्यामभाऊ सोनवणे, लालचंद कंखरे, रघुनाथ पाटील, रावण धनगर, सुनिल वैदय, अशोक धनगर, सतिश हडपे, शंकर लांडगे, विनोद सावळे, महेश सावळे, हर्षद ठोके, संगिता बाविस्कर, प्रतिभा ठोके, मिनाक्षी खराटे, लता मनोरे, शितल घोलप, सुरेखा बोरसे, कविता बागुल, अर्चना खांगटे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून अधिक माहितीसाठी आयोजक अनिल काकडे भ्रमणध्वनी 9324552963 /8104211818 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Wednesday, 1 May 2024

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

जय बजरंग व्यायाम शाळा,घाटकोपर प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबीर संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
               रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जातेच त्याच मूळ कारण  आपल्या एका रक्तदानाने तिघांना जीवनदान मिळते, कधी कधी जिथं रक्ताची नाती सुद्धा रक्तदानासाठी तयार होत नाहीत तिथं अनेक अनोळखी रक्तदाते रुग्णाला जीवनदान देण्याकरता तत्पर असतात हे म्हणावं लागेल. वर्षभर अनेक ब्लड कॅम्प तसेच नवनवीन रक्तदात्यांना प्रेरित करुन रक्तदान करण्यास प्रवृत्त केले जाते. म्हणूनच जय बजरंग व्यायाम शाळा (भटवाडी, घाटकोपर) व घाटकोपर प्रतिष्ठान, यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. या शिबीरला घाटकोपर मधील युवक -युवती, महिला -पुरुष यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
            कमी वेळेत अनेक रक्तदाते तयार करून अनेकवेळा रक्तदान शिबिरे आयोजित करून मुंबई महानगर पालिकेच्या रुग्णालयातील रक्तपेढीना आणि गरजवंत रुग्णांना रक्ताची उपलबध्दता करून देणे हे कार्य मोठ्या शिताफीने ही  संस्था करत असते. अपघात, बाळंतपण, डायलेसिस रुग्ण, सिकलसेल रुग्ण, थेलेसेमीयाच्या रुग्णांना आणि अन्य शस्त्रक्रियांसाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज लागते. मुंबई सारख्या शहरात दररोज हजारोंच्या संख्येत रक्त युनिटची गरज लागत असते आणि त्या मानाने रक्त संकलन खूप कमी प्रमाणात होत असताना दिसते. कारण अजूनही रक्तदानाच्या गैरसमजुतीमुळे लोक रक्तदान करण्यास टाळत असतात. ते गैरसमज दूर करून अनेकांनी रक्तदानाकडे वळले पाहिजे. रक्तदाते परिवाराला वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या हॉस्पिटल, ब्लड बँक यांना मनःपूर्वक धन्यवाद देत त्यांचे आभार व्यक्त केले. रक्ताचा थेंब थेंब आहे मौल्यवान, जो वाचवतो रुग्णांचे प्राण, याची असावी सर्वांना जाण म्हणूनच करावे निःस्वार्थ रक्तदान असा संदेश यानिमित्ताने वृत्त पत्रलेखक सुभाष कोकणे यांच्यातर्फे देण्यात

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्यातर्फे जय बजरंग व्यायाम शाळेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी व्हील चेअर व स्ट्रेचेरची भेट !!

घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश जंगम यांच्यातर्फे जय बजरंग व्यायाम शाळेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी व्हील चेअर व स्ट्रेचेरची भेट !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :
            घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांच्यावतीने, व्हील चेअर व स्ट्रेचेर, जय बजरंग व्यायाम शाळा (भटवाडी, घाटकोपर) या संस्थेला विभागलातील जनतेच्या वापरासाठी भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व सभासद,श्री.भावेश चव्हाण,श्री.अजित चव्हाण,संतोष कोंकटी, राजेश चव्हाण, चंदू राणे, बाळू काकडे, संदेश खापरे, उदय चव्हाण, रमेश सुर्वे, सुरेश शिर्के, सागर सुर्वे आणि सुभाष कोकणे आदी उपस्थित होते. यानिमिताने घाटकोपर प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.निलेश नामदेव जंगम यांचे स्थानिक जनतेकडून कौतुक होत असून त्यांचे अनेकांनी आभार मानून त्यांना पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न !!

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न !!

मुंबई, (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :

            शिवसेना सचिव, प्रवक्ता, मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखाली "महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे" औचित्य साधून स्वातंत्र्यवीर सावरकर  स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई - येथे कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कामगार सोहळ्याला महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांची तातडीची बैठक असल्याकारणाने कार्यक्रमास उपस्थित राहू शकले शकले नव्हते. मात्र  त्यांनी या कार्यक्रमला शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य गुमास्ता माथाडी ट्रान्सपोर्टचे श्री.महेंद्र जाधव यांनी मा.मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी प्रेमाची भेट म्हणून चांदीचा हुक/आरी आणि शाल आणली होती. ती त्यांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.श्री किरण पावसकर यांना तमाम माथाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने दिली. यावर बोलताना मा. श्री. किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांना सांगितले तुम्ही दिलेली ही प्रेमाची भेट मी मा. मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे यांना तुमच्या सर्वांच्या वतीने देईन. बाळासाहेब भवन येथे मा.मुख्यमंत्री शिंदे यांनी आयोजित केलेल्या बैठकीत मा. श्री किरण पावसकर यांनी सर्व माथाडी कर्मचाऱ्यांच्या वतीने  ही प्रेमाची भेट, माथाडी चे प्रतीक म्हणून चांदीचा हुक/आरी  आणि शाल मा. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब  यांना देण्यात आले.

श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन !!

लांजा (केतन भोज) : आत्मबुद्धी निश्चयाची | तेचि दशा मोक्षश्रीची || मी आत्मा आहे हे कधीच विसरू नये हे ब्रीद वाक्य घेऊन आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या श्री काडसिद्धेश्वर अध्यात्मिक केंद्र कोचरी बेंद्रेवाडी यांचा यंदा पन्नासवा सुवर्ण महोत्सवी उत्सव साजरा होत आहे. त्या निमित्त दि.०७ मे ते १० मे २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, सकाळी ६.०० वाजता काकड आरती त्यानंतर ९.०० वाजता सकाळचे भजन सायंकाळी ४.०० वाजता सांप्रदायिक भजन असा दिनक्रम असून मंगळवार दि.०७ मे रोजी सकाळी १०.०० वाजता क्रिकेट स्पर्धा ( वाडी मर्यादित) सायं-६.०० वा.हरिजागर आणि किर्तन (किर्तनकार श्री.चंद्रकांत पवार महाराज), लांजा यांचे किर्तन, रात्रौ-९.०० वाजता आरती व शेजारती त्यानंतर ९.३० वा. महाप्रसाद व तद्नंतर १०. वाजता बैठी भजन- श्री काडसिद्धेश्वर सांप्रदाय भजन मंडळ,देवरुख तसेच बुधवार दि.०८ मे रोजी सकाळी १२.०० ते.२.०० या कालावधीत हळदीकुंकू (गावपातळीवर) सायं-५.०० वाजता गुणगौरव व सत्कार समारंभ (गुणगौरव गावपातळीवर हायस्कूल व मराठी शाळेतील मुलांचा सत्कार) (सत्कार समारंभ वाडीतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार) रात्रौ ८.३० वाजता आरती व शेजारती रात्रौ.९.०० वाजता महाप्रसाद व तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम, गुरुवार दि.०९ मे रोजी सायं-४.०० वाजता पालखी मिरवणूक, रात्रौ-६.३० वाजता किर्तन (किर्तनकार श्री.नामे बुवा), रात्रौ-९.०० वाजता महाप्रसाद व तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता बैठी भजन (तिवरे मेढे भजन मंडळ व शेवटी शुक्रवार दि.१० मे रोजी सकाळी १०.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत श्री काडसिद्धेश्वर आध्यत्मिक केंद्र, कोचरी, बेंद्रेवाडी संलग्न सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिचर्स सेंटर कणेरी मठ, कोल्हापूर आयोजित मोफत आरोग्य शिबीर असून यामध्ये रक्तदान, हाडांचे आजार तपासणी, डोळे तपासणी, ईसीजी, शुगर तपासणी वैद्यकीय सल्ला यांचा समावेश आहे, सायं-५.०० वाजता पालखी रिंगण भजन, सायं-६.३० वाजता दिप प्रज्वलन व सायंकाळी ७.०० वाजता प.पूज्य श्री समर्थ सद्गुरु अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज यांचा प्रवचन सोहळा आयोजित केला आहे तद्नंतर रात्रौ १०.०० वाजता महाप्रसाद अशा प्रकारे विविध कार्यक्रम आयोजित केले असून, सर्व भक्तांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन श्री काडसिद्धेश्वर आध्यात्मिक केंद्र, कोचरी बेंद्रेवाडी, लांजा यांच्या तर्फे करण्यात आले आहे.

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

निलेश सांबरे यांचा न्यू हिंदुस्थान कामगार सेनेतर्फे समाज रत्न पुरस्कार देऊन करण्यात आला सन्मान !!

कल्याण, प्रतिनिधी : जिजाऊ संघटना महाराष्ट्र अध्यक्ष निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेने समाज रत्न पुरस्कार २०२३-२४ ने सन्मानित केले. कल्याण पश्चिम येथील मराठा मंदिर सभागृहात न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्यावतीने कामगार दिनानिमित्त एक पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात निलेश सांबरे यांना न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.

न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या मते, निलेश सांबरे याचं व्यक्तिमत्व समाजातील विविध स्थरातील रत्नांपैकी एकमेव आहे. तसेच सांबरे यांनी जिजाऊ संघटनेमार्फत केलेल्या समाजकार्याचा सार्थ अभिमान असल्याचंही पुरस्काराच्या प्रमाणपत्रात नमूद केले आहे. निलेश सांबरे यांच्या समाजसेवेचा आदर्श इतरांनीही घ्यावा आणि समाजात सुसंस्कृत व सुशिक्षित वर्ग निर्माण होण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा गौरव प्रदान केल्याचं न्यू हिंदुस्थान कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमामध्ये जिजाऊ संघटनेचे अनेक पदाधिकारी निलेश सांबरे यांच्यासोबत उपस्थित होते. तसेच न्यू हिंदुस्थान कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष समीर पिंपळे, सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्य कार्यक्रमात हजर होते.

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर !

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०२५-२६ जाहीर ! **तरुणांना प्रशासनासोबत काम करण्याची संधी, साठ फेलोंची निवड करण्यात येणार पुणे, प्...